ॲमेझॉनफ्लिपकार्ट वरील
अधिकृत पुस्तक वितरक

Services

Amazon व Flipkart वर ऑनलाईन ग्रंथ वितरण

पुस्तक छपाई होऊन प्रती हातात आल्यानंतर त्यांच्या विक्री व वितरणासाठी, विशेषतः ‘ॲमेझॉन’ व ‘फ्लिपकार्ट’ वर पुस्तके उपलब्ध करण्यासाठी ‘संगणक’ च्या ऑनलाईन ग्रंथ वितरण सेवेचा लाभ प्रकाशक घेत असतात.जे लेखक स्वतःचे पुस्तक स्वतःच प्रकाशित करतात तेही या सेवेचा लाभ घेऊन भारतभरच्या वाचकांसाठी आपली पुस्तके ॲमेझॉन / फ्लिपकार्ट वर उपलब्ध करू शकतात.
आज सुमारे १५० आघाडीचे प्रकाशक ‘संगणक’ ची ‘ॲमेझॉन’ व ‘फ्लिपकार्ट’ विषयक सेवा त्यांच्या नियमित पुस्तक विक्रीसाठी घेत आहेत. त्यातील ख्यातनाम प्रकाशकांची यादी डाऊनलोडसाठी  लिंकवर दिली आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘संगणक’ च्या व्हॉटसॲप नंबर वर अवश्य संपर्क करावा.

जुन्या पुस्तकांच्या पुनर्मुद्रणासाठी स्वस्त दरातील पेजिनेशन सेवा

लेखक आणि प्रकाशक या दोघांनाही या सेवेची गरज लागू शकते.
एखाद्या जुन्या पुस्तकाचे पुनर्मुद्रण करण्याची जेव्हा वेळ येते, आणि जेव्हा जुना डीटीपी कंपोज उपलब्ध होत नाही, तेव्हा तर ही गरज अधिकच जाणवते. जुना कंपोज उपलब्ध नसल्याने पुन्हा सुरूवातीपासून कंपोज, टायपिंग, प्रुफरिडींग आणि पेजिनेशन करावे लागते. यासाठी वेळही खूप लागतो, आणि प्रतिपान खर्चही बराच येतो.
यासाठी ‘संगणक’ कडे OCR तंत्रज्ञानावर आधारित बुक – पेजिनेशन सेवा उपलब्ध आहे. या पद्धतीने पेजिनेशन केल्याने वेळ व खर्च यात सुमारे २५ टक्के बचत होते.
या संबंधी अधिक माहिती साठी संगणक च्या व्हॉटसॲप नंबर वर कृपया संपर्क साधावा.

eBooks निर्मिती व Amazon Kindle Edition संबंधी सेवा

eBooks व Amazon Kindle Edition संबंधीची Turn-key पद्धतीची सेवा ‘संगणक’ कडे उपलब्ध आहे.प्रकाशक आणि लेखक दोघांनाही या सेवेचा लाभ घेता येईल. या संबंधी मोफत मार्गदर्शन व सविस्तर माहितीसाठी ‘संगणक’ च्या व्हॉटसॲप नंबर वर कृपया संपर्क साधावा.
संगणक प्रकाशनमार्फत प्रकाशित झालेली किंडल आवृत्तीची नमुना पाने आपणास पाहण्यासाठी खालील QR Code मोबाईलने स्कॅन करा अथवा खालील लिंकवर क्लिक करा.

लेखकांसाठी ग्रंथ निर्मिती, ग्रंथ प्रकाशन व ग्रंथ वितरण सेवा

सोशल मिडिया वर अनेक जण दर्जेदार लेखन करताना आपण पाहतो. पारंपारिक अर्थाने ते लेखक नसतात. मात्र, हौस म्हणून एकेक पोस्ट लिहीता लिहीता एखाद्या व्यक्तीतून नकळत लेखक घडत जातो. त्या लेखनाचे शेकडो नियमित वाचक आणि एक चाहता वर्ग देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून तयार झालेला असतो. पोस्ट म्हणून टाकलेल्या आपल्या लिखाणाचं एक पुस्तक तयार होऊ शकतं, आणि त्या पुस्तकाला वाचकवर्गही आहे याची जाणीव पोस्ट-लेखकाला एक दिवस होते.
पण लिहिलेल्या पुस्तकासाठी प्रकाशक शोधणे हे किती दिव्य आहे याचीही कल्पना आजच्या युगातील लेखकांना असते. त्यामुळे ‘आपले पुस्तक आपणच छापून प्रकाशित करू या’ असा निर्णय लेखक घेतो. पुस्तक छपाई करणे एक वेळ जमते पण खरा प्रश्न पुढेच असतो. छापलेल्या पुस्तकाची विक्री व वितरण ही लेखकाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. यातून मार्ग काढण्यासाठी आता ‘संगणक’ च्या Turn-key सेवेचा लाभ लेखकांना घेता येईल.
लेखकांसाठी पुस्तक निर्मिती, प्रकाशन, व ग्रंथ वितरणाची एकत्रित Turn-key सेवा.
पुस्तक प्रकाशनाचे तीन टप्पे आहेत :
१. पहिल्या टप्प्यात लिखित पुस्तकाची मुद्रण प्रत तयार करणे की ज्यात मुखपृष्ठ डिझाईन पासून ते पेजिनेशन पर्यंत तसेच पुस्तकाला ISBN हा आंतरराष्ट्रीय मान्यतेचा क्रमांक मिळवण्यापर्यंतच्या सर्व तांत्रिक बाबी अंतर्भूत होतात.
२. दुस-या टप्प्यावर दर्जेदार छपाई होऊन प्रत्यक्ष प्रती हातात येणे असते. आजकाल पुस्तकाच्या फक्त ५० वा १०० प्रती छापणेही प्रगत तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. त्यामुळे सामान्यतः ₹15,000 ते ₹25,000 इतक्या कमी बजेटमध्येही आजकाल पुस्तक छपाई होऊ शकते. अर्थात
बजेट हे पृष्ठसंख्या, प्रतींची संख्या, पुस्तकाचा आकार वगैरे बाबींवर अवलंबून असते.
३. तिस-या टप्प्यावर, छापिल पुस्तकाच्या तयार प्रती वाचक-ग्राहकांपर्यंत नेणाऱ्या ग्रंथ वितरण व्यवस्थेचा भाग येतो.
दुकानात जाऊन पुस्तक-खरेदी करण्याची ग्राहकाची सवय लॉकडाऊन नंतर आता जवळ जवळ संपुष्टातच आल्यासारखी आहे. दुर्दैवाने लॉकडाऊन काळात पुस्तकाची दुकानेही मोठ्या संख्येने बंद झाली. त्यामुळे पुस्तक वितरण आता दुकानांतून न होता मुख्यत्वे ‘ॲमेझॉन’ व ‘फ्लिपकार्ट’ सारख्या ऑनलाईन ग्रंथ वितरण व्यवस्थेतूनच होते. Amazon व Flipkart वरील उत्तम ग्रंथ वितरण व ग्रंथ विक्री सेवेसाठी ‘संगणक प्रकाशन’ ची ख्याती आहे हे आपणास माहीतच आहे.
पुस्तक प्रकाशनाचे वरील तिन्ही टप्पे सामावणारी एकत्रित टर्न-की सेवा ‘संगणक प्रकाशन’ ने लेखकांसाठी उपलब्ध केली आहे.
सोशल मिडिया तून पुस्तकाचा प्रचार
पुस्तक प्रकाशनानंतर लेखक स्वतः आपले व्हॉटसॲप ग्रुप्स, फेसबुक पोस्ट, ब्लॉग, युट्यूब चॅनल आदि माध्यमांतून पुस्तक प्रकाशनाचे वृत्त जगभरच्या वाचकांपर्यंत, आपल्या मित्रपरिवार व आप्तेष्टांपर्यंत पोहोचवू शकतो. तसेच, आपल्या पुस्तकाची Amazon Link सर्वत्र शेअर करू शकतो. त्या लिंकवर जाऊन लेखकाचे वाचक व चाहते ‘ॲमेझॉन’ वर ऑर्डर नोंदवू शकतात व भारतातील कोणत्याही पत्त्यावर आपले पुस्तक घरपोच मागवू शकतात.
या संदर्भात सविस्तर माहितीसाठी व प्रत्यक्ष संपर्कासाठी कृपया ‘संगणक’ च्या व्हॉटसॲप नंबरवर वर संपर्क साधावा.
लेखकांसाठी निव्वळ ग्रंथ विक्री सेवा
आजकाल कितीतरी प्रकाशक लेखकांना रॉयल्टी किंवा मानधनाच्या बदल्यात किंवा बरेचदा लेखकाच्या मागणीवरून पुस्तकाच्या १०० – २०० वा अधिक प्रती लेखकाला देताना दिसतात. लेखक त्या प्रती स्वीकारतो, पण त्यातील २५-३० प्रती सप्रेम भेटीदाखल देऊन झाल्यावर उरलेल्या प्रतींचं काय करायचं असा प्रश्न त्याला पडतो. त्या प्रतींची विक्री ‘ॲमेझॉन’ व ‘फ्लिपकार्ट’ वर करण्याचा पर्याय लेखकाला आहे. त्या संबंधी सविस्तर माहितीसाठी लेखकांनी ‘संगणक’ च्या व्हॉटसॲप नंबरवर संपर्क साधावा.