|| नव्या कोऱ्या पुस्तकांचे हार्दिक स्वागत ||

जीवनाच्या एखाद्या क्षेत्रातील कार्य असो की ललित- वैचारिक लेखन, महत्त्वाचे काम करूनही काही व्यक्तींच्या वाट्याला उपेक्षाच येते. लेखनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर म. फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, लोकहितवादी यांच्यापासून किरण नगरकर, बाबूराव बागूल यांच्यापर्यंत अनेक उदाहरणे या संदर्भाने सांगता येतील. उपेक्षा वाट्याला येण्याची काही सामाजिक कारणे असू शकतात का? असतील तर ती नेमकी कोणती ? ही उपेक्षा अनवधानाने घडते की ठरवून केली जाते की एका विशिष्ट सामाजिक परिस्थितीचा ती अपरिहार्य परिणाम असते? यामध्ये समीक्षक, वाङ्मयेतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक्रम ठरविणारे विद्वान इत्यादी घटकांची जबाबदारी किती आणि कोणती ? या सर्व घटकांचा नेमका काय परिणाम होतो ? ते कसे कार्यरत होतात? ‘का‘ कार्यरत होतात? यामध्ये सांस्कृतिक- सामाजिक- वाङ्मयीन कार्य करणाऱ्या संस्थांची भूमिका काय असते? या सर्व घटकांवर अन्य घटकांचा दबाव असू शकतो का ? तसे असेल तर त्यातून निर्माण होणारी सत्तास्थाने कोणती ? त्यातून निर्माण होणारे ताणतणाव कोणते? वाङ्मयीन गुणवत्तेचे काही निकष असू शकतात का ? ते कसे ठरतात? ते सोयीने ठरवण्यासाठी मुद्दाम काही सिद्धांत तयार केले जातात काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयासातून या पुस्तकाच्या स्वरूपात आपल्यासमोर येत असणारे ‘साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र‘ अभ्यासू वाचकांना नवीन दिशा दाखवणारे आणि अभ्यासासाठी नवीन दालन खुले करणारे ठरेल यात शंकाच नाही.
पुस्तकाचे नाव : साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र
लेखक : नागनाथ कोत्तापल्ले
प्रकाशक : सायन पब्लिकेशन
पृष्ठसंख्या : 168
किंमत : 240/-
पुस्तकाची Amazon लिंक :

१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामापूर्वीही आपल्या देशात अनेक सशस्त्र उठाव झाले. ब्रिटिशांची परकीय जुलमी राजवट हुसकावून लावण्यासाठी अनेक लढवय्ये मायभूमीवर धारातीर्थी पडले! अशा प्रकारच्याच सशस्त्र उठावाद्वारे इंग्रजांना जवळपास चौदा वर्षे सळो की पळो करून त्यांची झोप उडवणारा निधड्या छातीचा नरवीर या महाराष्ट्राच्या भूमीवर दिनांक ७ सप्टेंबर १७९१ रोजी जन्माला आला त्याचं नाव होतं उमाजी नाईक ! छत्रपती शिवाजी महाराजांचा देदिप्यमान आदर्श डोळ्यासमोर ठेवून मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमाजी राजेंनी आपल्या रामोशी साथीदारांच्या साह्याने सशस्त्र लढा उभारला. त्याकाळी पुण्याचे पेशवे, मोठमोठे संस्थानिक, सरदार, जहागीरदार यांनी ब्रिटिशांचं मांडलिकत्व पत्करलं होतं. कोणीही परकीय गुलामगिरीच्या विरोधात लढण्याची जिगर दाखवून उमाजींच्या पाठीशी उभे राहायला तयार नव्हते. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उमाजी राजेंनी ब्रिटिशांची सत्ता हुसकावून लावण्यासाठी एकट्याच्या हिमतीवर उभारलेल्या या सशस्त्र क्रांतिलढ्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं! “क्रांतिलढ्याचे महानायक : उमाजीराजे नाईक’ या कादंबरीत लेखक विनोद श्रा. पंचभाई यांनी उमाजीराजे आणि त्यांच्या जिगरबाज साथीदारांची रोमहर्षक शौर्यगाथा खिळवून ठेवणाऱ्या अनोख्या शैलीत मांडली आहे. उमाजीराजे यांना बेसावध अवस्थेत पकडल्यानंतर पुण्याला घेऊन येणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश हा त्यानं लिहिलेल्या पुस्तकात म्हणतो..
पुस्तकाचे नाव :
लेखक : विनोद श्रा. पंचभाई
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन
पृष्ठसंख्या : 144
किंमत : 250/-
पुस्तकाची Amazon लिंक :

सौंदर्याच्या परिभाषेतील गुणधर्म नसतानाही हवाईसुंदरी बनण्याचे एका मुलीचे स्वप्न… अथक प्रयत्न आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ती ते साकारते… अभिनयाच्या नव्या धावपट्टीवरून झेप घेण्याच्या तयारीत असताना त्या चौदा वर्षांच्या कारकिर्दीतल्या अनुभवांना ती कागदांवर उतरवते… त्यातून आकाराला येतो ‘ढगातल्या आठवणींचा’ हा संग्रह !
पुस्तकाचे नाव :
लेखिका : सुलक्षणा जोगळेकर
प्रकाशक : ग्रंथाली
पृष्ठसंख्या : 170
किंमत : 300/-
पुस्तकाची Amazon लिंक :

डॉ. गिरीश ओक यांचे हे पुस्तक म्हणजे केवळ एका नटाचे स्मरणरंजन नाही, तर हा एक कॅलिडोस्कोप आहे. तो थोडासा फिरवला, की नक्षी बदलते. त्याचप्रमाणे या पुस्तकात वाचकांना कधी नामवंत रंगकर्मीचा परिचय घडतो, तर कधी व्यावसायिक नाटकं प्रेक्षकांपर्यंत नेताना करावी लागणारी धडपड दिसते, तर कधी पडद्यामागे घडणाऱ्या गमतीजमतींचे दर्शन होते. रंगभूमीवर सातत्याने क्रियाशील असणाऱ्या एका सजग अभिनेत्याने स्वतःच्या नाट्यप्रवासाचे तटस्थ दृष्टीने केलेले हे अवलोकन आहे. हा निव्वळ स्वकर्तृत्वाचा मांडलेला लेखाजोखा नाही तर मराठी रंगभूमीच्या इतिहासातील काळाच्या एका तुकड्याचा रसरशीत इंद्रधनुषी अंश आहे.
पुस्तकाचे नाव :
लेखक : शिरीष देखणे / गिरीश ओक
प्रकाशक : अनुबंध प्रकाशन
पृष्ठसंख्या : 192
किंमत : 350/-
पुस्तकाची Amazon लिंक :

२०२१ – २०२४ हा काळ भारतीय क्रिकेटसाठी एका झंझावाता समान होता. ज्याची सुरवात २०२१ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून झाली. एकाच दौऱ्यात आपली कामगिरी राखरांगोळी होण्यापासून ते त्याच राखेतून फिनिक्स् पक्षाप्रमाणे भरारी घेण्याप्रमाणे झाली. वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप, इंग्लंडला धूळ चारणे आणि २०२३ वर्ल्ड कपची स्वप्नवत वाटावी अशी वाटचाल. परंतू शेवटच्या क्षणी हाता तोंडातला घास ऑस्ट्रेलियाने हिरावून नेला. तरीही खचून न जाता रोहित शर्माच्या भारतीय संघाने २०२४ मध्ये, २०२३ च्या अश्रूंवर षटकार ठोकून फुंकर मारली. भारतीय क्रिकेट मधील या चढ उताराचे संझगिरी शैलीतले खुमासदार लेख या पुस्तकातून एकत्रित समोर येत आहेत. हे पुस्तक क्रिकेटप्रेमींसाठी आणि भारताच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी निश्चितच वाचनीय आहे.
पुस्तकाचे नाव :
लेखक : व्दारकानाथ संझगिरी
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन
पृष्ठसंख्या : 195
किंमत : 300/-
पुस्तकाची Amazon लिंक :

किन्नर याचा अर्थ स्वर्गातील गाणारे देव! ते यक्ष आणि गंधर्वांसोबत इंद्राच्या दरबारात आपली गायन, वादन आणि नर्तनकला सादर करतात असा प्राचीन, पौराणिक संदर्भ मिळतो. किन्नर हे पूर्ण पुरुष नसतात आणि पूर्ण स्त्रीसुद्धा नसतात. म्हणून त्यांना ‘तृतीयपंथी’ म्हणतात. पुराणांत त्यांना षंढ म्हटलंय. कश्यप ऋषींनी ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापतीच्या सतरा मुलींशी विवाह केल्यानं पृथ्वीवरील सर्व प्रजाती त्यातून जन्माला आल्या. त्यांपैकी ‘अनिष्टा’ या मुलीपासून यक्ष, गंधर्व, किन्नर आदी उपदेव जन्मास आले, अशा पुराणकथा आहेत. डॉ. रमेश नारायण यांनी अनेक वर्षं या विषयावर अभ्यास केलाय. त्यांच्या समस्यांवर उपायही सुचविले आहेत. ‘किन्नर : एक उपदेव’ हे पुस्तक सिद्ध केलंय. एका उपेक्षित समाजाच्या व्यथा, वेदना मांडल्या आहेत. समाजानं त्यांचा स्वीकार करावा, ही त्यांची प्रामाणिक तळमळ आहे. बहुसंख्य किन्नर अशिक्षित असल्यानं त्यांच्यात शिक्षणजागृती व्हावी, अशी कळकळ ते व्यक्त करतात. त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लेखक डॉ. रमेश नारायण या कथानकात अनेक समस्या सहजपणे सांगतात. त्या अत्यंत हृदयस्पर्शी झाल्या असून, वाचकांस अंतर्मुख करणाऱ्या आहेत!
पुस्तकाचे नाव :
लेखक : डॉ. रमेश नारायण
प्रकाशक : संवेदना प्रकाशन
पृष्ठसंख्या : 184
किंमत : 300/-
पुस्तकाची Amazon लिंक :

आपल्याला दिसलेला सत्याचा प्रकाश नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि संस्कारांची रुजुवात व्हावी तेव्हाच संस्कृतीचे फूल उमलून येईल. त्या फुलाचा सुगंध दूरवर पसरेल. हा भाव मनामध्ये असेल, तर आणि तरच हे राष्ट्र आपण घडवू शकतो. राष्ट्र घडवायचे म्हणजे काही वेगळे करायचे नाही, तर प्रत्येक पालकाने, प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक समाजघटकाने येणारी नवी पिढी सुसंस्कारित करण्याचा वसा घ्यायचा. जेव्हा आपण हा वसा घेऊ तेव्हाच समृद्धीचा वारसा नव्या पिढ्यांच्या ओंजळीत देता येईल; असा विचार मांडणारे भगवान निंबा आहेर यांचे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे, संग्रही ठेवावे असेच आहे.
पुस्तकाचे नाव :
लेखक : भगवान निंबा आहेर
प्रकाशक : शब्दमल्हार प्रकाशन
पृष्ठसंख्या : 140
किंमत : 250/-
पुस्तकाची Amazon लिंक :

विवेक घोडमारे यांचे कथाविश्व मानवी जीवनाच्या सूक्ष्म आकलन-अवलोकनाने भरलेले आहे. लेखकाचे निरिक्षण बहुआयामी आहे आणि जीवनभाष्य विवेकाने केलेले दिसते. व्यक्तिरेखांची विविधता आणि त्यांच्या प्रवृत्तीचे दर्शन घडवताना स्वाभाविकता व्यक्त झालीय. भाषेतील ललितरम्यता लक्षवेधक असून चिंतनसूत्रांची अभिव्यक्ती गौरवास्पद आहे. विशेष म्हणजे स्त्री-पुरुष संबंधांच्या कथा अत्यंत बोल्ड असून प्राकृतिक वास्तवाला समर्थपणे पेलणाऱ्या आहेत.
पुस्तकाचे नाव :
लेखक : विवेक घोडमारे
प्रकाशक : संवेदना प्रकाशन
पृष्ठसंख्या : 159
किंमत : 250/-
पुस्तकाची Amazon लिंक :

‘स्वभाव राशींचे ‘ ह्या माझ्या एकपात्री मनोरंजक कार्यक्रमात मी ‘राशींची प्रेमविषयक रोचक आणि रंजक’ माहिती सादर करतो. कार्यक्रम झाल्या झाल्या अनेक श्रोते भेटतात आणि राशींची प्रेमविषयक माहिती अधिक सविस्तरपणे देण्यासाठी तुम्ही यावर वेगळा कार्यक्रम सादर करा, तसेच यासंबंधी पुस्तक लिहा असा प्रेमळ आग्रह करतात. त्यां सगळ्या ज्ञात- अज्ञात श्रोत्यांमुळेच ह्या पुस्तकाचे लेखन झाले. म्हणूनच त्या सर्व ज्ञात-अज्ञात श्रोत्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि प्रेरणेला हे पुस्तक म्हणजे प्रेमाचा मुजरा आहे. – विश्वास पटवर्धन
पुस्तकाचे नाव :
लेखक : विश्वास पटवर्धन
प्रकाशक : इंद्रायणी साहित्य
पृष्ठसंख्या : 159
किंमत : 190/-
पुस्तकाची Amazon लिंक :

जीवन आनंदी करण्यासाठी आजूबाजूच्या वातावरणातले नकारात्मक अनुभव बाजूला सारून त्यातला विनोद जर शोधता आला, तर जगणे फार सोपे होऊन जाते. आपल्या अवतीभवती जगणे सुकर करणारा असा विनोद असतोच फक्त तो बघण्याची दृष्टी आपल्याला नसते. नरेश महाजन हे आपल्याला अशी दृष्टी देतात. छोट्या छोट्या प्रसंगांतून ते धमाल व्यक्तिचित्रे उभी करतात. त्यात कदाचित तुम्हाला तुमचेही चित्र दिसू शकेल आणि न रागवता तुमचे तुम्हालाच हसू येईल. नकळतपणे ते तुम्हालाच कशी टपली मारून गेलेत हे कळणारही नाही. महाजनांची ही आगळीवेगळी विनोद शैली गेली अनेक वर्ष मराठी साहित्यात रुणझुणते आहे. विनोदाची खट्याळ सीमारेषा न ओलांडता आणि सूचकतेने जे सांगायचे आहे ते सांगून आपल्या जीवनात हास्याचा झरा खळखळवत ठेवण्यासाठी महाजनांच्या या कथा मदत करतात. फार मोठा तत्त्वबोध या कथांतून त्यांना सांगायचा आहे असे नाही; पण जीवनातली सकारात्मकता टिकवली आणि जरा मिश्किलपणाने भोवताली पाहिले, तर आपली व आनंदाची गळाभेट नक्की होईल. ‘माझ्या बायकोचा नवरा’ या संग्रहातील कथा असाच विनोदानुभव देतात.
पुस्तकाचे नाव :
लेखक : नरेश महाजन
प्रकाशक : शब्दमल्हार प्रकाशन
पृष्ठसंख्या : 162
किंमत : 270/-
पुस्तकाची Amazon लिंक :

माझ्या शिक्षण-कालखंडातील १९५४-१९५९ हा काळ बोर्डीच्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूलमध्ये व्यतीत केलेला माध्यमिक- शालेय कालखंड. आचार्य भिसे-चित्रे-सावे ही महान त्रयी सेवानिवृत्त झाली होती. सानेगुरुजींचे कनिष्ठ बंधू पुरुषोत्तम साने उर्फ आप्पा साने आमचे मुख्याध्यापक होते. इतरही अनेक निष्ठावंत सहकाऱ्यांची त्यांना साथ होती. आचार्य भिसे यांचीच परंपरा ही मंडळीसुद्धा पुढे नेत होती. साधी व स्वावलंबी राहणी, उच्च विचारसरणी, राष्ट्रभक्ती या गुणांची जिवंत उदाहरणे म्हणजे ही आमची शिक्षकमंडळी होती. आमच्या संस्कारक्षम मनावर याचा निश्चितच चांगला परिणाम झाल्याशिवाय कसा राहणार ? सत्याचे आचरण, वाईटाचे निर्गमन व शिक्षणाचे आचमन हीच आमच्या गुरुजनांनी शिकविलेली बोर्डी शाळेची परंपरा झाली आहे. म्हणूनच या शिक्षणसंस्थेतून बाहेर पडलेला प्रत्येक माजी विद्यार्थी जगात कुठेही गेला तरी तो वेगळाच वाटतो. हे वेगळेपण आम्ही जपले पाहिजे, नव्हे, पुढच्या पिढीत संक्रमित केले पाहिजे. हीच आमच्या या सर्व गुरुजनांना दिलेली खरी गुरुदक्षिणा ठरेल. माझ्या चार वर्षांच्या काळात या गुरुजनांनी दिलेले ज्ञान व संस्कार घेताना माझ्या फाटक्या झोळीत जे जमले, ते मी भावी आयुष्यात मिरविले. आज इतक्या वर्षांनंतर त्या गतस्मृतींच्या सुवर्णक्षणांची आठवण करून ते कागदावर उतरविण्याचा केलेला हा प्रयत्न, ‘तस्मै श्री गुरुवे नमः ।’
पुस्तकाचे नाव :
लेखक : दिगंबर वामन राऊत
प्रकाशक : ग्रंथाली
पृष्ठसंख्या : 384
किंमत : 600/-
पुस्तकाची Amazon लिंक :

विपुल संचयाचा अद्भुत ग्रंथ प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि अण्णाभाऊ साठे’ या परंपरेला छेद देणाऱ्या ग्रंथाचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि या अनमोल ग्रंथाला शुभेच्छा देतो! अण्णाभाऊ साठेंच्या वाङ्मयाचा एक अभ्यासक म्हणून परंपरेला छेद देऊन नावीन्यपूर्ण मांडणी करणाऱ्या अभ्यासकांचं मला सदैव अप्रूप असतं. तेच अप्रूप वायदंडे सरांबद्दल आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल आहे. मी अण्णा भाऊ साठे अभ्यासताना त्यांच्या संबंधात चौफेर वाचन केलं. आजवर अण्णाभाऊ साठेंच्या वाङ्मयावर व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल अनेकांनी लिहिलं. साचा सोडून लेखक झालेल्या अण्णाभाऊंना साचा सोडून अभ्यासणारे संशोधक म्हणून वायदंडे सर मला अधिकचे भावले. कारण आजवर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि अण्णाभाऊंचं योगदान या अंगाने अनेकांनी लेखन केलेलं आहे. लेखन हा शब्दप्रयोग मी भान राखून करत आहे. कारण त्यात संशोधन नाही, तर ते कॉपी पेस्ट केल्याचंच प्रामुख्याने जाणवतं. तर काही ग्रंथ केवळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान या भोवतालीच फिरताना दिसतात. म्हणून हा साचा छेदून खऱ्या अर्थाने संशोधनाची किमया या ग्रंथकर्त्याने साधलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या मुळाशी जाताना लेखक वाचकाला त्याच्या तळाशी घेऊन जाऊन संशोधनात्मक मांडणी करतो. म्हणून मी वर म्हटल्याप्रमाणे पारंपरिकतेला छेद देण्याचं काम लेखकाने केलेलं आहे. ते ग्रंथाला नावीन्यपूर्ण शीर्षक देऊन त्यांनी शाबीत केलेलं आहे.
पुस्तकाचे नाव :
लेखक : प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे
प्रकाशक : ज्ञानसूर्य प्रकाशन
पृष्ठसंख्या : 251
किंमत : 300/-
पुस्तकाची Amazon लिंक :


इतिहासाचा आणि वर्तमानाचा अन्वयार्थ लावतानाच भविष्याचा मर्मग्राही वेध घेऊ पाहणाऱ्या, काळाचा विस्तृत पट उलगडणाऱ्या अकरा मुलाखती… प्रस्तुत मुलाखत संग्रहामध्ये महाराष्ट्रातील अकरा प्रख्यात लेखक, विचारवंतांच्या मुलाखती वाचकांसमोर ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ‘दशकवेध’ या विभागात गेल्या दशकाचा व्यापक आढावा, आणि येत्या दशकातील संधींचा, आव्हानांचा आणि प्रगतीच्या शक्यतांचा वेध ६ मान्यवरांच्या मुलाखतींच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. ‘महाराष्ट्रवेध’ या विभागात, विविध क्षेत्रातील ५ ख्यातनाम व्यक्तींच्या मुलाखतींचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या सामाजिक, राजकीय, वैचारिक वाटचालीचा समर्पक आढावा घेण्यात आला आहे. तसेच भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा, महाराष्ट्राने विविध क्षेत्रात कोणत्या दिशेने प्रगती करायला हवी, याबद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली आहे.
पुस्तकाचे नाव : व्हायटल संवाद
लेखक : विनायक पाचलग
प्रकाशक : मेनका प्रकाशन
पृष्ठसंख्या : 239
किंमत : 299/-
पुस्तकाची Amazon लिंक :

गोष्टी सांगताना आपल्याकडे नेहमी दाद अपेक्षित असते. पण या गोष्टी वेगळ्या आहेत. सगळ्याच गोष्टी दाद अपेक्षित ठेवून सांगितल्या जात नसतात. काही गोष्टी आपल्या मनावर डोंगराएवढं ओझं वाटत असतात. कुणाला तरी सांगायला पाहिजे असं वाटतं. एकदा शूटिंगच्या निमित्ताने एका गावात ड्रोन हवेत उडवला होता. गावकरी कुतूहल म्हणून जमा झाले होते. त्यातला एक माणूस म्हणाला, ‘किती दिवस झाले राव वर बघून ! आभाळाकड बघणंच सुटलं होतं’. ऐकून धक्का बसला. माणसं वर बघायचेच विसरून गेलेत. आग ओकणारा सूर्य असतो खूपदा वर. तेंडुलकर जेवढा कौतुकाने वर आकाशाकडे बघत मैदानात उतरायचा ना तेवढ्या कौतुकाने बळीराजा वर बघत शेतात जायला हवा. ऐकायला साधी वाटते ही अपेक्षा, पण खूप अवघड आहे. गावोगावी अशाच गोष्टी आहेत. प्रत्येक शेतकऱ्याची गोष्ट छोटी वाटते पण असते डोंगराएवढी !
पुस्तकाचे नाव : गोष्ट छोटी डोंगराएवढी
लेखक : अरविंद जगताप
प्रकाशक : आदित्य प्रकाशन
पृष्ठसंख्या : 176
किंमत : 250/-
पुस्तकाची Amazon लिंक :

लैंगिकता किंवा सेक्स हा विषय माणसाला अनादि काळापासून व्यापून आहे. या विषयाबद्दल सर्वांनाच प्रचंड उत्सुकता असते; पण त्याबद्दचं ज्ञान फारच कमी असतं. माणसाचं लैंगिक वर्तन जसं असतं तसं ते का असतं, लैंगिक वर्तनाची उत्क्रांती कशी होत गेली आहे, आदिम समाजांमध्ये लैंगिकतेकडे कसं पाहिलं जात होतं, जगभरात या विषयाबाबत कोणते समज- अपसमज – अंधश्रद्धा प्रचलित आहेत, त्या अंधश्रद्धांबद्दल समाजशास्त्रज्ञांचं-लैंगिक तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, या विषयात कोणकोणती संशोधनं झाली आहेत याचा आढावा घेणारं पुस्तक. ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांनी त्यांच्या व्यासंगाच्या आधारे लिहिलेलं.
पुस्तकाचे नाव :
लेखक : निरंजन घाटे
प्रकाशक : समकालीन प्रकाशन
पृष्ठसंख्या : 175
किंमत : 250/-
पुस्तकाची Amazon लिंक :

चिंगिस हान कनिष्ठ टोळीत जन्माला आला होता आणि वाळीत टाकलेल्या कुटुंबात वाढला होता. तरी त्याने माळरानावरच्या विविध टोळ्यांची एकजूट करून मंगोल राष्ट्राची निर्मिती केली, स्वकर्तृत्वावर जग पादाक्रांत केले आणि तंबूमध्ये राहणाऱ्या लोकाना मान मिळवून दिला. त्याच्या नातवाने साम्राज्याचा विस्तार केला आणि अखंड चीनची निर्मिती केली. त्या चिंगिस हान आणि होबिलै हान यांची हि अनोखी कहाणी.
पुस्तकाचे नाव :
लेखक : विजय आपटे
प्रकाशक : संगणक प्रकाशन
पृष्ठसंख्या : 264
किंमत : 350/-
पुस्तकाची Amazon लिंक :

रामायणात पुसट उल्लेख असलेली ऊर्मिला, चौदा वर्षं पतीच्या विरहाचं दुःख सोसत राहिली, एवढीच काय ती आपल्याला तिची ओळख. मात्र प्रत्यक्षात ही राजस्त्री कशा प्रकारचं आयुष्य जगली असेल ? राम-लक्ष्मण-सीता वनवासात गेल्यावर मागे उरलेल्या ऊर्मिलेच्या अनुल्लेखानं ती विस्मृतीत गेली. आयुष्यभर राजभवनात राहिलेल्या ऊर्मिलेलाच खरा वनवास घडला. तरीही एकाकी पडलेली ऊर्मिला, मनस्वीपणे आयुष्याला भिडली. याचं सहज आणि ओघवत्या शैलीतलं चित्रण या कादंबरीतून अनुभवायला मिळतं. ऊर्मिलेच्या आयुष्याचा, तिच्या अस्तित्वाचा आणि तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा अतिशय वेगवान आणि रोचक पद्धतीनं या कथानकातून समोर येतो. ही काल्पनिक कादंबरी रामायणकालीन सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचंही प्रभावी चित्रण करते. इतिहासाच्या गर्भात काही कहाण्या चिरविश्रांती घेत असतात. चैतन्याचा स्पर्श झाल्यावर त्या सुप्तावस्थेतून बाहेर येतात. त्यावर चढलेली काळाची पुटं विरत जाऊन त्या जिवंत होतात. पुरातत्त्व संशोधक असलेल्या स्त्रीला झालेली, रामायण काळातल्या एका उपेक्षित स्त्रीची ओळख तिच्याही जाणिवा बदलून टाकते आणि ऊर्मिलेची उलघाल थेट वर्तमानकाळातल्या स्त्रीच्या जगण्याला येऊन भिडते. भूतकाळातल्या सावल्यांनी स्त्रीचा भविष्यकाळ गडद न करता, त्यातल्या अनुभवांच्या किरणांनी तो उजळावा, हेच सांगतेय ही ‘अयोध्येची ऊर्मिला’.
पुस्तकाचे नाव :
लेखक : स्मिता दातार
प्रकाशक : ग्रंथाली
पृष्ठसंख्या : 294
किंमत : 400/-
पुस्तकाची Amazon लिंक :

प्रा. मीरा कुलकर्णी यांचा ‘प्रतिभासंवाद’ म्हणजे मुळात ‘दै. सकाळ’ करता केलेले सदरलेखन आहे. वास्तविक सदरलेखन करताना शब्दांची मर्यादा असल्याने उपलब्ध अवकाशातच मांडणी करावी लागते. मीरा कुलकर्णी यांचे हे लेखन सदराच्या बंदिस्त अवकाशापलीकडे जाऊन निवडक प्रतिभावंतांच्या आयुष्याच्या गाभ्याला स्पर्श करते. संवादावर आधारित लालित्यपूर्ण शब्दांकन आणि त्यातून साकारलेले व्यक्तिचित्र यांच्या सीमारेषेवरील प्रा. मीरा कुलकर्णी यांचा ‘प्रतिभासंवाद’ वाचनीय तर आहेच पण मुख्य म्हणजे माणसांच्या जडणघडणीचा प्रेरक – चैतन्यशील आलेख उभा करणारा आहे. एखाद्या शहराची संस्कृती घडवण्यात, तेथील विविध क्षेत्रांतील निवासी व्यक्तींचे योगदान मोठे असते. या पुस्तकात नव्या मुंबईशी दृढपणे जोडल्या गेलेल्या एकवीस प्रतिभावंतांचा जीवनप्रवास / कलाप्रवास त्यांच्याशी केलेल्या मुक्त संवादातून लेखिकेने उलगडत नेला आहे. प्रा. मीरा कुलकर्णी यांचा हा ‘प्रतिभासंवाद’ एका अर्थी नव्या मुंबईच्या सामाजिक-सांस्कृतिक संचिताचा कलात्मक दस्तऐवजच आहे. – डॉ. वीणा सानेकर (लेखिका, समीक्षक, मराठी भाषातज्ज्ञ.
पुस्तकाचे नाव :
लेखक : मिरा कुलकर्णी
प्रकाशक : सृजनसंवाद प्रकाशन
पृष्ठसंख्या : 112
किंमत : 250/-
पुस्तकाची Amazon लिंक :

वस्तुविनिमयातील अर्थकारण काळातील शेतकऱ्याच्या सुखी आणि निसर्गसंवादी जीवनापासून ते आजच्या चलननियंत्रित अर्थकारणामुळे उद्ध्वस्त झालेल्या त्याच्या जीवनापर्यंतचा मोठा पट ही कविता साकार करते. त्यामुळे तिला शेतकरी जीवनाच्या गाथेचे रूप प्राप्त झाले आहे. आजच्या कृषिविरोधी परिस्थितीत उभी राहिलेली शेतकऱ्यांची आंदोलने, त्यात जीव ओतून त्याने घेतलेला सहभाग, या आंदोलनात त्याला येत गेलेले अपयश, त्यात त्याच्या कार्यकर्तेपणाची होत आलेली उपेक्षा, त्यामुळे त्याची खचलेली, निराश झालेली मनोवस्था याचे चित्र रेखाटत असतानाच ही कविता अशा शेतकऱ्याचा आत्मविश्वास जागृत करू पाहते. त्याची जिजिविषा आणि त्याची संघर्षवृत्ती उत्तेजित करू पाहते. ही शेतकरी कवीने शेतकऱ्यांसाठी लिहिलेली कविता जरी असली तरी सर्वच वाचकांना कृषी संस्कृतीच्या आजच्या भयानक वास्तवाचे अस्वस्थ करून टाकणारे भान देण्यात ती यशस्वी झालेली आहे. अशा या कवितेबरोबरच शेतकरी स्त्रीच्या जीवनातील करुणेची अतिशय प्रभावी अशी चित्रे या संग्रहात रेखाटली गेली आहेत. हा या संग्रहातील अतिशय विलोभनीय असा भाग आहे. ग्रामीण बोलीच्या काव्याभिव्यक्तीच्या सामर्थ्याचा अचंबित करून टाकणारा अनुभव ही कविता देते. वर्तमान वास्तवाच्या सामग्रीतून जरी ही कविता घडत असली तरी वर्तमानाच्या कक्षा ओलांडून सार्वकालिक होण्यात ती यशस्वी झालेली आहे.
पुस्तकाचे नाव :
लेखक : इंद्रजित भालेराव
प्रकाशक : आदित्य प्रकाशन
पृष्ठसंख्या : 171
किंमत : 250/-
पुस्तकाची Amazon लिंक :

काफ्काचं ‘मेटॅमॉर्फोसिस’ : न संपनारं गारूड
काफ्का हा विसाव्या शतकातील एक महत्त्वाचा लेखक, त्याच्या ‘मेटॅमॉफॉसिस’चे भाषांतर उपलब्ध करून द्यावे, याकरता डॉ. सुहास भास्कर जोशी हे अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी केलेले भाषांतर सुबोध आहे. मूळ कथेची आकृती आणि प्रकृती भाषांतरात उत्तम रीतीने आली आहे. प्रस्तुत भाषांतर मराठी वाचकांना एका अपूर्व व महान साहित्यकृतीच्या वाचनाचे समाधान देणारे आहे. याशिवाय या ग्रंथात काफ्काचा जीवनपट आणि त्याचे लेखन, ‘मेटॅमॉर्फोसिस’चे आस्वादक विश्लेषण, त्याच्याशी नाते सांगणाऱ्या साहित्यकृतींचा परामर्श यांचा समावेश केलेला आहे. थोडक्यात, या ग्रंथाचा पैस मोठा आहे. ग्रंथाच्या शेवटी सुहास भास्कर जोशी म्हणतात, ‘काफ्का आणि ‘मेटॅमॉफोसिस’ला मरण नाही, किंबहुना ‘मेटॅमॉर्फोसिस’चे गारूड अजूनही कमी झालेले नाही.’ सुहास जोशींनी अत्यंत परिश्रम घेऊन हे गारूड मराठी वाचकांसमोर उभे केले, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! वसंत आबाजी डहाके
पुस्तकाचे नाव : काफ्काचं ‘मेटॅमॉर्फोसिस’ : न संपनारं गारूड
लेखक : डॉ. सुहास भास्कर जोशी
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या : 140
किंमत : 200/-
पुस्तकाची Amazon लिंक :

नशायात्रा
ही गोष्ट आहे एका अधोगतीची. ब्राऊन शुगरसारख्या जालीम व्यसनांच्या आहारी जाऊन रस्त्यावर आलेल्या एका तरुणाची. मध्यमवर्गीय संस्कारांतला तरुण व्यसनांमुळे घरदार-नातीगोतीच नव्हे, तर आपलं माणूसपणही कसं हरवून बसतो त्याची. माणूस व्यसनांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा त्याचं काय होतं? व्यसनांचा एकेक टप्पा ओलांडत तो त्यात गुरफटत जातो. ही व्यसनं त्याच्या शरीरावरच नव्हे तर मनोबलावरही परिणाम करतात. आई-वडील अन् जिवलगांचं प्रेमही त्याला मदतीचा हात देऊ शकत नाही, आणि आपलं चुकतंय हे कळत असूनही तो व्यसनांच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकत नाही. बाहेर पडला तरी पुन्हा पुन्हा त्याच दुष्टचक्रात अडकत राहतो. हे सगळं एखाद्या माणसाच्या आयुष्यात घडतं तेव्हा त्याच्या आयुष्याची पुरती ससेहोलपट होते. …पण मनात जिद्द असेल तर ही नशायात्रा रोखून तो पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करू शकतो. अशाच एका माणसाची प्रांजळ आत्मकथा.
पुस्तकाचे नाव :
लेखक : तुषार नातू
प्रकाशक : समकालीन प्रकाशन
पृष्ठसंख्या : 174
किंमत : 200/-
पुस्तकाची Amazon लिंक :

हेडाम
व्यंकटेश माडगूळकर, शंकराव खरात, उत्तम बंडू तुपे, लक्ष्मण माने, मेघा पाटील, नवनाथ गोरे, कैलास शिंदे अश्या अनेक साहित्यिकांच्या साहित्यात माणदेशचा प्रदेश चित्रित झालेला आहे. पशुपालन भटक्या जमातींचा ऊन,वारा, पाऊस आणि अंधश्रध्दा, अज्ञान यांच्यासह जीवन प्रवास ही ओळख आहे. अभावग्रस्ततेत तग धरून राहण्याची जन्मजात मिळालेली बाळगुटी. शेळ्या, मेंढ्या, गाई गुरे हे कुटुंबातील घटक. सातत्याने दुष्काळ. जनावरे, माणसाच्या पोटासाठीची भटकंती ही माणदेश ची अविभाज्यता राहिली आहे. नागू वीरकर यांची ‘ हेडाम ‘ हीच परपरा अधिक ठळक करणारी आहे तशी या परंपरेतील माणदेश च्या अभावग्रस्ततेला छेद देणारी, लोकसांस्कृतीक परीघ विस्तारणारी, शिक्षणाने एकूण जगण्यात परिवर्तनाचे पडसाद ठळक करणारी, अस्सल माणदेशी लोकभाषेचा ऐवज लेवून, मेंढ्या गुरांसह माणसाच्या जगण्यातील बदलत्या अस्तित्त्ववाची नोंद करणारी ही कलाकृती आहे. शेरडा मेंढरांच्या कळपाबरोबर आपले आयुष्य घेऊन फिरणाऱ्या नागु या धनगराच्या मुलाची कहाणी सर्व पशुपालक आणि स्थिर, सुस्थितीत जीवन जगणाऱ्यांना प्रेरणा देणारी आहे. नागू च्या आई-वडिलांना शाळा मास्तर भेटणे आणि त्याच्या जीवनाला कलाटणी मिळणे हा या कादंबरीचा केंद्रबिंदू असला तरी या कादंबरीला अनेक कांगोरे आहेत. मानदेशाचा मुलगा मुंबईकर होणे असा एक प्रवास या दृष्टीने बघता येतो. धनगराच्या मुलाची शिक्षणासाठीची अडथळ्याची शर्यत किंवा पशुपालक जमातीचे उघडे वागडे जीवन, धनगर समाजाचे सामाजिक वास्तव, धनगरांचा सांस्कृतीक दस्तऐवज, भटक्यांची असुरक्षितता, सुंबरान, भाकणुक व ओवीतील सांस्कृतिक अनुबंध या आशयनिष्ठतेसह या पुस्तकातील कथनात्मकता, विरकरांची माणदेशी व्यक्तीचित्रे, माणदेशी भाषावैभव असाही विचार करता येईल.
पुस्तकाचे नाव :
लेखक : नागु विरकर
प्रकाशक : समिक्षा पब्लिकेशन
पृष्ठसंख्या : 256
किंमत : 320/-
पुस्तकाची Amazon लिंक :

There were a large number of people who fell for Manohar Parrikar and the number of such people admiring him posthumously to this date is not less. At the beginning of his political career, everyone admired Parrikar. His simple lifestyle and noble thoughts, dedication to work, love for social work, a knack for attracting people, and philosophy of life appealed to everyone. The whole of Goa appreciated him in recognition of his qualities and capabilities to lead the State. Not even a hardcore supporter of Parrikar will ever claim that Parrikar never took unilateral decisions but his normal tendency was to listen to the views of everyone and then arrive at a decision. Sometimes while prioritising the interests of people, he even had to compromise with his own views. Nonetheless, he had the spirit to implement these decisions effectively. He also had the courage to face the effects of his unilateral decisions. For example, it was his unilateral decision on the issue of government grants for private English medium schools. It was not easy to make such a decision in situations prevailing those days. It was not the case that he was not unaware he would have to face the wrath of his own people on this issue. Parrikar always took decisions being fully prepared to face the consequences, come what may. – Waman Subha Prabhu
पुस्तकाची Amazon लिंक :

तसा हा शेतीचा धंदा म्हणजे डोक्याला ताप होता; कधीही न संपणारा कायमचा व्याप होता अन् कदाचित पाचवीला पुजलेला तो आदल्या जन्मीचा शाप होता. इथलं जगणं म्हणजे घोर-फिकिरीचं आगर होतं; भीती-धास्तीचं आखर होतं अन् घाता – आघाताचं माहेरघर होतं. इथं दिवस-रात्र राब राब राबावं, जिवाचं रान करून पेरावं, ढोर-मेहनत करीत त्याला खत-पाणी घालून फुला-फळात आणावं अन् ऐन पदरात पडायची वेळ की, त्याच्यावर कसलं तरी गंडांतर यावं; त्याच्यानं त्यानं पुरतं कोलमडून पडावं; असंच काहीसं इथलं जगणं; निव्वळ कस्पटासारखं! त्याच्या केलेल्या कष्टाला, त्याच्या नशिबाला कसली तरी पनवती होती. काही तरी नाट होतं; म्हणूनच त्याचं जगणं असं एकाकी- सुनाट होतं. इथं कधीच सुख नाही; अति जास्तीचा हरिख नाही; म्हणूनच इथला कुणी हसतमुख नाही. उलट तोंडावर रापलेले चट्टे, अंगावर उभे आडवे चरपटे अन् हाता-पायांना जडलेले घट्टे, हीच इथल्यांची कमाई; हीच त्यांची ओळख! इथं फक्त कष्ट आहे, ऐष नाही; इथं फक्त झुरणं आहे; जल्लोष नाही; म्हणून हा जन्मकुळाचा दोष आहे, कुणावरचा रोष नाही ! इथलं असलं हे सगळंच अटळ अन् अनावर आहे, एक निवारलं की, दुसरं समोर आहे; अन् तेही निस्तारलं तरी, पुढचं आणखी ‘आ’ वासून उभं आहे…
पुस्तकाची Amazon लिंक :

हिंदी चित्रपटांतील गाणी आणि विशेषत: जुनी हिंदी गाणी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. केवळ मनोरंजनच नाही तर अनेकदा एखाद्या मूड मध्ये जाण्यासाठी किंवा एखाद्या मूड मधून बाहेर येण्यासाठी, लोकांच्या नकळत खुले आम एखाद्याला निरोप देण्यासाठी आणि इतकंच नाही तर जगण्याचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी ही गाणी कामी आली आहेत आणि येत राहतील. विलास देशमुख यांनी त्याही पुढे जाऊन काव्यामागील कवी आणि कवीमागील माणूस शोधण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे. मुळांत गाणी आणि गीतकार अशा पध्दतीने समजून घेण्याची आस जागी होणं ही गोष्टच त्यांना सामान्य श्रोत्यांपासून वेगळं करते आणि मग आपण त्यांनी दाखवलेल्या शक्यतांचा हात धरून पुढील प्रवास करतो. प्रत्येक घरात गोष्टी सांगणं, ऐकणं अप्रूपाचं असतंच पण या अशा पुस्तकांच्या रूपाने “गाणी सांगणारं”ही कुणीतरी आहे हे विशेष. अनेकानेक शुभेच्छा. वैभव जोशी (प्रसिद्ध कवी आणि गीतकार)
पुस्तकाची Amazon लिंक :

श्री बाळासाहेब लबडे हे तरूण पिढीतील एक प्रयोगशील कवी आहेत. अभ्यासक आहेत. जागतिकीकरणातील जीवनातील विविध अनुभवांनी त्यांच्या कवितेला एक चिंतनशीलता प्राप्त करून दिलेली आहे. प्रारंभपासून आपल्या आगळ्यावेगळ्या अनुभवविश्वामुळे त्यांनी रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. त्यांचा मुंबईची विविधरूपे टिपणारा ‘मुंबई बंबई बॉम्ब’ हा कवितासंग्रह बहुचर्चित आहे. या संग्रहात समाविष्ट करण्यात आलेल्या कविता मुंबईचे कंगोरे प्रकट करणाऱ्या आहेत. मुंबई संबंधीची विविध रूपे प्रकट करणारी त्यांची ही कविता महत्वपूर्ण आहे. मराठी समीक्षेला या संग्रहाला वगळता येणार नाही. मुंबईची ही सारी रूपे पण नजरेत भरणारी. मुंबईचे जीवघेणे बकाल रूप इथे दिसते. जेथे मानवी मूल्यांना कवडीचेही स्थान नाही, अशी ही मुंबई. अत्याधुनिक मुंबईची सारी रूपे विशेषतः बकाल रूपे टिपताना कवी पारंपरिक प्रतिमा, उज्वल परंपरा आणि भक्तीची प्रतिके, यांचा वापर करतो. त्यामुळे मुंबईची ही सारी रूपे अधिक प्रभावीपणे प्रकट होत जातात. येथे एक तान निर्माण होते. मानवी मूल्यांची जपवणूक आणि जगण्याची रेटारेटी असा हा इथला तान आहे. म्हणून कवी टाळ, मृदंग, वारी, मुंबादेवी आणि वारकरी परंपरा यांचा वापर प्रतिमा आणि प्रतिके म्हणून करीत जातात. त्यातून मुळचा अनुभव अधिक प्रत्ययकारी होत जातो. बाळासाहेब लबडे यांचे मुंबई संबंधीचे आकलन मुंबई संबंधीचे असतेच पण त्याचवेळी ते आजच्या भयान वास्तवाचे ही असते. मराठीतील प्रयोगात्म पण महत्वाची कविता म्हणून या संग्रहाकडे पहावे लागते. – प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (माजी अध्यक्ष अ.भा.म.साहित्य संमेलन, चिपळूण.)
पुस्तकाची Amazon लिंक :

अण्णांच्या आंदोलनाला यश मिळालं, तेही मोठं! जेव्हा इतिहास अपेक्षित असं वळण घेत नाही, तेव्हा दगाफटक्याचा संशय किंवा इतिहासाविषयी आकस बाळगण्याचा मोह संभवतो. अण्णांच्या आंदोलनाबाबत लगेचच टीकेचा वरचा स्वर लावून बोलणारी ‘तज्ज्ञ’ मंडळी या दोहोंपैकी एका सापळ्यात सापडलेली दिसून आली. त्यामुळे आंदोलनाला लाभलेली अमाप लोकप्रियता, छोट्या मोठ्या शहरांत स्वयंस्फूर्तीने जमलेली गर्दी, लहान शहरांत गोळा झालेले लहान लहान जमाव आणि खेड्यापाड्यातही बऱ्यापैकी दिसून आलेला रस आणि त्यांनी प्रत्यक्षात उचललेलं पाऊल, अमलात आणलेले कार्यक्रम मान्य करण्यास टीकाकारांची तयारी नव्हती. मध्यमवर्गीय किंवा उच्चभ्रू समाजापुरतंच हे आंदोलन सीमित होतं असं म्हणणाऱ्यांची नेमकी हीच गोची झाल्याचं दिसतं. इतर लोकप्रिय आंदोलनांप्रमाणे याही आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सुखवस्तू आणि ठाकठीक असलेल्या वर्गांचं प्रमाण इतर वर्गांपेक्षा जास्त होतं, पण म्हणून सरसकट सर्वांना मध्यमवर्गीय म्हणणे म्हणजे ही संज्ञा भारताच्या अर्ध्या लोकसंख्येपर्यंत ताणण्यासारखं होईल. योगेंद्र यादव (आम आदमी पार्टी)
पुस्तकाची Amazon लिंक :

प्रत्येक स्त्रीचं आयुष्य ही स्वतंत्र कथा असते. या प्रत्येक कथेत तीच्या आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखांच्या अनंत छटा पाहायला मिळतात. प्रेमकथा, शोककथा, भोगकथा व अशा अनेक कळा घेऊन या कथा सामोऱ्या येतात.‘अळवावरचे पाणी’ या कथासंग्रहातही नायिकाप्रधान कथांची अशीच साखळी आहे. यातील प्रत्येक कथेतून या अनंत छटा पानापानावर भेटतील. यातील कथांतून स्त्री व ‘ती’च्या मनोव्यापारातील असंख्य पैलू उलगडत गेलेले अनुभवास येईल..
पुस्तकाची Amazon लिंक :

दैनंदिन जीवनातील विसंगती, गंमतीदार प्रसंग आपल्या वेगळ्या शैलीतून व विनोदी लेखनातून, कथांद्वारे मांडण्याचा हा आगळा प्रयत्न. वैदर्भीय भाषेतील खुसखुशीतपणा व निरीक्षणांमुळे या कथांची गोडी वाढली आहे. अभियंता असूनही कथा लेखनात रुची ठेवणाऱ्या अशोक शेगोकर ह्यांच्या कथांना हास्यचित्रकार विवेक मेहेत्रे ह्यांच्या मिश्किल चित्रांची जोड लाभली आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

प्रबुद्ध भारताच्या निर्मिती करिता आपण त्रिशरण, पंचशील, अष्टांगमार्ग आणि दहा पारमितांचे पालन करणे अनिवार्य आहे. सोबतच संपुर्ण बौद्ध सणाचे आचरण हे सुद्धा अत्यावशक आहे. उपोसथ कशाला म्हणतात ? उपो म्हणजे उपासना आणि सथ म्हणजे स्वतःची, स्वतःची सुयोग्यप्रकारे उपासना, सविनय स्वतःच्या अगदी जवळ येणे, नेहमीच्या बहिर्मुखी असणाऱ्या स्वभावाचा सर्वांगाने त्याग करणे स्वतःमध्ये असलेले निसर्गदत्त् सद्गुण शोधून त्यांना वाढविणे आणि दुर्गुण शोधून त्याला हळु-हळु कमी करणे आणि कोणत्याही काल्पनिकशक्तीच्या, तथाकथित देविदेवतांच्या अंधश्रद्धा, कर्मकांड, अंधरुढी आणि अंधपरंपरेच्या मागे न लागता आपल्या नैसर्गिक सत् सत् विवेक बुध्दीचा सुयोग्य वापर करून लाभान्वित होणे होय. आपल्या आदर्शाच्या, महामानवाच्या जयंत्या, स्मृतिदिन आणि बुध्दप्रणित अरियअष्टशील उपोसथ दिन आपणास आपल्या इतिहासाची, कर्तव्याची व संस्कृतीची ओळख करून देत असतात.
पुस्तकाची Amazon लिंक :

माणूस घराबाहेर पडतो तसं तोवरच्या चार भिंतीत न दिसलेलं एक विशाल जग त्याच्यासमोर उभं ठाकतं. तो अचंबित होतो, सुखावतो, दुखावतो, अस्वस्थ होतो, हादरून जातो. आणखी बरेच काही काही त्याच्या बाबतीत घडतं. ‘विराट दर्शन’ विलक्षण असतं. ते आजवरच्या त्याच्या समजुतींना हादरा देतं. स्थलांतरितांना ज्या दिव्यांतून जावं लागतं त्यातून स्वतः श्रीनिवास सावंत गेले आहेत. कमालीची फरफट, उपेक्षा, मनोभंग, नैराश्य, आर्थिक आघाडीवर दिसामाजी लढत राहणे, आपल्या शिक्षणाला व कुवतीला साजेशी नोकरी मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहणे अशा अनेक समस्यांना सावंत स्वतः सामोरे गेले आहेत. पण सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे त्यांच्या भोवताली सतत वावरत असणाऱ्या स्थलांतरितांच्या वेदनांनी ते कळवळत राहिले. काळजात त्यांच्यासाठी कालवाकालव होत राहिली. परंतु त्याचबरोबर त्या सर्वांच्या वाटचालींचा अतिशय बारकाईने वेध घेत राहिले. त्यातून जो ऐवज त्यांच्या हाताला लागला तो म्हणजे हे पुस्तक ! स्थलांतरितांच्या या कथा सांगताना श्रीनिवास सावंत म्हणतात, या त्यांच्या पराजयाच्या वा विजयाच्या कथा नाहीत तर त्यांच्या जगण्याच्या कथा आहेत. श्रीनिवास सावंत यांचा हा ‘आश्रितांचाही देश’ घरचा उंबरठा ओलांडल्यानंतर बाहेरच्या जगाचं विलक्षण असं जे विराट दर्शन घडवितो त्यासाठी अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहे. – अशोक राणे (ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, लेखक आणि दिग्दर्शक)
पुस्तकाची Amazon लिंक :

भारी ६०
पुस्तकाची Amazon लिंक :

सुस्वरूप कल्पना आपला ओढगस्तीचा कारकुनी संसार नेकीने सांभाळत होती. थोडीफार हौसमौज करावी, लेकीचे लाड पुरवावेत, नवऱ्याचा ताण हलका करावा असं तिला वाटायचं, पण घरी नोकरी करणं पसंत नव्हतं. मग पैशाच्या, सुखाच्या आशेनं ती वळते स्त्री-बुवाबाजीकडे. अंगत येणं, अंगारे-धुपारे, प्रसाद वगैरे सुरू होतं. अर्जुन गोळे एक श्रीमंत, हुशार, बिनलग्नाचा तरुण एक्झिक्युटिव्ह. तो कल्पनाचं वर्म ओळखून तिला आपल्या जाळ्यात ओढायचं ठरवतो. कल्पना या जाळ्यतून बाहेर पडण्यासाठी एक धाडसी बेत आखते. आणि एक अष्टमीच्या रात्री घागर फुंकता फुंकता अर्जुन गोळेचा खून होतो. स्त्री-बुवाबाजीवर झोत टाकणारी सत्यघटनेवर आधारित कादंबरी.
पुस्तकाची Amazon लिंक :

आपला माणूस आपल्यासाठी
माणसं भेटतात. काही मनात घर करतात. त्यांच्या आपुलकीनं जीवाभावाचं नातं निर्माण होतं. त्यांना विसरणं शक्य नसतं. अशाच एका अतूट नात्यानं बांधणारे आणि माणुसकीनं सर्वांना आपलंसं करणारे मा. भाऊसाहेब वाकचौरे, हे एक कृतज्ञेच्या औदार्याचं एक तीर्थक्षेत्र आहे! सतत संघर्ष करून त्यांनी उत्तुंग शिखर सर केलंय. दुर्दैवाशी दोन हात करून, बिकट परिस्थितीवर मात करून सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती मिळवली आहे; परंतु विनय, विवेक आणि विरक्त भाव या सद्गुणांनी ते अधिकच वैभवशाली वाटतात. मातापित्याचं छत्र हरपलं. एकटेपणावर विजय मिळवत अथक कष्ट करून प्रचंड यश मिळवलं. नामवंत, प्रज्ञावंत आणि कलावंत म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या घराण्यात कुणीही राजकारणी नसताना एकनिष्ठपणे समाजसेवा करून खासदारपदापर्यंत पोहोचले. एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ते दिल्लीपर्यंत पोहोचले, याला एकच कारण- विनम्र सेवाभाव.
पुस्तकाची Amazon लिंक :

सरमिसळ
हे पुस्तक माझ्या ललित लेखांचा संग्रह आहे. त्यात कोस्टल कर्नाटकच्या पावसापासून इडली पुराण आहे. अमेरिकेपासून चेरापुंजीचा प्रवास आहे. स्टेशन आहे, वाघोबा आहे, काही फिल्मी लेख आहेत आणि मोह टाळता आला नाही म्हणून क्रिकेटचे एक दोन लेटेस्ट लेख घेतले आहेत. ही तशी आवळ्याभोपळ्याची मोट आहे. किंवा हवं तर तिला आपण मिसळ म्हणू. सरसकट केली म्हणून सरमिसळ !! आडनावात स्वादी आहे म्हणून त्यात स्वाद असेलच असे गृहीत धरत नाही. प्रकाशक श्री. विलास पोतदार यांचे खास सरमिसळ
पुस्तकाची Amazon लिंक :

जे जे आपणांसी ठावे…
“जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांना सांगावे” या निर्मळ भूमिकेतून लिहिलेले हे विविध विषयांवरचे लेख आहेत. यामध्ये भारतीय ज्यू समाज आणि भारतीय पारशी समाज यांनी केलेल्या बहुमोल योगदानाचा विषय आहे, विविध देशात भारताचे राजदूत किंवा उच्चायुक्त या पदांवर काम केलेल्या मराठी व्यक्तींचा लेखाजोखा आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सौन्दर्य स्पर्धांमधला भारतीय आणि विशेषकरून मराठी युवतींच्या सहभागाचा ऊहापोह आहे, दिग्गज खेळाडू दांम्पत्यांची उदाहरणे आहेत, सार्वत्रिक निवडणुका लढलेल्या भारतीय क्रिकेटपटूंचा तपशील आहे, दक्षिण ध्रुवाजवळच्या बर्फाच्छादित अंटार्क्टिकाचे मनमोहक वर्णन आहे, क्रोएशिया, आर्मेनिया या फारश्या परिचित नसलेल्या देशांचा मनोवेधक परिचय आहे, इतकेच नव्हे तर गाढव हा प्राणी माणसाने कसा बदनाम केला आहे याची गमतीदार मांडणी या लेखसंग्रहात आहे. लेखकाने ब्रिटनच्या चलनी नोटेवर झळकलेल्या लेखिका जेन ऑस्टिनसंबंधी लिहिताना किंवा महात्मा गांधी यांच्या परदेशात स्थापितपुतळ्यांसंबंधी विस्तृतपणे लिहिताना काही गोष्टी विनम्रपणे सूचित केल्या आहेत, त्या विशेष लक्षणीय आहेत. मुळातच बहुमोल माहितीने समृध्द असलेला हा लेखसंग्रह यथायोग्य छायाचित्रांचा सढळ आणि सुयोग्य वापर केल्याने अधिकच आकर्षक झाला आहे. प्रबुद्ध वाचक प्रवीण कारखानीस यांच्या या लेखसंग्रहाचे स्वागत करतील यात शंकाच नाही. श्री. प्रवीण कारखानीस यांच्या यापुढील लेखनाच्या आणि प्रवासाच्या वाटचालीला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा ! – डॉ. नरेन्द्र जाधव
पुस्तकाची Amazon लिंक :

आठवणी माणसांच्या
‘आठवणी माणसांच्या’ या पुस्तकात वेगवेगळ्या क्षेत्रांत, वेगवेगळ्या कालखंडात उत्तुंग काम करून गेलेल्या निवडक चौदा लोकांच्या जीवनगाथा आहेत. रविंद्रनाथ टागोर, शांताबाई शेळके, आचार्य विनोबा भावे, मुकुंदराव किर्लोस्कर, ग. प्र. प्रधान यांच्या बरोबरच, फारशी आता स्मरणात न राहिलेली नावंही आहेत. जयशंकर सुंदरी, पन्नालाल पटेल, जशवंत ठाकर, उमाशंकर जोशी ही त्यापैकीच काही. या लोकांपैकी बहुतेकांशी लेखिकेच्या गाठीभेटी झाल्या होत्या. काही मात्र वाचनातून त्यांच्या मनावर ठसलेल्या व्यक्तीरेखा आहेत. लेखिकेची आई, आजी, आजोबा – डॉ. य. खु. देशपांडे यांचीही व्यक्तीचित्रे त्यांच्या जगण्याचे विशेष पैलू उलगडून दाखवतात. वाचकांना एक अनोखे व्यक्तीदर्शन या पुस्तकातून नक्कीच होईल.
पुस्तकाची Amazon लिंक :

चाळीत प्रवेश करताना वर्षानुवर्ष वापराने झिजून गेलेल्या पायरीवर पाय ठेवताच चाळीत घालवलेले ते दिवस आठवतात. जिन्याने शिकवलेली जिनेकी राह, आजही आयुष्याच्या मार्गावर सरळपणे चालायला मार्गदर्शक ठरते. तिथून पुढे आल्यावर गॅलरीत ठेवलेला प्रत्येकाचा घरात न मावणारा बारदाना, पाण्याची पिंपे ‘ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ या वाक्याची आठवण करून देतात. दहा बाय बारा एवढ्याशा जागेत रहाताना जागेचे व्यवस्थापन कसे करावे याचे पद्धतशीर शिक्षण चाळीच्या या जीवनात मिळाले होते. टवाळ कट्ट्यांवर टवाळक्या करण्याचा हक्क लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनीच उपभोगला होता. आर्थिक स्तर दुर्बल असतानाही या सगळ्या अडचणींवर मात करून हसतमुख रहाण्याचे मिळालेले शिक्षण आज आयुष्यात आलेल्या मोठमोठ्या संकटांना तोंड द्यायला मदत करते. संपूर्ण चाळ हे एक खुल्ली किताब होती. कोणाचीही कोणतीच गोष्ट कधीच खाजगी रहात नव्हती. आपल्याला असलेल्या अभावाचा बाऊ करणे ज्यांच्या स्वभावात असते त्यांना चाळीने केलेल्या या प्रभावाचा विसर पडतो. पण असे असले तरी अभाव शोधायला का होईना चाळीत काढलेले दिवस प्रत्येकाला आठवतात हे मात्र नक्की. हे पुस्तक चाळीच्या आठवणींचा असाच एक कोलाज आहे. कोणत्याही प्रकारे कोणत्याही चाळीचा किंवा चाळ संस्कृतीचा अधिकृत इतिहास नाही हे वाचकांनी पुस्तक वाचण्यापूर्वी समजून घ्यावे. डॉ. (नरु)भाऊ कदम
पुस्तकाची Amazon लिंक :

श्री ज्ञानेश्वरांच्या प्रतिमा सृष्टीकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहणारे हे पुस्तक आजच्या विज्ञान अभ्यासकाला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ समजून घेण्यासाठी साहाय्य करील असे वाटते. आज आपण ज्याला वैज्ञानिक सत्ये म्हणतो अशी कितीतरी सत्ये बीजरूपाने श्री ज्ञानदेवांच्या अनेक ओव्यांमधून आपल्याला दिसतात. श्री ज्ञानदेवांनी मांडलेल्या या प्रतिमा आणि त्यामागे त्यांना अभिप्रेत असलेला ब्रह्मविज्ञेचा अर्थ सुलभतेने उलगडण्यास आजच्या युवा वाचकांना ही वैज्ञानिक दृष्टी कदाचित मदतच करील. ज्ञानेश्वरी हा केवळ एक टीका ग्रंथ नसून मानवी जीवनाची ती सर्वसमावेशक अशी भूमिका आहे. या ग्रंथसागरात अगणित रत्ने आहेत. प्रत्येकाला त्याच्या रुचीप्रमाणे रत्न आवडेल आणि त्याला उमगलेले त्याचे सौंदर्य तो कौतुकाने इतरांना दाखवील. या ग्रंथाबाबत श्री ज्ञानोबा माउलींची विनयपूर्वक क्षमा मागून त्यांच्याच शैलीत सांगायचे झाल्यास – “हा तो ज्ञानाचा सागरू । विविध रत्नांचा आगरू । न सरे ऐसा भांडारू । अक्षय ठेवाचि ॥’ ।। हरि ॐ ।।
पुस्तकाची Amazon लिंक :

निसर्गाची मुक्त उधळण, विस्तीर्ण समुद्रकिनारे, नारळी पोफळीच्या बागा म्हणजे कोकण ! याबरोबरच तिथली माणसं, त्यांचं वागणं-बोलणं आणि अजब तर्कशास्त्र हीदेखील कोकणची वैशिष्ट्यंच. जोडीला तिथल्या वातावरणाला मिळालेली गूढ किनार…’कैलासचाफा’मधील कथा / लेख / व्यक्तिचित्र म्हणजे हे कोकण होय. कधी प्रसन्न करणारं, कधी गालातल्या गालात हसवणारं, कधी धास्तावणारं, तर कधी हूरहूर लावणारं! कोकणचं प्रत्येक वैशिष्ट्य या लेखनात परिणामकारकपणे उमटलं आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

प्रतिभाताईंच्या कल्पनाविश्वाला भविष्याचा वेध घेण्याची आस तर आहेच; तथापि सतत प्रगतिपथावर असणाऱ्या विज्ञानयुगातल्या माणसाचं पुढे काय होणार याची उत्सुकता आणि काळजीही आहे. त्यांच्या विचारविश्वात विचारवंत, सुधारक, शास्त्रज्ञ, पराक्रमी स्त्रिया, विद्वान स्त्रिया, पिचलेली, नियतीला शरण जाणारी माणसं, धर्म, संस्कृती, कला, निसर्ग हे सगळं आणि त्याशिवाय अजूनही बरंच काही शतपावली घालत असतं. म्हणूनच ताईंशी गप्पा मारणं हा एक श्रीमंत करणारा अनुभव असतो.
पुस्तकाची Amazon लिंक :

सावधान.. वळण धोक्याचे आहे
“सावधान…… वळण धोक्याचे आहे !” विषयी थोडेसे…. असे म्हणतात, की माणसाचे मन हे अत्यंत गुंतागुंतीचे असते. निरनिराळ्या भावनांचे एक अद्भूत मिश्रण म्हणजेच माणसाचे मन. याच मनाचे दोन सर्वात महत्त्वाचे पैलू म्हणजे भीती आणि लालसा…. भीती, मनुष्य स्वभावाचा एक महत्वाचा भाग. येणाऱ्या धोक्याची संपूर्ण जाणीव व त्याबद्दलची अनुभवास येणारी भावना म्हणजेच भीती. भीतीचे अनेक प्रकार असतात, ज्याला इंग्रजीत फोबिया असेही म्हणतात. उंचीची भीती, पाण्यात बुडण्याची भीती, एखाद्या जनावराची भीती, अपघाताची भीती वगैरे. ही भीती माणसाच्या मनात खोलवर दडून बसलेली असते. या सर्वांमध्ये एक भीती असते ती अनैसर्गिक ताकदी म्हणजेच Paranormal Activities बद्दल. समोर आलेली एखादी अमानवी शक्ती किंवा विचित्र घटना व त्यातून समोर येणारे प्रसंग माणसाच्या मनाचा वेध घेतात…. माणसाच्या जीवनात अनेक गुंतागुंतीची, भीतीदायक वळणं येतात. याच वळणांवर कधी मनुष्याला मदत करणारे भेटतात तर कधी हाव, लालूच, भीती असे शत्रूही समोर येतात. वळणाच्या दुसऱ्या टोकाला आपल्यासाठी काय वाढून ठेवलं आहे त्याचा कधीच ठाव लागत नाही. सावधान…. वळण धोक्याचे आहे….. या पुस्तकात अशाच गुंतागुंतीच्या, गूढ आणि भयकथा आहेत. या सर्व कथा काल्पनिक असल्या तरी त्यातले प्रसंग, पात्र किंवा घटना कुठे ना कुठे पाहिल्या असतील, अनुभवल्या असतील हे वाटल्यावाचून राहणार नाही हे नक्की…….. माझ्या समस्त मित्रपरिवाराचा मी आभारी आहे. कारण लेखानाची माझ्यातली प्रतिभा कागदावर साकारायला या सर्वांच्या पाठींब्याचा फार मोठा आधार आहे. ‘आराध्य प्रकाशन’च्या मानसी ताम्हनकर, यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, ज्यांच्यामुळे माझं हे लेखन आज तुमच्यासमोर येऊ शकलं….
पुस्तकाची Amazon लिंक :

मेधाविनी
अर्थशास्त्र व राज्यशास्त्रात १९७८ साली बी.ए.ची पदवी प्राप्त केलेले आद. यशवंत बैसाणे यांनी ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर राजपत्रित पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांच्याकडे यास्तव शासन सेवेचा प्रदीर्घ अनुभव तर होताच. त्या शिवाय खाजगी छापखान्यापासून पंचतारांकित सेंटॉर हॉटेल, तसेच आयकर विभागामधील सेवेचा अनुभव त्यांनी संपादित केला. त्या अनुभवाचा त्या-त्या क्षेत्रातील सहकारी कर्मचारी वर्गाला फायदा मिळवून देण्यासाठी झटत आलेले आहेत. याच दरम्यान कर्मचारी संघटना बांधण्याचा मूलभूत हक्क नाकारणाऱ्या हिटलरशाही वृत्तीच्या विरोधात न्यायालयीन लढा देताना नऊ वर्षे सेवेतून निलंबित झाले. तरीही शोषित, पिडीत कर्मचारी बंधू-भगिनींना न्याय देण्यासाठी सातत्याने पुढे राहिले. ‘मोहाडीचे तात्यासाहेब’ या स्मरणिकेचे सहसंपादन, त्याचबरोबर वृत्तपत्र व नियतकालिकांतून कथा, लेख व प्रासंगिक लेखनाबरोबरंच मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अनेक संघटनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. आजवरच्या जीवनप्रवासात सान्निध्यात आलेल्या विविध वृत्ती, व्यक्तिमत्त्वांचा उमटलेला सकारात्मक ठसा ‘मेधाविनी’ या कथासंग्रहाच्या निमित्ताने त्यांनी शब्दबद्ध केला आहे. यातील कथांना सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेची किनार आहे. प्रत्येक कथेतील क्षणाक्षणाची गूढ उत्कंठा हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. समाजाप्रति असणाऱ्या जाणीवांच्या बाबतीत कृतघ्न होणाऱ्या तथाकथित उच्चभ्रू लब्धप्रतिष्ठितांना आपल्या सामाजिक बांधिलकीचे उत्तरदायित्व निभावण्याचे स्मरण करून देणे हाच प्रस्तुत लेखकाचा या ‘मेधाविनी’ च्या निमित्ताने मूळ उद्देश आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

प्रतिक्षिप्त
व्यक्ती-समष्टीत अंतराय न मानणारी आणि तरीही त्यातली द्वंद्वात्मकता नजरेआड होऊ न देणारी ‘प्रतिक्षिप्त’ मधील लेखकीय संज्ञा आपल्याला भयंकराच्या दरवाजाची अजस्त्र विक्राळता निरनिराळ्या मितींमधून, निरनिराळ्या भिंगांमधून निर्दयपणे दाखवत राहते. या लेखकीय संज्ञेत अनुस्यूत असलेलं लखलखीत राजकीय भान आपल्याला जराही सैलावायला उसंत देत नाही. यात आसूड आहेत, प्रहार आहेत, वार-प्रतिवार, डावपेचात्मक पवित्रे आहेत आणि त्याच्या प्रकटीकरणासाठी उपहास, उपरोध, विडंबन, वितंड ही पवारांच्या भात्यातली नेहमीची यशस्वी हत्यारंही आहेत. वैयर्थतेने भरलेल्या, असहिष्णुतेने चिरफाळत चाललेल्या, भयाण हिंसेच्या, क्रौर्याच्या टकमक टोकावर उभ्या असलेल्या सद्यकालीन सभोवाराचा उभा-आडवा छेद आणि वेध घेणारं हे जळजळीत क्षोभनाट्य आहे. – प्रज्ञा दया पवार
पुस्तकाची Amazon लिंक :

कस्टम्स् नाईट
साहेबांनी एकंदरीतच सर्व प्रकरणाचा, मुळापासून गांभीर्याने विचार केला. त्यांना मनातून खात्री वाटत होती की समोरची तरुणी खरं बोलते आहे. नटराजन साहेबांचे सुद्धा आतापर्यंतचे रेकॉर्ड चांगले होते. पण वस्तुनिष्ठ पुराव्यांकडे दुर्लक्ष करता येत नव्हतं. रेवती चंद्रन ही तरुणी यात पुर्णपणे फसली गेली होती. विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली माहिती आणि हा आत्ता आलेला फोन… नक्कीच काहीतरी मोठं कारस्थान शिजत होतं. डाव-प्रतिडावु, सत्य-असत्य, हेरगिरी, अमली पदार्थांची तस्करी आणि तून आकार घेणारं देशव्यापी षड्यंत्र यांचा थरार अनुभवायला लावणारी कादंबरी
पुस्तकाची Amazon लिंक :

स्वल्पविराम
‘स्वल्पविराम’ हा कथासंग्रह आत्मचिंतनपर गोष्टींचा अनोखा कोलाज आहे. या गोष्टींमध्ये भूतकाळाची स्मृतिकातरता आहे, परखड आत्मशोध आहे, वर्तमानाचा वस्तुनिष्ठ स्वीकार आहे आणि भविष्यवेधी कल्पनाही आहेत. वैचारिक, तात्त्विक, भावूक, काल्पनिक अशा अनेक प्रकारच्या ललितगद्याचा हा मनोज्ञ कथासंग्रह आहे. या कथांना असलेली फँटसीची जोड वाखाणण्याजोगी आहे. नंदिनी विनय देशमुख या मुळात विज्ञानाच्या प्राध्यापक. विद्यार्थीप्रिय शिक्षिका आणि तरुणांच्या मार्गदर्शक म्हणून त्यांचा लौकिक आहे. विज्ञानलेखिका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत विविध विषयांवर शेकडो विज्ञानलेख त्यांनी लिहिले आहेत. त्यांच्या विज्ञानलेखनाचा पट विस्तृत आहे. त्यांच्या कसदार लेखणीने यावेळी सांधा बदलून आगळा विषय आणि शैली साकारली आहे. विज्ञानातील नवे संशोधन, घटना यांचा मागोवा सतत शोधकपणे घेणाऱ्या त्यांच्यातील सृजनशील लेखकाने यावेळी स्वतःच्या मनाच्या गाभाऱ्यात डोकावून आत्मशोध घेतला आहे. तो या कथांमधून वारंवार डोकावतो. या आत्मशोधपर चिंतनिका किंवा कथा मनाला भिडणाऱ्या आणि अंतर्मुख करणाऱ्या आहेत. – शुभदा चौकर
पुस्तकाची Amazon लिंक :

मुक्काम पोस्ट अटलांटा व्हाया दहिसर
आपल्या देशात अमेरिकेबद्दल प्रचंड कुतूहल आहे पण आपल्या येथील ज्येष्ठ पिढीला अमेरिकेबद्दल जेवढी उत्सुकता आहे तेवढीच तिच्या मनात अमेरिकन मुक्त संस्कृतीची एक प्रकारची भीतीसुद्धा आहे आणि या वयात अमेरिकेला गेल्यावर तिथे आपला कितपत निभाव लागेल अशी चिंता तर मनात नेहमीच असते. हे लिखाण म्हणजे अटलांटा किंवा अमेरिकेचा इतिहास नाही किंवा अमेरिकन संस्कृतीचे उदात्तीकरणही नाही, गेल्या काही महिन्यातील माझ्या जॉन्स क्रीक, अटलांटा येथील वास्तव्यात मला जे आढळून आले, जे माझ्या दृष्टिपथात आले अशा अनेक गोष्टी मी इथे नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक अटलांटाचे प्रवासवर्णन जरी असले तरी त्याचबरोबर अमेरिकन जीवनमान, तिथे स्थायिक झालेल्या आपल्या तरुण पिढीची बदललेली जीवनशैली, त्या तरुण पिढीचा आणि इथल्या ज्येष्ठ पिढीचा होणारा वैचारिक आणि मानसिक संघर्ष याचेही लिखाण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. – रवी मल्ल्या
पुस्तकाची Amazon लिंक :

काल-त्रिकाल
या कादंबरीच्या निमित्ताने एक भव्य आणि विशाल असा कालपट चित्रित करण्याचा तुमचा मानस होता आणि हे सोपे काम नव्हतेच. एका अर्थाने अविभाज्य असे काळाचे तीन टप्पे तुम्हाला अभिप्रेत होते. नजीकच्या इतिहासातला एक, स्वातंत्र्योत्तर काळातला दुसरा आणि सद्यःकाळातला तिसरा असे काळाचे त्रिखंड तुम्ही मांडलेत. त्यांचे सातत्यही मांडलेत. सलगताही मांडलीत. अविभाज्यताही मांडलीत. हे करताना लेखकाचा कस लागू शकतो. तुमचाही लागला असणार. दमछाक होऊ न देता भव्य पटल उभं करायचं आहे, विस्तृत निवेदन मांडायचं आहे, बखरीच्या वृत्तांतवजा शैलीची मदत घ्यायची आहे. भाष्य मात्र सद्यःकालावर करायचं आहे. हे अवघड काम तुम्हाला साधायचं होतं. ते तुम्ही साधलंत. यशस्वीपणे साधलंत. या संदर्भात तुमचं अभिनंदन करायचं होतं पण तुम्ही गमनाची घाई केलीत म्हणून आता, तुमचे अभिनंदन या पत्रान्वयेच करतो आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

प्लासी, पानिपत आणि बक्सर
१७५७ साली झालेली प्लासीची लढाई ही बऱ्याच इतिहासकारांच्या मते लष्करी दृष्ट्या केवळ चकमक म्हणावी या दर्जाची होती. इंग्रज आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये झालेली ही लढाई ही खरे म्हणजे पीडलेल्या मुघल अधिकाऱ्यांनी आणि अन्यायग्रस्त हिन्दू व्यापाऱ्यांनी इंग्रजांच्या मदतीने सिराज उद्दौलाच्या क्रूर आणि मनमानी राजवटीविरुद्ध केलेले बंड होते. १७६१ साली पानिपत येथे अहमद शहा अब्दाली विरुद्ध महायुद्धासमान झालेल्या लढाईत मराठ्यांचा मोठा पराभव झाला, पण या पराभवामुळे हिन्दुस्थानच्या राजकारणात झालेली मराठ्यांची पिछेहाट जेमतेम दहा वर्षे टिकली, तरीही पानिपतच्या पराभवाची सल ही मराठी अंत:करणातून काही जात नाही.पनिपतचे युद्ध ही मराठी माणसाच्या शौर्याची, त्याच्या अस्मितेची, त्याच्या पराक्रमाची, त्यांच्या पराकाष्ठेच्या परिश्रमांची तशीच त्यांच्यातल्या आपसातल्या हेव्यादाव्यांची, त्यांच्यातल्या भाऊबंदकीची, त्यांच्यातल्या मुत्सद्दीपणाच्या अभावाची आणि शेवटी त्यांच्या हौतात्म्याची कथा आहे. १७६४ साली बक्सर येथे इंग्रजांविरुद्ध बंगालचा पदच्युत नवाब मिर कासीम, अवधचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशहा शहा आलम २ यांनी एकत्र दिलेल्या लढाईचे नावही जरी अनेकांनी ऐकले नसले तरी या मध्यम श्रेणीच्या लढाईतील विजयामुळे इंग्रजांना मुघल बादशहाकडून बंगाल सुभ्याचा महसूल वसूल करण्याचे अधिकार कायमचे प्राप्त झाले व त्यामुळे इंग्रजी सत्तेचे पाय हिन्दुस्थानात भक्कमपणे रोवले गेले. एका वेगळ्या दृष्टीकोनातून हिन्दूस्थानातल्या या तीन भिन्न श्रेणींच्या लढ्याचे केलेले वर्णन आणि विवेचन रसिक वाचकांच्या मनाचा वेध घेईल यात शंका नाही.
पुस्तकाची Amazon लिंक :

कानोसा : ग्रामीण स्त्रीच्या शरीर व मनातील गुपितांच
भारतीय समाजात स्त्री-पुरुष संबंध, म्हणजे जीवन- प्रजनन या अतिशय नाजूक, संवेदनक्षम व गुप्त गोष्टी मानण्यात येतात. परंतु डॉ. राणी बंग यांनी केलेल्या या अध्ययनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दोन खेड्यां- मधील स्त्रिया, त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक खाजगी, गुप्त गोष्टी अगदी मनमोकळेपणाने बोलल्या आहेत. त्यांचे हे समज-गैरसमज प्रातिनिधिक वाटतील…
पुस्तकाची Amazon लिंक :

शिवणकला – एक छंद : स्मॉकींग
मुंबईतील शिवाजीपार्क परिसरात गेली अनेक वर्षे हेमा कळके नावाचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व त्यांच्या शिवण कामातील यशस्वी वाटचालीमुळे अनेकांच्या परिचयाचे झाले आहे. मानसशास्त्राची पदवी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊनही शिवणाचा छंद त्यांनी मनापासून जोपासला आणि वाढवला. अनेक वर्षे उत्तमोत्तम कपडे ऑर्डर्सप्रमाणे शिवण्याचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी बांधला. आपल्या कलाकृतींना आणि विद्यार्थिनींच्या उमलत्या कलागुणांना प्रदर्शनाच्या माध्यमातून वेळोवेळी प्रदर्शित केले. स्मॉकींग करून कपड्यांची शोभा वाढवण्यात त्यांचा हातखंडा आहे. गेली अनेक वर्षे अनेक विद्यार्थिनी त्यांच्याकडून शिवण शिकून समाधानानं आणि आत्मविश्वासानं बाहेर पडल्या. त्या विद्यार्थिनी आपापले व्यवसाय यशस्वीपणाने सांभाळत आहेत. काही जणी तर हेमाताईंचा शिवणाच्या शिक्षणाचा वसाच पुढे चालवत आहेत. त्यांची मनोगते पुस्तकात आपणास वाचावयास मिळतीलच. फॅशन्सची पुस्तके आणि शिवणकामावरील पुस्तके वेगवेगळे आपल्याकडे मिळतात. पण स्मॉकींग आणि तत्संबंधी कपड्यांच्या प्रकारातील अनेक फॅशन्स कशा बेतायच्या आणि कापडावर कशा कापायच्या ? बेतल्यानंतर कशा शिवायच्या आणि शिवल्यानंतर कपडे कसे दिसतील हे समजण्यासाठी रंगीत फोटो असलेलं नावीन्यपूर्ण पुस्तक मराठीमध्ये प्रथमच प्रकाशित होत आहे. परदेशी पुस्तकांच्या तोडीचे हे पुस्तक आपल्या शिवणाच्या छंदाला खतपाणी घालेल असा विश्वास वाटतो.
पुस्तकाची Amazon लिंक :

डोईचा पदर आला खांद्यावरी…
ही कथा आहे सत्तरीच्या दशकातील तरुणीची. ओढाळ तरुण वयात मोहाच्या एका धूसर क्षणी अपघातानं ती एक चूक करते. पण त्यापायी तिचं सारं आयुष्यच बदलून जातं. आपल्या सार्या आकांक्षांना तिलांजली देत, ‘पापणीआडचा पाणपडदा’ लपवत ती जगत राहते ! अंतरीचा पीळ, वेदना, संघर्ष सोसत जळत राहते ! यातून सुटण्याचा मार्ग तिला गवसतो का ? परतीची वाट सापडते का ? ‘पाऊल वाकडं पडलं’, तर ‘तिचं’ ! ‘निसरड्या वाटेवर घसरली’, तर ‘ती’च चुकलेली ! ही ‘ती’च्या भोवतीची काटेरी चौकट मोडेल का ? स्त्रीला वेढणार्यार कौटुंबिक, सामाजिक, मानसिक कुंपणांचा वेध घेणारी कादंबरी.
पुस्तकाची Amazon लिंक :

शिखंडी
रत्नप्रभा जोशी यांची ‘शिखंडी’ या ९०च्या दशकात गाजलेल्या आणि समाजमाध्यमाने उचलून धरलेल्या कादंबरीची तिसरी आवृत्ती. आमच्या इतर पुस्तकांप्रमाणे वाचकांचे याही कादंबरीला भरभरून प्रेम मिळेल ही खात्री आहे. ९०च्या दशकात एखाद्या स्त्रीने तृतीयपंथी लोकांबद्दल, समाजाबद्दल बोलावे, भाष्य करावे किंवा काही लिखाण करावे हेच आव्हानात्मक होते. समाज या विषयावर भाष्य करण्यास कधीही राजी नव्हता. अशावेळी ही कादंबरी प्रकाशित झाली, माध्यमांनीही त्याची दखल घेतली. काल्पनिक कथानकावर या कादंबरीची बांधणी झाली असली तरी विषयाची व्याप्ती आणि स्त्री लेखिका म्हणून येणाऱ्या मर्यादा यावर मात करत संबंध कादंबरीचे कथानक बांधले गेले आहे. प्रत्येक प्रकरणानंतर कादंबरीची उत्कंठा वाढतच जाते, हेच या कादंबरीचे बलस्थान व लेखिकेच्या लेखनाची ताकद जाणवून देते. विषय समाजाला न रुचणारा असला तरी कोठेही अश्लिलता न येऊ देता संपूर्ण विषयाची बारीकसारीक माहिती या कादंबरीतून मिळते. विद्रोही स्वभावाच्या नायिकेने एका क्षणिक प्रसंगानंतर स्वत:च्या पीएच.डी. करता तृतीयपंथी हा विषय निवडावा हेच विलक्षण आहे. ‘शिखंडी’ या कादंबरीवर विचारवंतांकडून माध्यमातून लिहून आलेले परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेले आहेच. या कादंबरीच्या अभ्यासासाठी अनेक नामवंत मंडळींचे सहकार्य लाभले आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

शून्यसाक्षी
नटराजाला एकदा लहर आली की, विश्वाच्या अफाट रंगमंचावर एखादी अजरामर भूमिका वठवावी. रंगदेवतेला नटराजांची इच्छा समजताच रंगमंच सिद्ध झाला. रंगभूषा, वेषभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, सगळा अप्रतिम मेळ जमून आला. पण जी भूमिका साकारायची आहे, त्या भूमिकेची लिखित संहिता आहे कुठे? तो नाटककार कोण आहे? कसा असेल तो नाट्यप्रयोग ? शुभारंभाचा प्रयोग माझाच आणि शेवटचा प्रयोगही माझाच. कारण मी लयकर्ता आहे. मी अनादी आहे. मी अनंत आहे. मीच शून्य आहे. मी रचलेल्या नाटकाचे नाट्यप्रयोग तुमच्या अंतःकरणाच्या रंगमंचावर रंगवता येतात का पाहा. तिथे तुमच्या अहंकाराचा, ‘मी’पणाचा सर्प फुत्कारत नसेल तर, त्या रंगमंचावर साधनारूपी दिव्याच्या झगमगीत प्रकाशात तुम्हाला मी दिसेन. त्याअर्थी तुम्ही शून्यसाक्षी व्हाल.
पुस्तकाची Amazon लिंक :

पंजाबी कथाविश्व
वस्तुतः लेखक लिहितो म्हणजे आपले अनुभव तो आपल्यापरीनं, आपल्या पद्धतीनं शब्दबद्ध करतो हाच एकप्रकारचा अनुवाद आहे. अनुवादाची ही पहिली प्रक्रिया अनादी आहे. परभाषांमधील अभिव्यक्ती परस्परांत उतरविण्याची प्रक्रिया म्हणजे भाषांतर. भाषांतरामुळं परभाषांमधील साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसा भाषांतर-व्यवहार गुंतागुंतीचा व संश्लिष्ट असला तरी सरावानं तो साध्य करता येतो. मराठीचा तेलुगू, कानडी, कोंकणी व गुजराती या शेजारील भाषाभगिनींबरोबर भाषांतर-व्यवहार प्रत्यही पुरेशा प्रमाणात होताना दिसतो परंतु पंजाबीसारख्या सुदूरवर्ती भाषेबरोबरचा मराठीचा भाषांतर-व्यवहार तसा दुर्मिळच म्हणावा लागेल. त्या दृष्टीनं भगवंत क्षीरसागर यांनी ‘पंजाबी कथाविश्व’च्या रूपानं सादर केलेला हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. या कथा वाचताना, पंजाबी कथेचा बाज तितक्याच समर्थपणे मराठीत आणण्यात भाषांतरकारानं आपलं पूर्ण कसब पणाला लावल्याचं प्रकर्षानं जाणवतं. परकीय आक्रमणांच्या सावटाखाली राहिलेला पंजाबी माणूस झुंजार व लढाऊ बनला हे खरं पण त्याच दणकट व रांगड्या पंजाबी माणसाच्या मनातील तरल भाव भावना, हरित व धवलक्रांतीनं स्फुरण पावलेली उत्फुल्लता, दलित जाणीवा, सामाजिक जाणीवा, फाळणीच्या मरणप्राय यातना आणि स्थलांतरितांचं अनोखं संवेदनविश्व यांच्या कल्लोळाचा एक व्यामिश्र गोफ या कथांमधून उलगडत जातो, व्यथा-वेदनांची व हर्षा-मर्षाची एक चित्रमालिका डोळ्यांसमोरून सरकत राहते. या अर्थानं पंजाबी कथांचा हा मराठी अनुवाद प्रयास म्हणून धाडसी तर आहेच पण ऐतिहासिकही आहे. त्यासाठी भगवंत क्षीरसागर यांचं अभिनंदन केलं पाहिजे. – प्रकाश भातम्ब्रेकर
पुस्तकाची Amazon लिंक :

न मारलेल्या गप्पा
आदित्यचं हे हलकं फुलकं लेखन आपल्याला हरवलेल्या गोड क्षणांची आठवण करून देतं. अशा आठवणी, हे असे प्रसंगच आपल्याला कठीण प्रसंगातून वाट दाखवणार आहेत. आजू-बाजूला फक्त वाईट सुरु नाहीये, काही चांगले क्षण पण तयार होत आहेत आणि ते टिपायला आणि सर्वांसमोर आणायला आदित्यसारखे तरुण आहेत ही फार आश्वासक गोष्ट आहे. – निपुण धर्माधिकारी
गोष्टी वाढवून चढवून सांगणारा माणूस म्हणून ओळखला जाणारा मिश्किल आदित्य हा व्यवसायाने जाहिरात लेखक आहे. इंडियन एक्सप्रेस, रेडिओ मिरची, ट्रिफोबो, आणि टेम्पेस्ट आणि थिंकिंग पार्टनर्स सारख्या पुण्यातील जाहिरात कंपन्यांमध्ये काम करून त्याने त्याच्या चातुर्याचा परिचय अनेकदा दिला आहे. विविध कला जोपासणारा आणि हसत खेळत राहणाऱ्या आदित्यला कविता, शेरो-शायरी आणि संगीत, गाणी, मैफिलींची भरपूर आवड आहे. त्याचा यमक वगैरे हा काव्य-संगीताचा अनोखा कार्यक्रम प्रचलित आहे. त्याने ह्या आधी ‘दीदार’ नावाचे हिंदी चारोळ्यांचे पुस्तक आणि ‘भेटीस्तान’ हे स्टोरीटेलवर ऑडिओबुक लिहिले आहे. सकाळ वृत्तपत्रासोबतच त्याने प्रभात वृत्तपत्र आणि इतर अनेक मासिकांसाठी लिखाण केले आहे. सोशल मीडियावरील त्याच्या वेगळ्या धाटणीच्या चारोळ्या बऱ्याचदा गाजल्या आहेत.
पुस्तकाची Amazon लिंक :

चीन : रंग आणि ढंग
गेल्या २०-२५ वर्षांत चीननं जी नेत्रदीपक प्रगती केली. त्यामुळे ‘साम्यवाद की लोकशाही श्रेष्ठ’ हा नवीन वाद पुन्हा झाला. तदजन्य सुरू झालेलं शीतयुद्ध सोव्हिएट युनियनच्या काळातल्या (१९२२ ते १९९१) द्वंद्वापेक्षा वेगळं. ते मार्क्सवादी महासत्ताक राष्ट्र अधिकांशानं आत्मनिर्भर असून फार कमी जागतिक निर्यात करीत असे. पण चीन अमेरिकेपेक्षा मोठा निर्यातप्रधान देश असून त्याचे जगातल्या जवळजवळ सर्व देशांशी व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे त्याला शिंक आली तर जगाच्या पुरवठासाखळीला पडसं होतं. परंतु चीन मानवीमूल्यं व हक्क या बाबतीत इतर लोकशाहीवादी देशांच्या बराच मागे आहे. म्हणून अमेरिका तिचं हळूहळू आर्थिक विलगीकरण करू पाहत आहे. पण ती प्रक्रिया कठीण व वेळखाऊ. चीनच्या अर्थकारणावर, राजकारणावर व धोरणावर माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण प्रकाश टाकणारा हा ग्रंथ त्या देशाचं अंतरंग जाणून घेण्यास व लोकशाही साम्यवादातलं युद्ध कोण जिंकेल हे ठरवण्यास महत्त्वाचा ठरेल. त्या देशाच्या विस्तारगंडामुळे हा विषय आता ऐरणीवर आला आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

चला, सुखी होऊया!
विजयाताईंची सकारात्मक लेखणी आयुष्यभर मुलींचे आत्मभान जागृत व्हावे म्हणून वापरली गेली आहे. दर वर्षी एक हजार आदिवासी मुलींना दत्तक पालक मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. सांताक्रूझ (प), मुंबई येथील राजा रामदेव पोदार शाळा व ज्युनिअर कॉलेजच्या त्या प्राचार्या होत्या. तत्पूर्वी उदयाचल हायस्कूल गोदरेज येथे त्या मराठी माध्यमाच्या प्रमुख म्हणून काम करीत होत्या आणि तेथेच ‘स्वच्छ सुंदर हिरवे विक्रोळी स्टेशन ‘ हा पर्यावरण प्रकल्प त्यांनी केला. ५०० विद्यार्थी आणि ११ शिक्षक त्यात सहभागी झाले. या प्रकल्पाने ५० हजार रुपयांचे पहिले ‘कॅथे पॅसिफिक एन्व्हायर्नमेंट अॅवॉर्ड’ १९९५ या वर्षात उदयाचलला मिळवून दिले व दोन विद्यार्थी ‘लापलाला’ येथे जाऊ शकले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या. त्यांची एकूण १५२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
पुस्तकाची Amazon लिंक :

चिंध्या अनुबंधांच्या
आयुष्यात आपल्याला असंख्य माणसं भेटत असतात. त्यांच्याशी येणाऱ्या संबंधांतून आपण अनेक अनुभव घेत असतो. कितीतरी चांगल्यावाईट गोष्टी आपल्या नजरेस पडत असतात. माझा जीवनप्रवास काही याहून वेगळा नाही. हो! विचारशक्ती हे माणसाला मिळालेलं वरदान आहे. माझ्या निरीक्षणशक्तीतून आणि चौकस बुद्धीतून खूप प्रश्न विचारत मी लहानाचा मोठा झालो. अजूनही काही प्रश्नांची उत्तरं मला सापडलेली नाहीत पण प्रयास अखंडित सुरू आहे… राहील…! हे पुस्तक म्हणजे मला पडलेल्या काही प्रश्नांचा, मनात आलेल्या काही विचारांचा, निसर्गाकडून शिकलेल्या लहानमोठ्या धड्यांचा, पक्ष्याप्राण्यांकडून मिळालेल्या कडूगोड शिकवणीचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या भोवताली घडलेल्या निवडक गोष्टींच्या निरीक्षणांचा संग्रह आहे. उबदार गोधडी शिवताना आपण जसे कापडाचे तुकडे गोळा करू ना… अगदी तसेच हे सारे अनुभव मी गोळा केले आहेत म्हणूनच मी त्यांना चिंध्या म्हणतो. त्यांतून शिवलेली गोधडी म्हणजे हे पुस्तक. मानवी संबंधांच्या, नात्यांच्या पलीकडले हे संबंध म्हणून ते माझे अनुबंध आहेत. या पुस्तकात काही गोष्टी तर काही लेख आहेत. मानवी मनात उफाळणाऱ्या भावना, त्या भावनांच्या वेगवेगळ्या छटा त्यात वाचकाला दिसतील. काही गोष्टी मजेशीर आहेत, काही स्फूर्तिदायक तर काही गंभीर प्रश्न मांडणाऱ्या आहेत.
पुस्तकाची Amazon लिंक :

कलापूरचे सूरसाधक
‘कलापूर’ हे नाव सार्थ ठरवणारे ठिकाण म्हणजे ‘कोल्हापूर!’ माणसाचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या विविध कला या नगरीत विकसित झाल्या आणि फुला-फळांनी बहरल्या. त्यांना उदार राजाश्रयाबरोबरच दिलदार लोकाश्रयही लाभला. या कलापूरमध्ये जे जे संगीत कलेचे श्रेष्ठ उपासक झाले, त्यांचा वेध श्री. प्रभाकर तांबट यांनी ‘कोल्हापूरचे सूरसाधक’ या पुस्तकात घेतला आहे. अनेक श्रेष्ठ आणि दिग्गज कलाकारांबरोबरच तितक्याच गुणाढ्य परंतु उपेक्षित आणि विस्मृतीच्या अंधारात दडलेल्या अनेक संगीत कला साधकांना येथे प्रकाशझोतात आणलेले आहे हे या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच या पुस्तकाचे मोल वाढले आहे. येथे लेखकाने जे परिश्रम घेतले आहेत, ते अगदी स्पष्ट लक्षात येतात. कोल्हापुरातील तब्बल ४७ अतिशय प्रतिभासंपन्न शास्त्रीय गायकांचा परिचय असलेले हे पुस्तक संगीताच्या अभ्यासकांबरोबरच प्रत्येक संगीत प्रेमीच्या वैयक्तिक संग्रहात असावे असे आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

मैया तुझ्या तीराला
भारतीय संस्कृतीत नदीला माता म्हटले जाते. आपल्या दोन्ही तीरांवर असणाऱ्या सर्व जीवांचा सांभाळ आणि भरणपोषण ही जणू आपलीच जबाबदारी आहे या उद्देशाने नदी अखंड वाहात असते. तिच्या याच गुणामुळे ती समस्तांना पूज्य ठरली आहे. या सगळ्या नद्यांमध्ये नर्मदा ही तिच्या काठावर असणाऱ्या गूढतेमुळे आध्यात्मिकतेचा प्रत्यय देणारी झाली. जो तिची परिक्रमा पूर्ण करतो त्याला येणारी अनुभूती हा खरं तर शब्दांच्या पलीकडचा भाव आहे. मग त्या भावनेला शब्दात कशासाठी पकडायचे? इतरांना अध्यात्मप्रवण करण्यासाठी. असे त्याचे सोपे उत्तर आहे. हेच उत्तर आपल्यापरीने देण्याचा प्रयत्न दत्तात्रय लोंढे यांनी केला आहे. साधी सोपी भाषा आणि ‘मैयाने करून घेतले’ हा भाव. हे या परिक्रमाकथनाचे बलस्थान आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

जगाला पोखरणारी डावी वाळवी
बंदुकीच्या नळीतून येणारी रक्तरंजित क्रांती अशक्य आहे हे ओळखून डाव्या शक्तींनी जागतिक वर्चस्वाचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवी घातक रणनीती आखली, जिचं उद्दिष्ट होतं पाश्चात्य जगताची कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम यासारखी शक्तिस्थान॔ आतून पोखरून टाकत त्यांचा विध्वंस करणं. यासाठी त्यांनी अतिरेकी व्यक्तिवाद, विकृत स्वरूपातील स्त्रीवाद, लैंगिक स्वैराचार, समलैंगिकतेचा प्रसार, इतिहासाचं विकृतीकरण, धर्म आणि संस्कृतीची कुचेष्टा, अनिर्बंध स्थलांतराला प्रोत्साहन… यांचा आधार घेत कुटुंब, समाज, राष्ट्र यांना स्वयंविध्वंसाच्या टोकावर आणून उभं केलं. मार्क्सवादातील श्रीमंत वि. गरीब हा मूळ आर्थिक संघर्ष दूर ठेऊन वंश, लिंग, धर्म या सांस्कृतिक आधारांवर विविध गटांमध्ये सतत संघर्ष भडकत राहील अशी योजना राबवली. विशेष म्हणजे आपला विध्वंसक अजेंडा राबवण्यासाठी सामाजिक न्याय, पर्यावरणवाद, स्त्रीमुक्ती, सर्वसमावेशकता हे आकर्षक मुखवटे धारण केल्यामुळे त्यांना विरोध करणंच अशक्य ठरू लागलं. या नवमार्क्सवादाने म्हणजेच वोकिझमने आता भारताकडे लक्ष वळवलं आहे. मूळ मार्क्सवादाच्या समोर दिसणार्या बंदुकीशी लढणं शक्य होतं पण आपल्याच लोकांचा बुद्धिभेद करून आतून पोखरणाऱ्या या वाळवीला आवरणं फारच कठीण आहे. म्हणून इतरांच्या अनुभवावरून आजच जागं व्हायला हवं. आकर्षक मुखवट्यांमागचा हा भेसूर, विध्वंसक चेहरा वेळीच ओळखायला हवा
पुस्तकाची Amazon लिंक :

आयुष्य जगताना
‘आयुष्य जगताना’ हे नावच पुरेसे सांगून जाणारे आहे. जगताना केवळ अन्न, वस्त्र, निवारा एवढ्याचीच गरज नसते; तर त्या पलीकडे हे आयुष्य उद्दिष्टपूर्ण, रसरशीत होण्यासाठी नात्यांची, आपुलकीच्या ऊबेचीही गरज असते. शुभांगी कात्रेला यांनी प्रस्तुत लेखनातून तेच वात्सल्य व्यक्त केले आहे. या सर्वच लेखांतून खऱ्या अर्थाने संवेदनशील, समृद्ध माणूस होण्याचा विचार मांडला आहे. अशा प्रकारचे लेखन, व्याख्याने आपण अनेकदा वाचलेली व ऐकलेली असतात. परंतु संत, सद्गुरू, विचारवंत तेच विचार वेगवेगळ्या अवतारातून पुन:पुन्हा सांगत असतात. कारण पुनः पुन्हा नव्या तेल-वातीने उजळण्याची गरज असते. शुभांगी कात्रेला यांच्या सात्त्विक जगण्यातील सुंदरतेवर श्रद्धा असणाऱ्या लेखणीने तेच कार्य प्रस्तुत लेखनाद्वारे केले आहे. – प्रवीण दवणे
पुस्तकाची Amazon लिंक :

श्री उच्छिष्ट गणपती
गणक ऋषींच्या वेदोक्त श्रीगणपती अथर्वशीर्ष व तंत्रोक्त श्री उच्छिष्ट गणेश कवचम्, अशा दोन अद्वितीय, अद्भुत महारचनांचा शुद्ध तत्वात्मक विचार या ग्रंथात मांडला आहे. अनुलोम-विलोमाप्रमाणे भासणाऱ्या ह्या दोन रचना आहेत. एका बाजूने उपासकाच्या वाणीला दुधारी तलवारीप्रमाणे धार देऊन दुसऱ्या बाजूने ढालरूपी संरक्षणात्मक कवच इथे प्रदान केले आहे. जड व सूक्ष्म जगताचा आधार ॐकार रूपी श्रीगणेशच आहे, हे सर्वश्रूत आहे. या ग्रंथात गणेशतत्वातीत सूक्ष्म परंतु महत्त्वाचे असे भेद स्पष्ट केले आहेत. श्री उच्छिष्ट गणेशाची व्याप्ती त्याच्या ३६ विग्रहांसह मांडली गेली आहे. पार्थिव गणेश आत्मगणेश, सिद्धीविनायक ते श्री उच्छिष्ट गणेश अशाप्रकारे प्रपंच ते परमार्थ ह्या प्रवासाला उपयुक्त असा मार्गदर्शकपर हा ग्रंथ आहे. अध्यात्मक मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या साधकाचे एकमेव ध्येय मुक्ती हेच असते. या ग्रंथाद्वारे मुक्तिदूत श्रीगणेशाच्या कृपेशिवाय ते अशक्य आहे, हे आईनाथानी साधकांच्या निदर्शनास आणून दिले आहे. श्री उच्छिष्ट महासिद्ध नीलगणपतीच्या आशीर्वादाने उच्छिष्ट तत्वाच्या गुढतेची उकल करण्याचा हा अल्पसा प्रयत्न होय.
पुस्तकाची Amazon लिंक :

शाश्वत
चराचरातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये एक कथा आहे. आणि ती कथा कुठेतरी आपल्या भावनांना स्पर्श करणारी आहे. संजीव कोटकरांच्या शाश्वत पुस्तकातील कथा या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या, कुठेतरी ऐकलेल्या किंवा पाहिलेल्या वाटतात आणि म्हणूनच त्या हृदयात घर करतात. काही कथा आपल्याला विचारात टाकतात तर काही जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवतात. अशा विविध कथांमधून मनाची आंदोलने उलगडून दाखवणारा लघुकथासंग्रह
पुस्तकाची Amazon लिंक :

रंग प्रेमाचा.. भाव मनीचा…
नीलपुष्प साहित्य मंडळा’च्या सदस्या, कवयित्री सुनीता भालेराव यांचा ‘रंग प्रेमाचा.. भाव मनीचा’ हा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे, त्यानिमित्ताने यातील कवितांचे वाचन झाले. त्यांनी प्रेमाचे हितगुज सुंदर शब्दांत आपल्या काव्यात मांडले आहे. या काव्यसंग्रहाच्या नावावरून कवयित्री शब्दांच्या, साहित्याच्या प्रेमात इतक्या रंगल्यात की, सर्व काव्यसंग्रहच प्रेमकाव्यातील शब्दांच्या रसधारांनी नखशिखांत भिजलाय, ओलाचिंब झालाय. सुनीता भालेराव यांनी आपल्या आयुष्यात आलेले अनेक चढ-उतार झेलत, संसाराचा गाडा ओढत असताना, मनात उचंबळून आलेल्या प्रेम, भाव-भावनांचे शब्दरुपात केलेले वर्णन आपल्या काव्यातून उत्कृष्टरित्या मांडले आहे. या काव्यसंग्रहातील बहुतांश कविता प्रेमरसात न्हाऊन निघालेल्या आहेत. मग ती कविता प्रेमी युगुलाची असो की, पावसातील वर्णनाची वा राधाकृष्णाच्या कालातीत प्रेमभक्तीची. या कवितांची शीर्षकेही किती बोलकी आहेत.. या संग्रहात एकूण ६३ कविता आहेत. पहिली कविता ही गणेशाला वंदन करून लिहिली आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत गणेशाला प्रथम पूजेचा मान दिला जातो. तसाच इथेही कवयित्रीने ‘तूच गणेश’ या कवितेला पहिला मान दिला आहे. यावरून प्रेम आणि भक्ती यांचे अतूट नाते प्रत्येक शब्दात ओतप्रोत भरलेले आपणास दिसून येईल.
पुस्तकाची Amazon लिंक :

कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची
खेड्यापाड्यातल्या लोकांच्या गरजांपासून तुटलेलं पुस्तकी शिक्षण हे शिक्षणच नव्हे, अशी डॉ. श्रीनाथ कलबाग यांची धारणा होती. अशा कुचकामी शिक्षणाला त्यांनी आपल्या विज्ञाननिष्ठ प्रयोगांमधून भक्कम पर्याय उभा केला. ‘ग्रामीण विकासातून तंत्रशिक्षण आणि त्या शिक्षणातून शाश्वत-माणूसकेंद्री ग्रामविकास’ ही त्यांची दृष्टी होती. ही जोडणी करण्यासाठी त्यांनी पुण्याजवळील पाबळ या अवर्षणग्रस्त गावात विज्ञान आश्रमाची स्थापना केली. गेल्या चाळीस वर्षांत विज्ञान आश्रमाने तंत्रशिक्षणाचे नवनवीन प्रयोग केले. त्यातून शेकडो ग्रामीण युवक-युवतींना स्वत:च्या पायावर उभं केलं. त्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्यांच्यातून संशोधक वृत्तीचे यशस्वी ग्रामीण उद्योजक घडवले. या उद्योजकांनी ग्रामीण प्रश्नांना हात घातला. समाजासमोरच्या समस्यांना शिक्षण-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भिडत ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या प्रयोगाची ही गोष्ट आहे. डॉ. कलबागांनंतर विज्ञान आश्रमाचं समर्थ नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्याने सांगितलेली.
पुस्तकाची Amazon लिंक :

१९ देश ४६० दिवस
हे केवळ प्रवास वर्णन नाही आणि नाही ही स्वच्छंद भटकंती. हा आहे भ्रमंती मधून घेतलेला स्वतःचा शोध. जगभ्रमण करण्याच्या अनावर ओढीतून आणि कुतुहलातून स्वतःची वास्तुविशारद मधली उत्तम नोकरी ऐन उमेदीत सोडण्याचे त्याने धाडस दाखवले. अंतर्मनाची हाक ऐकत स्वतःचे ध्येय नक्की केले. त्यादृष्टीने अभ्यास करून प्रवासाचा आराखडा पक्का केला. नेहमीची मळलेली पायवाट सोडून स्वतःची अनवट वाट तयार केली. ह्या वाटेवरून चालताना, अडचणींचा सामना करावा लागणार हे तर गृहीत धरलेलं होतच. तरी त्या अडचणी किरकोळ वाटाव्यात इतके संपन्न करणारे अनुभव घेतले. निसर्गाचे विभ्रम जवळून अनुभवले. अनेक लोकांशी मैत्र जुळले. आपल्या सुखासीन तरी एकसुरी आयुष्याच्या चौकटी मधून बाहेर पडण्याचे वेगळेपण दाखवत १९ देशात आणि ४६० दिवसांच्या प्रदीर्घ काळात एकट्याने केलेल्या प्रवासाचा हा विस्मयकारी मागोवा.
पुस्तकाची Amazon लिंक :

विसाव्या शतकातील मराठासमाज
रा. ना. चव्हाण यांनी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठासमाजावर लिहिलेल्या लेखांचे संकलन या पुस्तकात केलेले आहे. रा. ना. चव्हाण यांनी छत्रपती शिवरायांच्या काळापासून ते विसाव्या शतकातील नव्वदीच्या दशकापर्यंतची विविध उदाहरणे विवेचनासाठी आणि विश्लेषणासाठी घेतलेली, या पुस्तकात एकत्रित आली आहेत. मराठासमाजाला प्रेरणा छत्रपती शिवरायांच्या पासून मिळाली. हा एक मुख्य सिद्धांत रा. ना. चव्हाण यांनी मांडला आहे. एकोणिसाव्या शतकात सामाजिक सुधारणा आणि शैक्षणिक सुधारणा मराठासमाजात करण्याचा विचार आग्रहाने मांडला. सामाजिक सुधारणा आणि शैक्षणिक सुधारणा हे मराठासमाजाच्या प्रगतीचे एक प्रारूप आहे असे रा. ना. चव्हाण मांडतात. महात्मा फुले, गंगारामभाऊ म्हस्के, वि. रा. शिंदे यांची उदाहरणे यासंदर्भात रा. ना. चव्हाण यांनी दिली आहेत. राज्यकर्त्या मराठा वर्गाने तळागाळातील सर्व समाजाबरोबर मराठासमाजासाठी प्रयत्न केले. या संदर्भातील महाराजा सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांचे एक प्रारूप सविस्तरपणे मराठासमाजाच्या संदर्भात मांडले. विसाव्या शतकातील आरंभीच्या अर्धशतकातील मराठासमाजाचा इतिहास रा. ना. चव्हाण यांनी मांडला आहे. विसाव्या शतकातील दुसऱ्या अर्धशतकातील मराठी- मराठा, मराठा-उच्च जाती, मराठा-इतर मागासवर्ग, मराठा आणि अनुसूचित जाती यांच्याविषयीच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांची चिकित्सक चर्चा रा. ना. चव्हाण यांनी या पुस्तकात सविस्तरपणे केली आहे. रा. ना. चव्हाण यांनी मराठा समूहांतील सकलजनवादी विचार, संकल्पना, दृष्टी
पुस्तकाची Amazon लिंक :

अनोखे पर्यटन
भारतात तर प्रमुख पर्यटन स्थळेच इतकी आहेत की सारी फिरायला अनेक सहली कराव्या लागतील. आडवाटेची सौंदर्य स्थळे त्याहून अधिक आहेत. या सगळ्या ठिकाणांचा आढावा घेणे अशक्य असले तरी या पुस्तकात काही सहलींची माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय पर्यटकाची मानसिकता ही, ‘एका ठिकाणी राहून चार आठ दिवस आराम करणे’ यापेक्षा आजूबाजूला फिरुन आणखीन काही नवीन पाहावे, अनुभवावे अशी असते. म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात विविध प्रकारच्या सहलींची माहिती दिली आहे. उंचीवरचे पर्यटन (हिल स्टेशन्स नाहीत), जंगल पर्यटन, किनारी पर्यटन, सागरी पर्यटन, दुर्लक्षित शहरातील प्रेक्षणीय स्थळे असे पर्यटनाचे विविध प्रकार आहेत. शिवाय परदेशातील काही अत्यंत वेगळी स्थळे यात समाविष्ट केली आहेत. ही सारी स्थळे लेखकांनी स्वतः अनुभवली आहेत आणि त्यांचे अनोखेपण वाचकांना आवडेल याची खात्री आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

दंश झालाय काळजाला
घाव, जखम व दंश ही एकाच वेदनेची तीन वेगवेगळी रूपे आहेत. घाव हा कुणीतरी शरीरावर किंवा मनावर करतो, त्यावेळी ते क्रौर्य सजग डोळ्यांना दिसणारे असते. जखम ही काही काळ भळभळत असते आणि कालांतराने त्यावर खपली धरते; पण दंश हा कोण करते, अज्ञात असते. मग तो दंश शरीरावरचा असो वा काळजावरचा असो, तो अपरिहार्यपणे नकळत सतत ठसठसत राहतो..! कवी अर्जुन भागा बांबेरे यांच्या ‘दंश झालाय काळजाला’ या पहिल्याच कवितासंग्रहात त्यांच्या शब्दसारणीतून याचे वारंवार प्रत्यंतर येते ! बांबेरे यांच्या कवितेतून विद्रोह, विपरीत राजकारण, माणुसकीचा खालावलेला स्तर, तुटलेला गाव, गावच्या आठवणी, प्रेम, विरह, आईबाप, बहिणीची माया अशा विविध विषयांतून वेदनेची ठसठस दुखऱ्या शब्दात जाणवत राहते. अष्टाक्षरीत काही कविता आहेत. कवितेत नादमयता आणि लय आहे. त्यामुळे त्यांच्या कविता रसिकांना मनःपूत आवडतील यांत कुठलीही शंका नाही. त्यांच्या भविष्यातील कविता प्रवासाला मी शुभेच्छा देतो..! – प्रा. अशोक बागवे
पुस्तकाची Amazon लिंक :

कबीरबोध
कबीरांच्या दोह्यांना साखी म्हणतात. साखी हा शब्द साक्षी या मूळ संस्कृत शब्दांचे तद्भव रूप आहे. याचा अर्थ आहे की, कबीरांना जो विचार, मत किंवा भाव भावला त्याची साक्ष देण्यासाठी त्यांनी सारखीची रचना केली आहे. याचाच अर्थ असा की दुसरा कोणी म्हणतो म्हणून डोळे झाकून कबीरांनी कोणताही विचार ग्रहण केलेला नाही. जो विचार त्यांना पटला, ज्याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला, त्याचे साक्षीदार म्हणून त्यांनी सारखी रचली. थोडक्यात सांगायचे तर कबीरांचे संपूर्ण काव्य स्वानुभवावर आधारित आहे. त्यामुळेच ते लोकांच्या मनाला जाऊन भिडते. अशा काव्याचा आनंद मराठी भाषकांना प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने श्रीमती शैला पिटकर यांनी ‘कबीरबोध’ हे पुस्तक लिहिले आहे. हे नुसते संकलन नाही तर श्रीमती पिटकर यांनी जो अनुभव स्वतः घेतला तो त्यांनी प्रथम पद्यातून आणि मग भावार्थाच्या रूपाने गद्यातून प्रकट केला आहे. मराठीचे जाणकार रसिक वाचक त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत करतील अशी आशा आहे. – डॉ. स. म. परळीकर
पुस्तकाची Amazon लिंक :

दुर्दम्य
ले. जनरल एसपीपी थोरात, ॲडमिरल भास्करराव सोमण, फील्डमार्शल सॅम माणेकशा, ले. जनरल प्रेम भगत, ले. जनरल सगतसिंग आणि ले. जनरल पंकज जोशी. भारतीय सैन्यदलातील पराक्रमाची सहा उत्तुंग शिखरे ! त्यांच्या अमर कर्तृत्वाच्या या स्फूर्तिदायक कहाण्या…. दुर्दम्य म्हणजे करारी, खंबीर, अजिंक्य, अमोघ भारतीय सेनानेतृत्वाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या अशा सहा ‘दुर्दम्य’ सेनानींच्या जिद्दी क्षात्रवृत्तीच्या वीरगाथा चोखंदळ ‘राजहंसी’ वाचकांसमोर ठेवताना मला अत्यंत आनंद होत आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

मुक्काम पोष्ट घोडपदेव
माझ्या षष्ट्याब्दीपूर्ती निमित्ताने माझे पहिले ‘मुक्काम पोष्ट घोडपदेव’ प्रकाशित करताना आनंद होत आहे. लहानपणापासून लेखन आणि वाचनाची आवड त्यामुळे लेखनाची उर्मी निर्माण झाली. मला रहस्यकथा वाचण्याचा छंद इतका जडला होता की, घेतलेले पुस्तक वाचून काढल्याशिवाय स्वस्थ बसता येत नव्हते. माझा जन्म याच विभागात झाला असल्याने घोडपदेववर माझे नितांत प्रेम. या मातीशी नाळ जुळली आहे. सोशल मीडिया आला आणि मला आपल्या आठवणीतील माणसं, आपल्या मातीतीलपूर्वजांची थोरवी यांचा लोकांना परिचय मु.पो. घोडपदेव करून द्यावा, विभागातील चर्चा, घडणाऱ्या घटना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी मी घोडपदेव समुहाच्या माध्यमातून ‘घोडपदेवची माणसं’ हा लेख लोकांना अर्पण केला. या पुस्तकात माझ्या सहवासातील हिरेमाणिक मोती समान माझ्या मित्रांनादेखील स्थान दिले आहे. काही चंदनासमान माणसं हेरली आणि सोबतीला घेऊन आयुष्याच्या या वाटेवर आलो आहे. माझ्या मनात अहंकाराचे रोपटे कधी उगवू दिले नाही. ‘मुक्काम पोष्ट घोडपदेव’ या पुस्तकाची कल्पना ही दिलीप महाडीक यांनी दिली आणि दिलीप वागस्कर यांनी पाठबळ दिले. या दोघांचे मी मनापासून आभार.
पुस्तकाची Amazon लिंक :

शब्द कल्पिताचे
हा पत्रग्रंथ आहे. आपल्यात नसलेल्या व्यक्तींना आजच्या विविध क्षेत्रातील नामवंतांनी लिहिलेली पत्रं हा या ग्रंथाचा विषय. त्या अर्थाने ही ‘न पाठवलेली पत्रं’ आहेत. म्हणून ग्रंथाचे शीर्षक ‘शब्द कल्पिताचे’. या ग्रंथातून पत्रातील प्रतिपाद्य व्यक्ती आणि त्यांनी आपल्या विचार, कृतीने गाजवलेला एक संबंध काळ सतत वाहताना दिसतो. हा काळ जोखताना, वाचताना आणि त्या काळात त्यांनी केलेले काम पाहाताना जीवन संघर्षाची अगणित रूपं दिसतात. ज्ञान-विज्ञान-धर्म आणि कला यांतले सत्य या सगळ्या माणसांनी आपल्या कामातून किती तरतऱ्हेने पुढे आणले याचा लोलक डोळ्यांपुढे फिरत राहातो. कर्म हीच त्यांची साधना होती; त्यामुळे ती माणसे न थकता, न थांबता सतत चालत राहिली. काळाच्या कसोटीवर त्यातले धगधगते सत्य तळपत राहिले.. ज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना सत्याचा ध्यास होता. विज्ञान क्षेत्रात काम करणारे सत्याच्या शोधात होते. धर्म क्षेत्रात काम करणाऱ्यांजवळ अनुभूतीतले सत्य होते, तर कलाक्षेत्रात काम करणाऱ्यांच्या अंगी सत्याचा आविष्कार होता..म्हणजे काय तर आपापल्या कार्यक्षेत्रातील कर्माप्रतीची, त्यातल्या सत्य-शिव-सुंदराविषयीची अपार उत्कटता त्या माणसांजवळ होती. आज नेमका त्याचाच अभाव असल्याने पत्र लिहिणाऱ्या व्यक्तींची आपल्या काळाबद्दलची हळहळदेखील या पत्रांमध्ये व्यक्त झाली आहे. म्हणूनच हा ग्रंथ म्हणजे दोन काळांचा दीर्घ संवाद आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

विश्वातील अपरिचित देश आणि भारत
‘विश्वातील अपरिचित देश आणि भारत’ हे पुस्तक वाचकांच्या हाती देताना अत्यानंद होत आहे. जगाच्या पाठीवरील पंचेचाळीस अपरिचित देश आणि त्यांच्यासोबत असलेला भारताचा संबंध उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यातील प्रत्येक देश वैशिष्ट्यपूर्ण आहे. उदा. सेंट किटस् अँड नेव्हिस या देशात एखाद्याला नागरिकत्व प्राप्त करावयाचे असल्यास या देशातील बांधकाम क्षेत्र किंवा साखर उद्योगात गुंतवणूक केली तरी पुरेसे आहे. बहरीनसारखा देश प्राचीन काळात बहुमूल्य असे मोती देऊन भारतीय मसाले खरेदी करीत होता. एका देशाची लोकसंख्या केवळ आठशे आहे तर आणखी एका देशात केवळ ३५० बेरोजगार आहेत. काही देशांचे अर्थकारण केवळ मद्यावर चालत असतं, तर काही देशात सैन्य सेवा अनिवार्य करण्यात आली आहे. जिबुतीसारख्या देशाचे भौगोलिक स्थान इतके महत्वपूर्ण आहे की, जगाच्या एकूण व्यापाराच्या २५ टक्के व्यापार हा जिबूतीमार्गे होत असतो. मनात आणले तर हा छोटा देश हा सागरी मार्ग बंद करून मोठ-मोठ्या देशांनाही अडचणीत आणू शकतो. सूरीनाम सारखा देश तर जगभरात छोटा भारत म्हणून ओळखला जातो. प्रत्येक देशाचं असं खास वैशिष्ट्य प्रस्तुत पुस्तकात अधोरेखित करण्यात आलं आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

कल्पद्रुमाचिये तळीं
ज्ञानदेवांचे साहित्य आस्वादताना सत्य- शिव-सुंदराच्या प्रत्येक उपासकाला असा अनुभव येतो की, आपण ‘कल्पद्रुमाचिये तळीं’ विसावलो आहोत. वेदोपनिषदांपासून काव्य-नाटकांपर्यंत संस्कृत वाङ्मयोदधीचे त्यांनी केलेले मंथन, षड्दर्शनांचा त्यांनी घेतलेला साक्षेपी धांडोळा, नाना लोकरीतींचे त्यांनी केलेले सूक्ष्म निरीक्षण, मानवी भाव-भावनांचा त्यांनी घेतलेला तरल वेध, ऋतुचक्रातून बदलणाऱ्या सृष्टीच्या रूप-रंगांचा नि रस-गंधांचा त्यांनी सहृदयतेने घेतलेला आस्वाद आणि आपल्या प्रगाढ प्रेमाने, परिणत प्रज्ञेने नि परतत्वस्पर्शी प्रतिभेने त्यांनी आकळलेले विश्वरहस्य हे सारे त्यांच्या शब्दसृष्टीतून आपल्या अनुभवास येते. त्यांचे बाह्य जीवन जाणण्याची साधने आपल्या हातीं अभावानेच असली, तरी त्यांचे आंतर जीवन जाणण्यासाठी त्यांच्या साहित्यात विपुल सामग्री भरून राहिलेली आहे. त्यांच्या या समृद्ध साहित्याची संहिता तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणाच्या संदर्भात अभ्यासण्याचा हा एक वेगळा प्रयत्न स्फुट स्वरूपाचा असूनही सर्जक शोधाच्या अनेक नव्या वाटा उजळणारा.
पुस्तकाची Amazon लिंक :

कंपनी सरकार
सत्ताकारण, प्रेम, लैंगिक व्यवहार, विश्वासघात, हिंसा, वर्चस्वाची भावना, इत्यादी अनेक वृत्ती-प्रवृत्ती मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. याला आंतरराष्ट्रीय सत्तास्पर्धेचा आयाम लाभतो, तेव्हा साकारणारं नाट्य जीवघेणं असतं. कुणासाठी खूप लाभाचं आणि एखाद्याला रसातळाला नेणारं असतं. अशाच आंतरराष्ट्रीय सत्तास्पर्धेचा लेखाजोखा ‘कंपनी सरकार’मधून मांडला गेला आहे. रहस्याच्या अंगानं मांडणी करतानाच विविध देश आणि संस्कृतींची रंजक सफर घडवून आणणारी वेगवान कादंबरी म्हणजे ‘कंपनी सरकार’! कादंबरीचा पट जागतिक घडामोडींना कवेत घेत असा काही उलगडत जातो, की या अगम्य विश्वाची गुंतागुंत हळूहळू उमगत जाते.
पुस्तकाची Amazon लिंक :

कोषातले पंख
निसर्गातील ऋतू बदल, विविध रंगांची उधळण म्हणजे आपल्या रसिकतेला साद. माणसाचे माणूसपण या सर्व रंगावर मात करते आणि स्वतःचे वेगळेपण सिद्ध करते. मनातली द्वेष भावना मनातून वेगळी करायला हवी हा संदेश खूप महत्वाचा आणि प्रबोधन करणारा आहे. ‘कोषातले पंख’ हे शिर्षक अत्यंत समर्पक असून मनावर जमा झालेला पालापाचोळा दूर करण्याचे सामर्थ्य, वार्ध्यक्य विसरायला लावणारं स्वप्नाळू मन, मनाचं चिरतरुणपण, पळसवैभव, रानफुलीची सनोमाळ झालेली पखरण, निसर्गसृष्टीचा अनाहत नाद, उमटणारी लय, सालंकृत झालेले वासंतिक काव्य, लढण्याची ऊर्मी, जिंकण्याचा त्वेष आणि सोबतच पराजय पचविण्याचे ध्येय अनुभवायाचे झाल्यास हा संग्रह जरूर जरूर वाचायलाच हवा. जुनीच पायवाट नव्या दमान चालण्याची उभारी या कोषातल्या पंखानी शारदीय सारस्वतांना या निमित्ताने दिली आहे. हे शब्दमर्म म्हणजे जीवनप्रवास आहे. आकाश आणि आभाळ, मानव आणि माणूस, जीवन आणि आयुष्य यातील सूक्ष्म फरक या पुस्तकरुपाने उलगडला गेला आहे. प्रतिभेची साथ व प्रसंगानुरुप लेखन व्यासंगातील ‘लिहीता हात’ यांनी मिळून ‘कोषातले पंख’ हे सृजनशील भाष्य करण्याचे धाडस या संग्रहाच्या निमित्ताने केले आहे. त्यास माझ्या लाख लाख शुभेच्छा..!
पुस्तकाची Amazon लिंक :

जीए : जीवनदृष्टी आणि प्रतिमासृष्टी
आजवरच्या अभ्यासकांना जीएंची शोकात्म जीवनदृष्टी प्रकर्षाने भासली, पण त्यांची मूल्यगर्भ जीवनदृष्टी फारशी प्रतीत झाली नाही. जीएंची अर्थशून्यतेची भावना जाणवली परंतु त्यांचा अर्थपूर्णतेचा शोधप्रवास जाणवला नाही. जीएंची विश्वरचनेपासून झालेली विलगता, परात्मता त्यांनी हेरली, पण सृष्टीशी नाते जोडण्याची जीएंची मानुषतेची भावना त्यांना भावली नाही.जीएंच्या नियतीचा अंधार त्यांनी पाहिला परंतू त्यांच्या आत्मस्वातंत्र्याच्या सूर्यप्रकाशाकडे या अभ्यासकांनी दुर्लक्ष केले. जीवनाला झालेला मृत्यूचा सर्पदंश आणि त्यातून जीएंना जीवनाची झालेली विरक्ती याचे त्यांनी अचूक आकलन केले, पण जीवनेच्छेच्या आणि सृजनात्मक वासनेच्या नागमंडलाचे दर्शन घेण्याचे त्यांनी टाळले. जीएंच्या द्वंद्वात्मक जीवनदृष्टीच्या आणि प्रतिमासृष्टीच्या गूढ डोहकाळिम्याचा तळ शोधण्याचा हा एक प्रयत्न.
पुस्तकाची Amazon लिंक :

अभागी कन्या
एकूणच सुभाष खिलारे यांचा ‘अभागी कन्या’ हा कथासंग्रह मराठी कथात्मक साहित्यात महत्त्वाचा ठरणार आहे. याचे वेगळेपण म्हणजे गेल्या दोन दशकांमध्ये बदललेले समाजदर्शन यातून घडते. समकालीन मानवी जीवनात निर्माण झालेल्या नव्या प्रश्नांची मांडणी यात येते. बेरोजगारी, भ्रष्टाचार, कर्जबाजारीपण, एड्स, अंधश्रद्धा इ. कळीच्या सामाजिक समस्यांचा शोध येथे खिलारे यांनी घेतलेला आहे. त्यामुळे सुभाष खिलारे यांचा ‘अभागी कन्या’ हा कथासंग्रह नव्या पिढीसाठी मैलाचा दगड ठरेल. त्यातील विचारप्रबोधनाच्या चळवळीला साह्यभूत ठरणार असून जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेरणा मानून लेखन करणाऱ्या नव्या पिढीला दिशादर्शक ठरेल.
पुस्तकाची Amazon लिंक :

कवितेला शोधित जावे
कवितांच्या संदर्भाने हेमकिरण पत्की मानवी जीवनातील वास्तवाचे, प्रवृत्तींचे, आकांक्षांचे आणि स्वप्नांचे जे निदर्शन करतात ते लक्षवेधी होते. कवितेचा हेतू, तिचा आशय, तिची अभिव्यक्ती या विषयीही पुष्कळ काही व्यक्त होते. त्यांच्या विवेचनांतून वारंवार येणारी ‘केवल’ ही संज्ञा अस्तित्वाचे निखळपण, त्याचे सूक्ष्म संवेदन, त्यातून होणारे ‘स्व’ रूप-दर्शन यांचा मागोवा घेत राहते. कवितेच्या शोधात कोणती सौंदर्ये भेटतात याचे जागरण हेमकिरण यांनी एका निष्ठेने व परिश्रमाने केले आहे. वाचक त्यांच्या भाष्याशी सहमत होतील न होतील, पण त्यामागच्या त्यांच्या सद्भावयुक्त चिंतनाला अवश्य दाद देतील. – प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख
पुस्तकाची Amazon लिंक :

देश सुटतो तेव्हा
गेल्या दशकात अनेक देशांमध्ये गृहयुद्धं भडकली. गावांवर, शहरांवर बॉम्बहल्ले झाले, तर कुठे भीषण नैसर्गिक संकटं आली.. तिथल्या माणसांना जीव वाचवण्यासाठी अंगावरच्या कपड्यांनिशी देश सोडावा लागला.. आणि मग सुरू झालं एक नष्टचर्य. तापलेल्या बाळवंटातून, हाडं गोठवणाऱ्या थंडीतून, दाट जंगलांतून, खवळलेल्या समुद्रातून माणसं जिवाच्या आकांताने निघाली. वाटेत किती मेली, परागंदा झाली याची गणतीच नव्हती. उरलेल्यांच्या बाट्याला रेफ्युजी कॅम्प्समधलं किडा-मुंगीचं जिणं आलं.. आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतले लाखो लोक असे देशोधडीला लागले.. या गोष्टी आहेत त्यांच्या ससेहोलपटीच्या.. आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांना सुरक्षित जगता यावं या साध्या इच्छेपोटी माणसाने सोसलेल्या अनन्वित हालअपेष्टांच्या, टोकाच्या परिस्थितीतही तग धरून राहण्याच्या.. आणि त्यांचं जगणं सुसह्य करण्यासाठी धडपडणाऱ्यांच्या सुद्धा. विश्वाला व्यापून असलेल्या रेफ्युजी प्रश्नाचा मानवी चेहरा समोर आणणारं पुस्तक.
पुस्तकाची Amazon लिंक :

उघड्या खिडक्यांमधून
मुंबईच्या लोकलने प्रवास करताना बसल्या बसल्या आजूबाजूच्या जगाकडे लोकलच्या खिडक्यांमधून आपसूक लक्ष जातंच. दररोजच्या प्रवासात सुद्धा नवनवे अनुभव, नवे विश्व, नव्या गोष्टी सहजपणे खिडक्यांमधून आत येतात आणि त्यातून एखाद्या संवेदनाक्षम माणसाच्या आंतरिक उर्जेला नवे प्रांत खुणावू लागतात. या गोष्टी पाहतांना, मनाच्या खिडक्याही मग आपोआप उघडल्या जातात आणि एका नव्या विश्वाला आपण सामोरे जातो. या अनुभवांना सहजपणे सामोरे जाताना आपण केवळ तिथल्याच विश्वाशी बांधलेलो नसतो. तर त्या विश्वाला समरुप अशा अनेक घटना व्यक्तींचा, आठवणींचा फेर आपल्या भोवती धरला जातो आणि या सगळ्यांचे निमित्त म्हणून एक नवा आलेख आपल्या मनावर कोरला जातो. अशातून सुलभा कोरे यांचे ‘उघड्या खिडक्यांमधून’ हे लेखन साकारलेलं आहे. सुलभा कोरे या अनुभवांना सामोरे जातात तेव्हा त्यांच्या मनाचा एक कोपरा त्यांच्या आतल्या आठवणींना ढवळून काढीत असतो. या आठवणी कधी कोकणातल्या असतात, कधी महानगरातल्या असतात तर कधी आपल्या आप्तांच्या असतात. कधी त्याचं चिंतन येते तर कधी भावनिक उलाघालही दिसून येते. मुक्त चिंतनाच्या या लेखनाचा पैस म्हणूनच असा भवतालच्या रुक्ष अवकाशापलीकडे जाऊन एका वेगळ्या विश्वात वाचकांना घेऊन जातो.
पुस्तकाची Amazon लिंक :

माणूस म्हणून जगण्यासाठी
‘माणूस म्हणून जगण्यासाठी’ ही विवेक पंडित यांचा ध्येयवादाच्या मार्गावर डोळे उघडे ठेवून केलेल्या प्रवासाची गोष्ट आहे. ध्येयवादाला वास्तवाचा, व्यवहाराचा पाया हवा हे वेळेवर समजावे लागते. सामाजिक कार्यात सेवा, संघर्ष, आणि सहकार्य देखील आहे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी अनेक समाज घटकांशी, पर्यायाने प्रस्थापितांशी, प्रशासनाशी आणि पोलिसांशी वेळप्रसंगी संघर्ष करावा लागतो. पण या प्रत्येक घटकाची मानसिकता व वास्तव स्थिती समजून घेऊन समजुतीने वाटचाल केली तर त्यांचे सहकार्य देखील मिळते. हा ध्येयवादाचा असला तरी अहंकाराचा नव्हे तर सहकाराचा प्रवास आहे हा दृष्टीकोन ठेवला तर प्रवास सोपा होतो.
पुस्तकाची Amazon लिंक :

गुलामाचं जिणं, अंधारातलं जगणं
बीड हा दुष्काळाच्या छायेतला मागास जिल्हा. पाऊस कमी. सिंचन व्यवस्था नाही, त्यामुळे शेती नाही. उद्योगधंदे नाहीत, त्यामुळे हाताला काम नाही. मग माणसाने पोट भरावं कसं? या परिस्थितीत जगण्यासाठी इथली माणसं उस तोडायला जातात. सांगली-कोल्हापूरपासून पार कर्नाटकपर्यंत. सहा सहा महिने बायको पोरांसह तिकडेच राहतात. त्यांच्या राहण्याला ‘राहणं’ कसं म्हणणार? फाटक्या-तुटक्या उघड्या खोपट्यातला तो संसार. पहाटे तीनपासून काम संपेपर्यंत गुरासारखं राबायचं. काहीबाही शिजवून पोटात ढकलायचं. रानटी प्राणी आणि रानटी माणसं यांच्या भीतीखाली जगायचं. कामगार म्हणून नोंद नसल्याने ना वेतननिश्चिती, ना बोनस, ना पेन्शन. पोराबाळांच्या शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या सगळ्या वाटा खुंटलेल्या जणू गुलामाचं जिणंच. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं झाली. पण लोकांचं तोंड गोड करण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या उसतोड कामगाराचं आयुष्य मात्र कडूजार आहे. ‘भारत आमचाही देश आहे. आणि आम्हाला इतरांसारखं मानाचं जगणं हवं आहे’, असं त्यांचं म्हणणं आहे. उसतोड कामागारांचे प्रश्न, त्यांच्या बायकामुलांच्या समस्या, त्यांचं जिणं सुधारावं यासाठी शासनस्तरावर झालेले प्रयत्न, ‘शांतिवन’ या संस्थेमार्फत राबवले जाणारे उपक्रम आणि मागण्या यांची दोन दशकांतील कामाच्या आधारे चर्चा करणारं पुस्तक.
पुस्तकाची Amazon लिंक :

अखंड भारत का आणि कसा?
अखंड भारत का आणि कसा? हा विचार समोर मांडताना सांभाव्य बदलांसाठी लागणारे सांस्कृतिक अधिष्ठानही वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अखंड भारताचे सांस्कृतिक अधिष्ठान अधोरेखित करताना भारत खंडित कसा झाला याविषयाची मांडणी या पुस्तकात केली आहे. त्याच बरोबर आपल्या सांस्कृतिक शक्तीचा आधार घेऊन नव्या स्वरूपात आपला देश कसा एकसंघ होऊ शकतो याचा आराखडा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

आत्रेय विनोद
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष. या शताब्दी वर्षात ‘आत्रेय विनोद’ अशा स्वरूपाचं एक स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध व्हावं असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात आचार्य अत्रे यांचं अनन्यसाधारण स्थान आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात अतिशय संस्मरणीय कार्य करून त्यावर आपली स्वतंत्र मुद्रा उमटविणारा आचार्य अत्रे यांच्यासारखा अन्य साहित्यिक महाराष्ट्रामध्ये झाला नाही; ही वस्तुस्थिती आहे. विविध क्षेत्रांमध्ये संचार करताना आचार्य अत्रे यांनी आपल्या तल्लख विनोदबुद्धीचा वापर अतिशय परिणामकारक रीत्या केला होता. किंबहुना आचार्य अत्रे यांनी विनोदाचा अनेक अंगांनी अभ्यास करून त्याचा सामाजिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी आणि समाजातील अनिष्ट प्रवृत्ती उद्ध्वस्त करण्यासाठी वापर कसा केला हा एक संशोधनाचा, दीर्घ अभ्यासाचा विषय ठरावा. ‘आत्रेय विनोद’ हे शीर्षक देऊन आचार्य अत्रे यांच्या विनोदी लेखन आणि वक्तृत्व शैलीची विविध रूपं सादर करण्यामागं हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

झिंदाबाद
‘झिंदाबादबद्दल चार शब्द…’ घराण्याचा, खानदानीचा अनाठायी अभिमान बाळगणाऱ्या अनेक व्यक्ती मी जवळून बघितल्या आहेत. घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी ही सर्व मंडळी कोणत्या थराला जाऊ शकतात याचे प्रतिबिंब ‘झिंदाबाद’ मधे रंगविण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातील प्रसंग आणि व्यक्तीरेखा मात्र काल्पनिक आहेत. वास्तवातील कोणा व्यक्तीशी अगर प्रसंगाशी साधर्म आढळल्यास तो योगायोग समजावा.
पुस्तकाची Amazon लिंक :

निसर्गायन – पर्यावरणस्नेही चित्रकाव्यसंग्रह
निसर्गातील पशु, पक्षी, पान, फूल, फळ, पाणी या मूक घटकांचे संमेलन हे कवी डॉ. सुधीर मोंडकररचित ‘निसर्गायनात’ भरलेले आढळेल. प्रसंगी त्यांचे मानवीकरण करून त्यांना बोलते केले आहे. प्रस्तावनाकार डॉ. प्रसाद कर्णिक यांच्या मते ‘निसर्गायन’ हे खऱ्या अर्थाने निसर्गाचे गायन ठरले आहे! ‘भूगोल, इतिहास, विज्ञान, स्थापत्यशास्त्र या ज्ञानशाखा नैसर्गिक आहेत’ ही जाणीव डॉ. मोंडकरांचा हा चित्रकाव्यसंग्रह करून देतो.
पुस्तकाची Amazon लिंक :

मृत्यूची आत्महत्या
‘मृत्यूची आत्महत्या’ मधील बोरकरांची कथासृष्टी विविध स्वभाव गुणांच्या इरसाल माणसांचे एक वेगळेच दर्शन घडविते. मानवी जीवनात घडणाऱ्या अनपेक्षित चमत्कृतींचे आणि अतर्क्स विसंगतींचे बोरकरांना विशेष आकर्षण असल्याचे जाणवते. ते चमत्कृती शोधतात, मात्र कृत्रिमपणे ती लादीत नाहीत. माणसाची अनेक दुःखे हळवी आणि अबोध असतात. अशा दुःखांच्या उद्रेकातून कित्येकदा जी भावनिक तरल आंदोलने मनात उचंबळून येतात. ती बोरकर अतिशय हळुवारपणे आणि जशीच्या तशी टिपतात. हेच त्यांच्या भाषाशैलीचे सामर्थ्य होय !
पुस्तकाची Amazon लिंक :

यमगरवाडीची गोष्ट
ही गोष्ट आहे माणसांची आणि माणुसकीची. यमगरवाडीच्या ओसाड माळरानावर फुललेल्या नंदनवनाची. हा समाज आपला आहे, त्याच्या उत्थानास आणि पतनास आपणच जबाबदार आहोत अशा मनोभूमिकेतून काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्ते बांधवांची. ही गोष्ट आहे विकासाची, उन्नतीची आणि माणूसपणाची पायवाट महामार्गात बदलणाऱ्या अनाम हितचिंतक, सहृदय माणसांची. बंधुभाव हाच धर्म मानून नव-समाज रचनेचे स्वप्न साकार करण्यासाठी श्रमणाऱ्या हाताची. ही यमगरवाडीची गोष्ट..
पुस्तकाची Amazon लिंक :

पुस्तक प्रकाशन : तंत्र आणि मंत्र
‘सेल्फ पब्लिशिंग’ म्हणजे आपले स्वत:चे पुस्तक स्वत: प्रकाशित करणे. ‘सेल्फ पब्लिशिंग’हे संपूर्ण मार्गदर्शन या पुस्तकात आहे. पुस्तकात दिलेले ‘तंत्र आणि मंत्र’ वाचून कोणाही लेखकाला त्याचे पुस्तक स्वत: प्रकाशित करता येईल. किंवा, स्वत:ची प्रकाशन संस्था उभी करून अन्य लेखकांचीही पुस्तके तो किंवा ती प्रकाशित करु शकेल. पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याची विक्री ‘अँमेझॉन’ सारख्या ऑनलाईन बाजारपेठेत करण्याची संपूर्ण कार्यपद्धती देखील या पुस्तकात सविस्तर दिली आहे. ते कानमंत्र वाचून आपल्या पुस्तकाची विक्री त्याला / तिला देशभरात सर्वत्र करता येईल. त्यामुळे, नव्याने प्रकाशन क्षेत्रात येणारांसाठी तसेच नवलेखक आणि नवप्रकाशकांसाठी हे बहुमोल व सर्व समावेशक गाईड आहे. आपण किंवा आपले निकटवर्ती जर ‘व्हॉटसॲप ग्रुप्स’वर, ‘फेसबुक’वर किंवा ‘ब्लॉग’ वा तत्सम माध्यमातून सातत्याने लेखन करीत असाल तर हे पुस्तक आपणा सर्वांसाठी अक्षरश: वरदान आहे. कारण आपले साहित्य पुस्तक रुपाने प्रकाशित करण्याचा हक्काचा आणि खात्रीचा मार्ग आपल्याला त्यात सापडेल. आपल्या संपर्कातील लेखक / लेखिका किंवा कवी / कवयित्री यांना जरूर हे पुस्तक ‘गीफ्ट’करा. त्यांना त्यांच्या आयुष्यात मिळालेली ही सर्वोत्तम आणि अमूल्य अशी भेट
पुस्तकाची Amazon लिंक :

Mastering ChatGPT – Discover The Most Useful Secrets
ChatGPT is a powerful new tool that can be used for a variety of purposes, from learning new things to being more productive at work. In this book, you will learn how to use ChatGPT to its full potential. This book is a must-read for anyone looking to take advantage of the latest technological advancements in artificial intelligence. The author,Vivek Mehetre is an expert in AI, has created a comprehensive guide that takes readers through the various applications of ChatGPT in their everyday lives. The book is well-organized, with each chapter focusing on a specific topic, and is filled with practical advice, 501 Best Prompts and tips that can be easily implemented. You will learn how to: Give ChatGPT clear and concise instructions Use natural language to communicate with ChatGPT Provide examples to help ChatGPT understand what you are looking for Give feedback to help ChatGPT improve You will also learn about the ethical implications of using ChatGPT, and how to use it in a responsible way. By the end of this book, you will be an expert in using ChatGPT You will be able to use it to learn new things, be more productive at work, and be more creative. You will also be able to use it in a responsible way. Order your copy of “Mastering ChatGPT Discover The Most Useful Secrets Unlocking the Power of ChatGPT” (Practical Tips, Tricks, 501 Prompts & Strategies for Daily Application) today and start unlocking the power of ChatGPT
पुस्तकाची Amazon लिंक :

एक लहान भिरभिरतं गोरंगोबरं फुलपाखरू माया अचानक तिला मोठ्या नाट्यमय प्रसंगाने सिनेमात प्रवेश मिळतो. तिच्यासाठी भूमिका निर्माण केली जाते. आणि तो सिनेमा मेगा हिट होतो.. नंतर ती अकरावीच्या बोर्डात पहिली येते. आणि तिला नायिका म्हणून चित्रपट करायची ऑफर येते. त्या वाटेने ती पुढे जाते. अनेक हिट सिनेमे, लोक ज्याला देव मानतात त्या हिरो बरोबर. अनेक रजत जयंती चित्रपटांमध्ये भूमिका. मग हिंदी सिनेमा सृष्टीत अयशस्वी प्रवेश. त्यानंतर अपरिहार्यपणे राजकारणात प्रवेश. नंतर पक्षाचे प्रमुखपद पेलायला लागते. राजकारणाच्या सन्मान – अपमान तसेच विजय- पराजय यांच्या भोवंडून टाकणाऱ्या वावटळीत सापडते. सतत सोबतीला एक अत्यंत जिवाभावाची, वेगळ्याच नात्याने घट्ट बांधली गेलेली सखी. तिच्या चिरंतन विरहाच्या शंकेनेच माया विव्हल, विकल क्रौंची होते. दृष्टीसमोर घडलेल्या त्या महाकाव्याने सगळ्यांची मने हेलावून गेली. एका कुटिल राजकारणी स्त्रीची पुढे संवेदनशील स्त्री होते. आणि राजकारणाला एक सकारात्मक तत्त्वज्ञान आणि वेगळा अर्थ देते.
पुस्तकाची Amazon लिंक :

हे आहे एका थोर वीरावरील शौर्यनाट्य! १८५८च्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीचा ऐतिहासिक आढावा घेणारे हे क्रांतिनाट्य सर्वांनी वाचलेच पाहिजे असे आहे…
पुस्तकाची Amazon लिंक :

श्री. चंद्रकांत घाटाळ या आदिवासी भागातील नवोदित, होतकरू खगोलाचा अभ्यासू असलेल्या तरुणाच्या कथांचे विश्लेषण व्हावे, असे अगत्याने वाटले. विश्वात आपण एकटेच आहोत का, हा इतर जणांना पडणारा प्रश्न त्यांनाही अस्वस्थ करीत होता. आकाश हा एक पडदा आहे व हे चमचमणारे तारे दोरीने लटकवलेले दिवे असावेत असे त्याला वाटे. तिथेच विज्ञानकथेचे बीज त्याच्यात रुजले असावे. ऐन तारुण्यात निसर्गाचे ‘तारांगण’ कवेत घेऊन बसला. त्याच्या आतापर्यंतच्या जीवनाची वाटचाल मृगजळाच्या मागे धावून धावून थकलेल्या, जीवनमूल्यापासून ढळलेल्या, स्पर्धेत जिंकण्यासाठी प्रसंगी नीतीमत्तेचा त्याग करणाऱ्या सुशिक्षितांसाठी एक आदर्श ठरणारी आहे. – जोसेफ तुस्कानो
पुस्तकाची Amazon लिंक :

‘अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता नेमाने तुज नमितो गातो, तुझ्या गुणांच्या कथा… शाळेच्या दिवसातील, सदैव म्हटली जाणारी आणि कधीच विसरता न येणारी ही प्रार्थना! किंवा… ‘या गडे हासू या, या गडे नाचू या गाऊ या मंगल गान… यासारखं उत्साह गीत असेल… नाहीतर ‘कळला नाही देव कुणा राम म्हणा कुणी रहीम म्हणा…’ अशा गीतातून मानवधर्माची पताका मनामनात फडकवीत ठेवणाऱ्या कवयित्री, साहित्यिका संजीवनी मराठे! ‘लहानपणी मी पाहिला होता, अजब बंगला कळत नाही की आता तो, आभाळात कसा गेला?’ यासम बालकवितेचा महाल आपल्या शब्दलावण्याने समृद्ध करणाऱ्या नामावलीतलं एक जुनं, जाणतं ठसठशीत नाव संजीवनी मराठे! सकारात्मक आत्मभानात तल्लीन झालेली सौंदर्यमग्न कवयित्री. त्यांच्या शब्दरूपी पाऊलखुणांचा हा कदाचित पहिलाच धावता आलेख ठरावा.
पुस्तकाची Amazon लिंक :

‘जगाच्या आतील एक वेगळे जग’ व ‘जिथे स्वतः देव नांदतो’ असं म्हणत ज्या ठिकाणाची तारीफ केली जाते ते ठिकाण म्हणजे हिमाचलची “स्पिती व्हॅली” ! हिमाचल प्रदेशच्या उत्तरपूर्वीय भागात म्हणजेच भारत आणि तिबेट सीमेजवळ जी कोल्ड डेझर्ट माउन्टन व्हॅली पसरलेली आहे तीच ही स्पिती व्हॅली. याव्यतिरिक्त सांगला आणि पिन या नद्यांच्या खोऱ्यातही हिमालयाची सुंदर आणि रौद्र रूपे एकाच वेळी अनुभवयास मिळतात. निसर्गाशी साधर्म्य साधत बांधलेल्या वेगवेगळ्या पर्यावरण स्नेही स्तुपांमधून, गोम्पांमधून साचेबद्ध, आखीव-रेखीव सौंदर्यखुणा आपल्याला ठायी ठायी दिसतात. ही आहेत अतिशय दुर्गम पर्यटन स्थळे ! आपल्या अफलातून सौंदर्यामुळे आता अधिकाधिक पर्यटकांना आकर्षून घेत आहेत. केवळ भटकेच नव्हेत तर बायकर्सना, फोटोग्राफर्सना आणि सोलो ट्रेकर्सनाही इथली भुरळ पडते आहे! अशा स्पिती-पिन-सांगला या तीन खोऱ्यातली ही भटकंती.
पुस्तकाची Amazon लिंक :

“तू फार चांगलं नाटक केलंस असं रत्नाकर मतकरी म्हणाले मला”. पिंजारलेल्या कुरळ्या केसांचे कलंदर दिसणारे चासकर चष्म्यातून माझ्याकडे रोखून पहात म्हणाले. पाईप ओढणाऱ्या, रंगीत चित्रांच्या डिझाईनचा शर्ट घातलेल्या आणि इंदुरी ढंगाच्या मराठीत बोलणाऱ्या चासकरांच्या एकूणच वागण्याबोलण्यात एक अनौपचारिकता होती. मला वाटलं ते म्हणतील, “ठेवून जा. मी वाचीन नंतर. ” पण ते म्हणाले, “हं, वाच काय आणलंयस ते.” त्यांच्या या इशाऱ्याबरोबर मी माझी संहिता वाचायला सुरूवात केली. पाईपातून धुराचे लोट सोडत, डोळे बारीक करून ते ऐकत होते. मधेच पान उलटताना वाटलं, हे लक्षपूर्वक ऐकतायत की यांना पेंग आली आहे? पण मधेच हुंकार देऊन ते हसले तेव्हा कळलं ते बारकाईने ऐकत होते. तीन प्रवेशांच्या लघुनाटकाचं माझं वाचन संपल्यावर काही क्षण ते गप्प राहिले. यांना आवडलं असेल का ? स्वतः वाचून त्यांना कल्पना आली असती की मी वाचून दाखवल्यामुळे विनोद अधिक चांगला पोहोचला ? असा काही विचार मी करत असतानाच चासकर एकदम ‘हे चांगलं आहे. यातला एक भाग गजरा साठी आपण करू या’ असं म्हणाले. या त्यांच्या वाक्याने चासकरांनी माझ्यासाठी टीव्ही माध्यमाचं दार उघडलं. – दिलीप प्रभावळकर
पुस्तकाची Amazon लिंक :

डॉ. यादवराव गावळे यांच्या ‘माडिया पिल्लो’ या कवितासंग्रहात आदिवासी मनाचा सुंदर आविष्कार प्रकट झाला आहे. झाडीपट्टीतील चंद्रपूर-गडचिरोलीच्या जंगलवनातील आदिम सुख-दुःखाचे सूर तिथल्या निसर्गातील प्रतिमा घेऊन या कवितेतून उमटले आहेत. झाडीबोलीचा गोडवा घेऊन आलेल्या या कवितेत मातेच्या ओवीची लय आणि झाडीपट्टीतील मातीचा गंध भरला आहे. जल-जंगल-जमीन आणि माडिया गोंडी संस्कृतीच्या अस्सल अनुभूतींचे दर्शन या कवितांमधून घडते.
पुस्तकाची Amazon लिंक :

मुंबई ब्रिटीशांची होती तेव्हा…
मुंबई एके काळी ब्रिटीशांची होती, तो काळ अवघड होता. ग्रामीण भाग सोडा, भारतातल्या मुंबईसारख्या शहरांत सुद्धा विकास शुन्य आणि पडिक व उजाड परिसर सर्वत्र पसरलेला होता. पोष्ट खातं नव्हतं. रेल्वे नव्हती, पोलिस नव्हते पण लुटारु, दरोडेखोर मात्र सर्वत्र होते. अंधश्रद्धेचा पगडा घट्ट होता. मुलगी जन्माला आली की तिला मारून टाकण्याची स्त्रीभूणहत्येची मोठीच समस्या होती. विधवेला जगण्याचा हक्क नाकारणारी सतीची प्रथा होती. ब्रिटीश अशा प्रथांविरुद्ध उभे राहिले. विकासाचा मार्ग शोधत त्यांनी रेल्वे आणली. रस्ते आणि पूल बांधले. शाळा, कॉलेजेस, वाचनालये उभी केली. शिस्तीचं महत्त्वही त्यांनी आपल्यावर ठसवलं. पहिला मराठी शब्दकोशही ब्रिटीशांनीच तयार केला. पारतंत्र्याची काळी बाजू, इंग्रजांचे जुलूम आणि दडपशाही आपण पाठ्यपुस्तकात घोटून घोटून शिकलो. पण सुर्दैवाने, ब्रिटीशांच्या त्या सत्ताकाळाला वर उल्लेखलेली विधायक बाजूही होती. इतिहासाने नोंदवलेल्या त्या विधायक बाजूचे काही स्फूर्तिदायक आणि उद्धोधक असे कंर्गोरे ह्या पुस्तकांत आले आहेत.
पुस्तकाची Amazon लिंक :

वॉकिंग ऑन द एज् (सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून सलग ७५ दिवसांची भटकंती)
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांवर प्रेम करणारा एक भटक्या. त्याने ध्यास घेतला, सह्याद्री घाटमाथ्याच्या धारेवरून उभा महाराष्ट्र चालत जायचं, उत्तरेहून दक्षिणेकडे. कडेकपारीतले तब्बल हजार किलोमीटर ! हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तो ७५ दिवस एकट्याने चालत राहिला. रोज २०-२५ किलोमीटरची तंगडतोड केल्यावर जे गाव लागेल तिथे मुक्काम करायचा, जे घर आस्थेने विचारपूस करेल तिथे राहायचं आणि जे पानात वाढलं जाईल ते खायचं. रात्री पाठ टेकायची, की दुसऱ्या दिवशी पुन्हा पुढचा प्रवास सुरू. अशा पायपिटीची ही गोष्ट. या भ्रमंतीत जसं सह्याद्रीचं रौद्र रूप सामोरं आलं, तसंच दऱ्याखोऱ्यांमध्ये- पठारांवर राहणारी माणसं आणि त्यांच्यातली माणुसकी भेटली. त्याच वेळी रोजच्या अनिश्चिततेमुळे मनात खोलवर दडून बसलेल्या भीतीशीही सामना करावा लागला. पठाराचा काठ आणि आव्हानं अशा दोन्ही अर्थाने ‘एज्’वरून केलेल्या भटकंतीतल्या अनुभवांची ही शिदोरी.. बॉकिंग ऑन द एज्.
पुस्तकाची Amazon लिंक :

लोकपरंपरेचे शिल्पकार
सत्याला आणि कलेला जात-धर्म नसतो शाहिरीसुद्धा तशीच ! डॉ. गणेश चंदनशिवे या प्रतिभावंत संशोधकाने १९ व्या शतकापासून २१ व्या शतकापर्यंतच्या शाहिरी मानदंडाचा नवा संशोधनपर चरित्रात्मक इतिहास महाराष्ट्राला सादर केलाय. तमासगीर आणि कलापथकीय शाहिरांची ही लघुचरित्र मालिका मराठी माती आणि संस्कृतीचे वैभव आहे. फंदी, प्रभाकर, राम जोशी, होनाजी ते थेट छगन चौगुले- मीराबाई उमप व्हाया पठ्ठे बापुराव, शिवा-संभा, भाऊ फक्कड, काळू- बाळू, अमरशेख, अण्णाभाऊ, गवाणकर, दादा कोंडके, विठाबाई, यमुनाबाई, दत्ता महाडिक यांची परंपरा डॉ. चंदनशिवे यांच्या संशोधनात्मक अभ्यासावर पेलून सन्मानित केली आहे. त्यामुळे मराठी माती व लोकसंस्कृतीचे अंतरंग समजून घेता येते. अभिजनांच्या कला प्रतिष्ठा भोगताना श्रमिक बहुजन शाहिरांची लोककलासुद्धा श्रेष्ठ संचित असल्याचे सांस्कृतिक सत्य डॉ. चंदनशिवे यांनी या ग्रंथातून सिद्ध केलेय. हा ग्रंथ किती मोठा आहे, त्यापेक्षा त्याने मराठी लोककला अभ्यासविश्वाला काय दिले? हे मला महत्त्वाचे वाटते. आता लोककलावंतांची उपेक्षा संपली, शाहिरांचे चरित्र हेच मराठी संस्कृतीचे चारित्र्य असल्याची साक्ष हा ग्रंथ देतो. डॉ. चंदनशिवे यांचे अभिनंदन!
पुस्तकाची Amazon लिंक :

मेतकूट
‘लोकप्रभा‘तून वाचकांशी नव्याने ‘मेतकूट‘ जमवायला बसलोय. (एक सात रुपयांचं बॉलपेनही स्वतःच्या पैशांनी आणलंय. व्हाउचर बनवू का?) वर्षभर वाचकांची सुटका नाही. भोग असतात आणि ते भोगूनच संपवावे लागतात. चौसष्ट साली पहिले दोन लेख ‘अमृत‘मध्ये लिहिल्यानंतर मी माझा तिसरा लेख ‘श्रीयुत‘ या दुसऱ्या डायजेस्टमध्ये लिहिला, तेव्हा मी एका प्रश्नाने हैराण झालो होतो. माझ्या पहिल्या दोन लेखांच्या निष्ठावंत वाचकांना (?) मी आता दुसरीकडे लिहिलंय हे कळणार कसं? आज बेचाळीस वर्षांनंतर हाच प्रश्न मला तेवढ्याच तीव्रतेने पडलाय. माझी शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीसारखी तळपणारी तेजस्वी लेखणी मी ‘लोकप्रभा‘साठी परजतोय ही गोष्ट जगभर पसरलेल्या माझ्या कोट्यवधी वाचकांना कळणार कशी?…
(‘लोकप्रभा‘मधील ‘मेतकूट‘ या सदरातील पहिला लेख)
पुस्तकाची Amazon लिंक :

घुमट : भीती आणि रहस्य यांनी भारलेला
भा. रा. भागवत म्हणजे बालसाहित्य, उत्तम अनुवाद, विनोदी कथा आणि विज्ञान साहित्य यांच्याशी जोडलेले ‘बालमित्र’ साहित्यिक ! त्यांचे फास्टर फेणे आणि बिपीन बुकलवार तर कित्येक पिढ्या लहानांपासून थोरांच्या मनात कायमच घर करून बसले आहेत. पण भा. रां.च्या मोठ्यांसाठी लिहिलेल्या भयकथा आणि रहस्यकथा याबद्दल कधी ऐकले आहे का? नाही ना? दीर्घकाळ बालसाहित्याशी जोडल्या गेलेल्या भागवतांनी मोठ्यांसाठी लिहिलेल्या; विलक्षण रहस्य-उत्कंठा-थरार यांचे अफलातून मिश्रण असलेल्या; काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या या भय/रहस्यकथा प्रदीर्घ कालावधीनंतर परत येत आहेत आपल्या मनाचा आणि काळजाचा ठाव घेण्यासाठी! भा. रां.ची एक खास दुर्मीळ चीज- भीती आणि रहस्य यांनी भारलेला… ‘घुमट’!
पुस्तकाची Amazon लिंक :

Navigating the Seas of Marine Engineering
Navigating the Seas of Marine Engineering for Trainee Marine Engineers” is an indispensable textbook designed to equip aspiring marine engineers with a solid foundation in the field. Whether you are a trainee embarking on a career at sea or a maritime enthusiast seeking to understand the intricacies of marine engineering, this book offers a comprehensive guide that covers all essential aspects. Trainee marine engineers will gain valuable insights into how the principles learned can be applied to actual scenarios in the maritime industry. Mr. Sudhir Jakhadie’s deep understanding of the subject matter and his passion for the maritime industry shine through in every chapter. This book is an essential addition to your library. Join us on this educational journey and unlock the key to success in the dynamic world of marine engineering.
पुस्तकाची Amazon लिंक :

रानभुलीचे प्रदेश
विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी लिहिलेलं ‘रानभुलीचे प्रदेश’ हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. यामध्ये हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या अनेक रचनांविषयी अतिशय रसाळ पद्धतीनं मांडणी केलेली आहे. त्या रचनांचं संगीत आणि काव्य आणि त्या रचनांमध्ये किस्से, त्यातल्या संगीतामधले बारकावे हे अतिशय छान पद्धतीनं उलगडून सांगितलेलं आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

तुजसाठी रे… जिवलगा
‘तुजसाठी रे जिवलगा ‘ ही त्यांची पुस्तक स्वरूपातील प्रथमच कादंबरी जन्माला आली. या लेखनात त्यांनी ‘प्रेम’ या अमूल्य शब्दाचा अर्थ किती अतुल्य आहे हे प्रत्येक स्तरातून यामध्ये दर्शविला आहे. आजकाल प्रेम या शब्दाकडे पहाण्याचा दृष्टीकोनच बदललेला आपल्याला सर्वाना दिसून येतो. कादंबरीच्या नायिकेत भूमिका करत असलेली प्रीती प्रेमाच्या जगातील खूप सुंदर जग जगत आहे शिवाय. आयुष्यात येणाऱ्या अनेक वैचारिक पातळीवर, सामाजिक, मानसिक, भौगोलिक असे अनेक मुद्दे अगदीच प्रेमाने हाताळताना दिसून येते. प्रेम हे फक्त व्यक्तीवरच केलं जातं इथंपर्यंतच गोष्टी मर्यादित नसून या पूर्ण आसमंतात आपल्याला प्रेम ही भावना कशी जपता येईल, जगता येते याचा सुरेख संगम इथे लेखिकेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

माणूसपणाची सनद
माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला यावर त्याच्या जगण्याचे मोल ठरत असते. माणसाच्या जन्माबरोबर त्याच्या वाट्याला आलेले रंग आणि रूप हे निसर्गदत्त घटक बदलता येत नाहीत मात्र प्रयत्नपूर्वक जीवनाची गुणवत्ता सुधारता येते. त्यासाठी जीवनदृष्टी आवश्यक असते. ती चांगल्या विचारांच्या पेरणीतून मिळते. अशाच विचारांची दिवेलागण प्रसिद्ध कवी उद्धव कानडे यांनी त्यांच्या ‘माणूसपणाची सनद’ या पुस्तकात केली आहे. जगण्याच्या परिघात येणाऱ्या अनेक विषयांवरचे मौलिक चिंतन या पुस्तकातील लेखांमध्ये आहे. जगात मोठी आई आणि भुई या लेखापासून सुरू झालेला प्रवास जगण्याच्या महाभारताला कवेत घेत माणूस धर्माला जागविणाऱ्या मूल्यांपर्यत येऊन पोहोचतो. माती, नाती आणि संस्कृती यांचा उद्घोष करणाऱ्या या लेखनात माणूसपणाचा परिमळ दरवळतो आहे. काळजाला भिडणारे शब्द आणि अंतर्मुख करणारे विचार यामुळे हे पुस्तक वाचकांच्या जाणिवा समृद्ध करेल अशी मला खात्री आहे. समाजवास्तवावर परखडपणे बोट ठेवताना माणसांचा जीवनोल्हास थोडाही कमी होणार नाही याची दक्षता लेखक म्हणून कानडे यांनी घेतली आहे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. बाहेरच्या प्रचंड कोलाहलात ‘आतल्या आवाजाचे विस्मरण’ झालेल्या समाजात तो ऐकण्याची उत्कंठा निर्माण झाली तर ते या पुस्तकाचे खरे यश असेल.
– प्रा० मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
पुस्तकाची Amazon लिंक :

आरोग्याचे संविधान : आरोग्यामृत
‘आरोग्यामृत’ पुस्तकाच्या माध्यमातून ‘आयुष पॅथी’ अंतर्गत येणाऱ्या योग, आयुर्वेद, अध्यात्म, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी या सर्व पॅथींचा साकल्याने विचार करून आजार अवस्थेनुरुप चिकित्सा विचार आणि उपचार पद्धती यांची ओळख करून देण्याचा डॉ. आनंद मोरे यांनी प्रयत्न केला आहे.”
– मा. ना. श्री. भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र
पुस्तकाची Amazon लिंक :

जालियनवाला बाग (१३ एप्रिल १९१९ – भारतीय स्वातंत्र्याचा ट्रिगर पॉइंट)
१३ एप्रिल १९१९. बैसाखीचा – पंजाबी नववर्षाचा दिवस. ब्रिगेडियर जनरल डायर ५० रायफलधारी शिपायांसह चिंचोळ्या प्रवेशद्वारातून जालियनवाला बागेत शिरला. समोर मैदानात सुरू असलेल्या सत्याग्रही सभेतील निःशस्त्र, निरपराध समुदायाकडे निर्देश करून, त्याला कोणतीही सूचना न देता, बचावाची कुठलीच संधी न देता त्याने आदेश दिला,’फायर sss’ आणि लष्करी कौशल्याने रायफली धडधडल्या… शेकडो लोकांचे प्राण गेले. अमृतसरमधील या निर्दयी घटनेमुळे वसाहतवादी इंग्रजांचा दमनकारी चेहरा उघड झाला. त्यांच्या सभ्यतेची लक्तरं जगात टांगली गेली. ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा ट्रिगर पॉइंट ठरली! भारतातील इंग्रज राजवटीच्या अखेरीची ही सुरुवात ठरली… महात्मा गांधी म्हणाले, ‘प्लासीच्या लढाईने ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला, अमृतसर घटनेने त्याला हादरा दिला!” जुलूम, अत्याचाराची ही कहाणी, जी भारतीय स्वातंत्र्याची चेतना बनली.
पुस्तकाची Amazon लिंक :

मी – स्मिता जयकर
स्मिता जयकर म्हटल्यावर त्यांची यशस्वी रंगबेरंगी कारकीर्द आपल्याला स्तिमित करते. कौटुंबिक सुरक्षित वातावरणातून स्मिता जयकर पहिल्यांदा बाहेर पडल्या पंचतारांकित हॉटेलमधील नोकरी साठी. त्यानंतर दूरदर्शनचा पडदा तसं पाहिलं तर योगायोगच पण अभिनय आणि परिश्रमाच्या जोरावर हिंदी-मराठी मलिक, मराठी चित्रपट आणि मराठी रंगभूमीवरचा सहज वावर स्मिता जयकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सहज घेऊन गेला. स्वतःचं गृहिणीपण आणि मराठीपण जोपासणाऱ्या स्मिता जयकर या प्रगल्भ नायिकेचं हे आत्मकथन मनोरंजन क्षेत्राबद्दल कुतूहल असणाऱ्या वाचकांना नवा विश्वास देऊन जाईल.
पुस्तकाची Amazon लिंक :

वन्य पशू-पक्ष्यांच्या अजब करामती
श्री. सुरेश देशपांडे यांनी एक अतिशय मजेदार पुस्तक वाचकांच्या हाती दिलं आहे. हे पुस्तक त्यांनी जपलेल्या अनोख्या छंदातून निर्माण झालं आहे. वन्यजीवांच्या अजब करामतींविषयी ठिकठिकाणी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणं जपून ठेवण्याचा त्यांना छंद आहे. या जपलेल्या पोतडीतून ते आता वाचकांसाठी घेऊन आले आहेत चटपटीत, चविष्ट आणि गमतीदार गोष्टींच्या ओंजळी! या गोष्टींत डॉलरच्या हजारो नोटा वापरून वाहत्या नाल्यावर बंधारा बांधणारं जलमांजर, पैशाचं पाकीट पळवणारा पोपट, संजीवनी बुटी आणून देणारं माकड, दारू पिऊन गोंधळ घालणारा हत्ती आणि तुटलेल्या पायाऐवजी लोखंडी चाक लावून फिरणारं कासवही आहे. वाचकांचं मनोरंजन करू शकेल आणि त्यांच्या ज्ञानात भर घालू शकेल असं या पुस्तकात खूप काही आहे. पुस्तकातून वने, वन्य पशू-पक्षी आणि जैवविविधता याबद्दल भरपूर माहिती मिळते. इतकंच नव्हे तर त्यांनी प्रसिद्ध पशु-पक्षी तज्ज्ञांची शब्दचित्रंही रेखाटली आहेत. विशेष म्हणजे हे लिहिताना निसर्ग, वने आणि वन्य प्राणी यांचा होत चाललेला नाश पाहून लेखकाला होणारं दुःख आणि त्याच्या मनातील पोटतिडीक लेखनातून पदोपदी जाणवल्याशिवाय राहत नाही. लेखक लहानपणापासून जंगलात राहिले आहेत. तो त्यांचा वारसा आहे. त्यांनी नोकरीदेखील वन विभागातच केली आहे. सर्व अनुभवांवर आधारित असलेल्या या लेखनाला त्यामुळं एक भक्कम बैठक लाभली आहे हे विशेष! ‘वन्य पशू-पक्ष्यांच्या अजब करामती’ हे पुस्तक वाचनीय तर आहेच; पण संग्रही ठेवण्यासारखंही आहे.
– डॉ. आनंद मसलेकर, माजी प्रधान वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य
पुस्तकाची Amazon लिंक :

सत्वशील
“मी सदैव हस्तिनापूर आणि कुरुवंशाच्या हिताचाच विचार करत आलो आहे. महाराज धृतराष्ट्र, आपले पुत्र जेवढे कुरुवंशीय आहेत, तेवढेच सम्राट पांडूचे पुत्रही कुरुवंशीय आहेत. महाराज, महर्षी व्यासांच्या भविष्यकथनाचे कदाचित आपल्याला विस्मरण झाले असावे. परंतु माझ्या ते स्पष्ट स्मरणात आहे. कुरुवंशाचा विनाश होऊ नये एवढ्यासाठीच मी आपले पुत्र आणि पांडुपुत्र यांचे सख्य व्हावे म्हणून सतत प्रयत्नशील राहिलो आहे. परंतु मी हस्तिनापूरद्रोही, कुरुवंशद्रोही आहे असे आपल्याला वाटत असेल तर मला महामंत्रीपदाचा त्याग करण्याची अनुमती द्यावी अथवा आपल्या पुत्राच्या इच्छेनुसार मला दंडित करावे.” जीवनभर कौरवांकडून ‘दासीपुत्र’ म्हणून अवहेलना सहन करणाऱ्या विदुरांनी अलिप्ततेने, निर्भयतेने आणि नि:स्पृहतेने आपले कर्तव्य पार पाडले. वेळोवेळी न कचरता कुरुवंशाच्या आणि कुरूराज्याचा हिताचा परामर्श ते देत राहिले. अशा या थोर पुरुषाच्या दृष्टीतून महाभारताचा विस्तीर्ण पट उलगडणारी कादंबरी ‘सत्त्वशील’.
पुस्तकाची Amazon लिंक :

धम्मभूमी ते दीक्षाभूमी… (धर्मांतराचा प्रवास)
“बाबासाहेबांनी देहू रोडच्या मंदिरात तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तेथे धम्मभूमी निर्माण झाली. येथूनच धम्मचक्र प्रवर्तनाच्या क्रांतिपर्वाचं रणशिंग फुंकलं गेलं… काळ आणि इतिहासाच्या स्थित्यंतरात… परंपरेतल्या जोखडातले लोक आता… बुद्ध-धम्मसंघाचे अनुयायी बनले ! धम्मभूमीतून प्रज्वलित केलेली ज्ञानज्योत… मानवमुक्तीची पताका खांद्यावर घेत समताबंधुत्वाचा टिळा कपाळी लावून, लाखो उपेक्षितवंचितांचा काफिला … नागपूरच्या दीक्षाभूमीकडे झेपावला…”
पुस्तकाची Amazon लिंक :

समकालीन मराठी रंगभूमी
‘समकालीन’ हा शब्द उघडपणेच काळाचा निर्देश करणारा आहे. विशिष्ट काळातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पर्यावरण, तत्संबंधित विविध प्रकारच्या समाजविषयक धारणा आणि समस्या, तत्कालीन मानवी जीवनातील आणि नातेसंबंधातील ताणतणाव, सामाजिक आंतरसंबंधातील विसंगती आणि अंतर्विरोध इत्यादींचे प्रतिबिंब वेगवेगळ्या स्वरुपात, साहित्यात पडत असते. त्यातूनच आधुनिक काळात मराठी साहित्याच्या आजवरच्या परंपरेला परिभाषित करण्याच्या प्रयत्नात आपण प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन, आधुनिक, समकालीन इत्यादी संकल्पना मांडत असतो. स्वातंत्र्योत्तर काळात महत्त्वाच्या ठरलेल्या व रंगभूमी व्यापणाऱ्या बहुतेक प्रवृत्ती – प्रवाहांचे समग्र विवेचन करणारे हे संपादन मराठी साहित्यविश्वात अपूर्व ठरेल यात शंका नाही. कारण झाडीपट्टीच्या रंगभूमीपासून ते अगदी ‘शब्दपल्याडच्या’ रंगभूमीपर्यंत एक व्यापक परीप्रेक्ष्य इथे दृष्टीगोचर झाले आहे. यामध्ये लोकरंगभूमी, भरतकालीन रंगभूमी, संगीत रंगभूमी असे देशी प्रभावांचे अनुबंध जसे शोधले आहेत, तसेच शेक्सपिअर, इब्सेन, अस्तित्ववाद, जागतिकीकरण असे विदेशी प्रभावांचे अनुबंधही नेमकेपणाने आणि वस्तुनिष्ठपणाने तपासले आहेत.
पुस्तकाची Amazon लिंक :

संपादन प्रकाश
“संपादक दुरुस्त करत नाही, तो तंदुरुस्त करतो. मग ते लेख असो की बातमी, चित्रपट असो की पुस्तक. तो कसाई नसतो तर तो चांगल्या कलाकृतीला अधिक देखणे करतो. ते करताना तो लोकमान्यांसारखा सरकारला ठणकावून जाब विचारतो, आगरकरांसारख्या सामाजिक सुधारणांचा ध्यास घेतो, गोविंद तळवळकर यांच्यासारखे वाचन करतो. माधव गडकरी यांच्यासारखे माणसांमध्ये मिसळून माणसांचेही वाचन करतो. विजय कुवळेकर यांच्यासारखा कलाप्रेमी असल्याने ‘आतलं आकाश’ शोधतो. तो कुमार केतकर यांच्यासारखे ‘बदलते विश्व’ टिपतो आणि तो अरुण टिकेकर यांच्यासारखी ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ जमवितो. संपादनाची आणि संपादकाची एक चांगली,सुदृढ परंपरा आपल्याला लाभली आहे. त्यामुळे नव्या तरुणांनी संपादनाच्या क्षेत्रात येऊन प्रतिष्ठा कमवावी, हे सांगणारेही हे पुस्तक आहे.” …निमित्त आहे साहित्यसेवक, लेखक, समीक्षक रविप्रकाश कुलकर्णी यांच्या एकाहत्तरीचे. त्यांचा गौरव करतानाच संपादन म्हणजे काय, संपादकाने कसले कसले भान ठेवले पाहिजे, पुस्तकाच्या लिखाणापासून ते विक्रीपर्यंत काय काय करावे लागते, त्यातील अडथळे कोणते, अशा प्रश्नांचा वेध म्हणजे हे पुस्तक.
पुस्तकाची Amazon लिंक :

श्री अक्कलकोट निवासी स्वामीमहाराज यांचे चरित्र
एकोणिसाव्या शतकांतील भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचे जे सप्तपुरुष होऊन गेले त्यांच्यामध्ये श्रीस्वामी समर्थ (अक्कलकोट) हे पुरुषोत्तमासारखे शोभतात. परमात्मस्वरूपाशी यांचे एवढे तादात्म्य झाले होते कि कित्तेक प्रसंगी “मीच राम झालो होतो, मीच कृष्ण झालो होतो, दत्तनगर मूळ पुरुष, वडाचे झाड, मूळ मूळ” असे उद्गार त्यांच्या तोंडून निघत. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये आणि शब्दामध्ये मोठी गुढार्थवाचक सूचना असे. श्री. ग. ब. मुळेकर यांनी स्वामींच्या जीवनामधील लहान -मोठे प्रसंग अगदी जसेच्या तसेच आपल्यासमोर मांडले आहेत. सत्पुरुष देहाने गेले तरी सत्तेने जिवंत असतात. जो कोणी आजही स्वामींना अनन्यपणे शरण जाईल त्याला ते मार्गदर्शन करतील. हे पुस्तक वाचून वाचकांना हि शरणागती साधावी, हीच प्रार्थना आहे.
– के. वि. बेलसरे
पुस्तकाची Amazon लिंक :

पालावरचं जिणं
बी. ए. पर्यंत शिक्षण, बालपणापासून रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, काही काळ पुणे जिल्ह्यात संघप्रचारक. चिंचवड येथे क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीची स्थापना. ‘ग्रामायन’ या संस्थेच्या वतीने ग्रामविकासाचे निमगाव म्हाळुंगी या गावी दहा वर्षे काम. वतनी जमिनीच्या लढ्यामध्ये सहभाग. दलित रंगभूमी, पुणे यांच्या कामात सहीग. पाणलोट विकास, नैसर्गिक शेती, ग्रामोद्योग यांचे प्रत्यक्ष पयोग. ‘माणूस’ साप्ताहिक, पुणे यात दहा वर्षे सातत्याने लेखन. सामाजिक समरसता मंचाचे काही काळ संघटन मंत्री. सध्या भटके-विमुक्त विकास परिषदेचे संघटन मंत्री. आणीबाणीच्या काळात (१९७५-८०) ‘असिधारा’ हे साप्ताहिक चालविले. ‘लाटाखाली संथ पाणी’ ही कादंबरी प्रकाशित. सा. माणूस, सा. विवेक, मौज यांतून लिखाण. लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले यांचा ‘आगरकर पुरस्कार’ (१९९७), टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवली यांचा ‘तेजस पुरस्कार’ (१९९८), धर्मवीर संभाजी पुरस्कार (पुणे येथे-१९९८), डि. एच. गोखले व श्यामला गोखले न्यास, मुंबई यांचा ‘अंत्योदय पुरस्कार’ (२०००), सार्वजनिक काका पुरस्कार ( पुणे येथे २००१) इत्यादिंनी सन्मानित.
पुस्तकाची Amazon लिंक :

आठी आठी चौसष्ट
“या राजकारणात चौसष्ट घरांचा पटच फार विचित्र असतो ! इथे वेळ आल्यावर न्याय- अन्याय, नातं – गोतं, फार काय सख्ख्या बहीण – भावांचा पण बळी द्यायला मागं- पुढं पाहायचा नसतं या खेळात एखाद्याला सुळी दिल्याशिवाय दुसऱ्याला सत्तेची पोळी कधीच मिळत नाही ” सक्रिय राजकारणाच्या प्रत्यक्ष अनुभूतीतून अंकुरलेली, राजकारणातल्या गाठी-निरगाठी सहजगत्या उलगडून दाखवणारी मराठीतील पहिली धाडसी, खळबळजनक राजकीय कादंबरी !
पुस्तकाची Amazon लिंक :

कथा शिवराय
स्वराज्य निर्मिती अन् स्वधर्म रक्षण, कल्याणकारी योजना, शेती व व्यापार वृध्दी, सक्षम आरमार निर्मिती.. थोडक्यात शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे शिवगाथा! कुशाग्र बुध्दी, चतुर युक्ती, कठोर शिस्त, अविश्रांत परिश्रम, सूत्रबद्ध नियोजन आणि शुद्ध चारित्र्य म्हणजे शिवगाथा ! इंग्रजीचा अट्टाहास नव्हे तर स्वभाषेचा अभिमान, पुतळे उभारणे नव्हे तर गडकिल्ल्यांचे संवर्धन म्हणजे शिवगाथा! चंगळवाद अन् बेशिस्त नव्हे तर कठोर शिस्त आणि पोकळ घोषणा नव्हे तर ध्येयाची उत्तुंग झेप म्हणजे शिवगाथा ! ही यशोगाथा साध्या सरळ आणि रंजक शैलीत कथन करण्याचा हेतू हा की ती छोट्या मोठ्यांना.. सर्वसामान्यांना समजावी, उमजावी! ही यशोगाथा सर्वांना कळावी, आकळावी, समजावी, उमजावी, तनमनात झिरपावी.. श्वासात भिनावी आणि कृतीत उतरावी ही प्रार्थना !
पुस्तकाची Amazon लिंक :

Vaastu Palmistry
Dr. N. H. Sahasrabuddhe is a consultant from Pune with 40 years of experience in structural engineering. He holds a graduate degree in Civil Engineering from College of Engineering, Pune and Post Graduate in Structural Engineering from Indian Institute Of Science, Bangalore. He is a fellow of the Institute of Valuers. He has been awarded two prestigious titles – Vaastu Vachaspati and Vaastu Samrat. He is associated with numerous educational institutes in an advisory capacity and has written many books on Vaastu and Feng Shui in English and Marathi.
पुस्तकाची Amazon लिंक :

भारतमातेच्या वीरांगना
स्वातंत्र्याच्या 75री निमित्ताने 75 अपरिचित महिला स्वातंत्र्यसेनानींची गाथा… या 75 विरांगनांमध्ये केवळ स्वातंत्र्यसमराच्या काळातील महिला नसून त्याही आधीपासून इंग्रजांशी लढा देत असलेल्या महिला वीरांगना आहेत. यात पहिला मानवी बाँब आणि पहिली सशस्त्र महिला तुकडी बनविणार्या राणी वेलू नाचियार, राणी चेन्नमा, राणी शिरोमणी, देवी अहिल्याबाई होळकर अशा वीरांगनांचा समावेश आहे. तसेच मूलमती, अम्मी स्वामीनाथन, उदा देवी, अवंतीबाई गोखले, राजकुमारी गुप्ता, बेगम हजरत महल, मीरा बहन, पेरिबेन कॅप्टन, फुलो-झानो मुर्मू, अजीजन बाई अशा अपरिचित वीरांगनांचीही माहिती देण्यात आली आहे. स्वातंत्र्याची 75री साजरी करीत असताना अशा वीरांगनांचे स्मरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
पुस्तकाची Amazon लिंक :

सो आय… (रहस्यमय कादंबरी)
‘सो आय…’ ही रहस्यमय कादंबरी एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या अत्यंत नियोजित खुनाच्या तपासात वाचकाला गुंगवून ठेवते. तपासाची सुई वेगवेगळ्या पण संबंधित व्यक्तींकडे वळते, तेव्हा सामान्यपणे संशय त्याच व्यक्तीबाबत बळावतो. तीच व्यक्ती हा खून करू शकते अशी खात्री पटू लागते, नव्हे पटते. कादंबरी जेव्हा अंतिम वळणावर येते तेव्हा तपासाचा वेग वाढतो. वाचकाच्या काळजाचे ठोकेही वाढतात, कथेतला गुंताही वाढतो… आणि जेव्हा उकल होते तेव्हा….. रहस्यमय कादंबरी मराठी साहित्यात अभावाने वाचायला मिळते. बाबा कदम, सुहास शिरवळकर या दिग्गजांच्या पिढीनंतर श्री. मकरंद विनायक सापटणेकर यांची या पद्धतीची साहित्यकृती हाताळण्याची हातोटी खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी पदार्पणातच जर या क्षमतेची रहस्यमय कादंबरी लिहिली आहे तर त्यांच्या भविष्यातल्या लेखनाबद्दल खूप अपेक्षा ठेवण्याची मराठी वाचकाची मानसिकता होते यात काहीही नवल नाही. श्री. सापटणेकर यांच्या भविष्यातल्या प्रत्येकच साहित्यनिर्मितीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा! त्यांच्या साहित्यनिर्मितीस मराठी वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळेल आणि त्यांनाही वाचकांचे प्रेम लाभेल यात शंका नाही. – संतोष हुदलीकर
पुस्तकाची Amazon लिंक :

डावीकडून उजवीकडे
प्रवीण दामले यांच्या विविध सामाजिक संस्थांच्या अनुभवांचा त्यांचा नायक मानसचा जीवनपट उलगडण्यास निश्चितच उपयोग झाला आहे. मानसचे व्यावसायिक जीवन व वैयक्तिक जीवन या दोहोंची वस्तुनिष्ठ सांगड या कादंबरीत लेखकाने घातली आहे. स्वयंसेवी संस्थांची दुट्टपी कार्यपध्दती, वैचारिक व कृती पातळीवरील गोंधळ या बाबी कुठेही कडवटपणा किंवा दोषारोप करण्याची भूमिका न घेता मांडल्या आहे. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे, त्यांच्या कुटुंबांचे जीवन, त्यातील अस्थिरता कुठेही भडकपणा न येऊ देता कादंबरीत चित्रित केली आहे. मानसला पडलेले अनेक प्रश्न वाचकांना विचार करायला भाग पाडणारे आहेत. अनेक निराशाजनक अनुभव मांडता मांडता मुलांमधील जीवन बदलण्याची क्षमता व त्याचप्रमाणे समाजातील विविध घटकांकडून मिळणारा मदतीचा हात लेखकाने प्रभावीपणे मांडला आहे. व्यावसायिक समाजकार्याची पार्श्वभूमी घेऊन ललित लेखन फारसे झालेले नाही. याबद्दल प्रवीणचे मनापासून कौतुक.
– रूमा बावीकर माजी प्राध्यापिका, कर्वे समाजसेवा संस्था, पुणे
पुस्तकाची Amazon लिंक :

शिवरायांचे शिलेदार १३ पुस्तकांचा संच
रणांगणी शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांचा इतिहास, त्यांची मूळ गावे, त्यांचे कुलपुरुष, शिवछत्रपतींच्या संपर्कात ते कसे आले, स्वराज्यासाठी त्यांनी बजावलेल्या कामगिरी या विषयीची सविस्तर माहिती या पुस्तकात मांडलेली आहे.
१. कान्होजी जेधे २. नेताजी पालकर ३. तानाजी मालुसरे ४. जिवा महाला ५. मुरारबाजी देशपांडे ६. फिरंगोजी नरसाळे ७. बाजीप्रभू देशपांडे ८. प्रतापराव गुजर ९. मदारी मेहेत्तर, रामजी पांगेरा, कोंडाजी फर्जंद १०. दादोजी कोंडदेव ११. बाळाजी आवाजी चिटणीस १२. हंबीरराव मोहिते १३. गुप्तहेर बहिर्जी नाईक
पुस्तकाची Amazon लिंक :

मनाच्या व्यथा (कवितासंग्रह)
गावापासून राष्ट्रापर्यंत आणि राष्ट्रापासून विश्वापर्यंतची जीवन जाणीव या ‘मनाच्या व्यथा’ या काव्यसंग्रहात व्यक्त झालीय. अन्याय अत्याचारी धर्म-संस्कृतीबद्दलचा सात्विक राग-संताप या कवितेत आहेच. तो स्वाभाविक आणि समर्थनीय आहे. पण विद्रोहाला विवेकाची जोड देण्याचे कर्तृत्व पुष्पा साळवे यांनी केलंय. म्हणून जन्मस्थान गाव आणि देश सुंदर रूपात त्यांना दिसला. ही उदारव सहिष्णू भूमिका बुद्धांच्या प्रकाशातच कवयित्रीने पचवली. पुष्पा साळवे करुणामयी धम्माच्या संस्काराने संस्कारीत आहेत. म्हणूनच त्यांचा कळवळा विश्वाला भिडतो. त्यांच्या मनाच्या व कवितेच्या परिप्रेक्षात विश्वजाणीव पेरली जाते. विश्वकल्याण, विश्वशांती, विश्वमानवता कवेत घेणारी त्यांची कविता छत्रपती, महामानव आणि बुद्धत्वाला बेरजेत स्वीकारते. संचिताची, सत्याची, मानव कल्याणकारी बेरीज पुष्पा साळवे यांच्या कवितेचे खास वैशिष्ट्य आहे. पुष्पा साळवे यांचे या ३४५ व्या क्रमांकाच्या प्रस्तावनेत हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. – डॉ. श्रीपाल सबनीस
पुस्तकाची Amazon लिंक :

मातीत मिसळण्याची गोष्ट
सुजाता राऊत या उत्तम कवयित्री आणि अनुवादक आहेत. ‘मातीत मिसळण्याची गोष्ट’ या पहिल्याच ललित लेखसंग्रहातून त्यांच्या संवेदनशील लेखणीचा प्रत्यय येतो. ‘पापण्यांवरील कृष्णमेघ’,’प्राणांवर नभ धरणारा’, ‘कोरड्या नदीपात्रात’ अशा लेखांमधून एका लहान मुलीच्या नजरेतून टिपलेले भोवतालचे जग अनुभवायला मिळते; जे बारीक- सारीक तपशीलांतून जिवंत होते. आसपासच्या पर्यावरणाकडे, व्यक्तींकडे लेखिका सजगपणे पाहताना दिसते. हे जग समजून घेण्याची असोशी त्यातून येते. ‘गवाक्षातूनी चंद्र दिसे’ या पहिल्याच लेखातून त्यांच्या लेखनाची व्यापकता लक्षात येते. या लेखातील जेम्स जॉयस या इंग्रजी कवीच्या कवितेतच त्यांच्या लेखनाचे सार आणि सामर्थ्य सामावलेले आहे.’भूमी’, ‘मिटलेले झाड’, ‘दस रुपया’, ‘फोटो’ अशा लेखांतून काही अपरिचित व्यक्तीचित्रेही साकारली आहेत. ती काळजाला चटका लावून जातात. तसेच मनावर गारुड करणाऱ्या चित्रपटांविषयी लालित्यपूर्ण शैलीत लिहिलेले ‘दुःख कालिंदीचा डोह’, ‘प्रेमाचं शुभ्र संगीत’ असे लेख वेधक आहेत. चित्रपटांतील सौंदर्यस्थळे उलगडून दाखवत ते चिरंतन भावनांविषयी भाष्यही करतात. ‘द्वारकाधीश राणा’, ‘व्यामोह सरताना’, ‘इक शहर में हर कोई’ हे लेख वाचताना आपणही नकळतपणे लेखिकेसोबत प्रवास करू लागतो. कारण या लेखांतून फक्त शहरांचाच प्रवास येत नसून ; त्यात आत्मशोधातून आत्मसमृद्धीपर्यंतचे एक वर्तुळ पूर्ण होते. – अरुण शेवते (ज्येष्ठ संपादक, कवी)
पुस्तकाची Amazon लिंक :

शतकांत एकच सचिन
सचिन तेंडुलकरनं वयाचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. काही मोजक्या लोकांना सचिनच्या या प्रवासाचं अगदी जवळून साक्षीदार होता आलं. क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी हे त्यापैकीच एक आहेत. खेळाबाहेरचा सचिन कसा आहे, याविषयी त्यांनी आपल्या ‘शतकात एकच…सचिन’ या आगामी पुस्तकात लिहलं आहे.
पुस्तकाची Amazon लिंक :

