ॲमेझॉनफ्लिपकार्ट वरील
अधिकृत पुस्तक वितरक

संगणक प्रकाशनसंबंधी…

ॲमेझॉन वा फ्लिपकार्ट वर पुस्तके खरेदी करणाऱ्या वाचकांना ‘संगणक प्रकाशन’ हे नाव नवे नाही.’संगणक’ ने १५० हून अधिक ख्यातनाम प्रकाशकांची अक्षरशः हजारो पुस्तके ‘ॲमेझॉन’ – ‘फ्लिपकार्ट’ वर उपलब्ध केली आहेत. ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी ‘संगणक प्रकाशन’ हे पूर्ण विश्वासार्ह असे नाव आहे.

या आठवड्यात

AmazonFilpkart वर आलेली 

नवी मराठी पुस्तके

संगणक प्रकाशन ला ९१ वर्षीय एका वयोवृद्ध आईचे आशीर्वाद…

वरील पत्र श्रीमती प्रज्ञा जोशी (वय ९१ वर्षे) राहणार मिरज यांनी संगणक प्रकाशन टीमला लिहीले आहे. श्रीमती प्रज्ञा जोशी यांचा मुलगा निरंजन जोशी हा बंगलोरला असतो. बंगलोरहून तो आपल्या आईसाठी पुस्तकांची ऑर्डर ॲमेझॉन वर संगणक प्रकाशन कडे नोंदवतो. पुस्तक आईला मिरज पत्त्यावर मिळते.

असेच एक पुस्तक मनोरमा प्रकाशनचे प्रदीप दळवी लिखित पसायदान हे पुत्र निरंजन यांनी आईसाठी संगणक प्रकाशन कडून मागवले. या पुस्तकाबरोबर आईंना संगणक चे पत्रक मिळाले. ते वाचून आई श्रीमती प्रज्ञा जोशी यांनी एक पत्र आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरात कागदावर लिहीले. त्या हस्ताक्षरित पत्राचा फोटो मिरजला काढून घेतला, आणि तो फोटो त्यांनी आपला मुलगा निरंजनला बंगलोरला पाठवला. तो फोटो पाठवताना त्या बरोबर आईने मुलाला सांगितले की मी लिहिलेले हे पत्र संगणक प्रकाशन कडे आठवणीने पाठव. आईच्या इच्छेनुसार निरंजन जोशी यांनी त्या पत्राची इमेज आपल्याला संगणक च्या इमेल आयडी वर पाठवली आहे. संगणक प्रकाशन साठी हा फारच मौलिक ठेवा आणि मोठा आशीर्वाद आहे.

लक्षात घ्या, ती ९१ वर्षीय माऊली आपल्या अक्षरात इंग्रजीत लिहिते की तुम्ही मोठे काम करीत आहात.

यापेक्षा मोठे प्रशस्तीपत्र काय हवे?

Amazon वरील पुस्तके : एका दृष्टीक्षेपात पहा:
QR Code मोबाईलने स्कॅन करुन पहा. रुपये २५०/- व अधिक किंमतीची सर्व पुस्तके एकत्र पहायला मिळतील.
QR Code मोबाईलने स्कॅन करुन पहा. रुपये ८०/- ते रुपये २४९/- या दरम्यान किंमती असलेल्या छोटेखानी पुस्तकांची यादी पाहता येईल.