Services
Amazon व Flipkart वर ऑनलाईन ग्रंथ वितरण

पुस्तक छपाई होऊन प्रती हातात आल्यानंतर त्यांच्या विक्री व वितरणासाठी, विशेषतः ‘ॲमेझॉन’ व ‘फ्लिपकार्ट’ वर पुस्तके उपलब्ध करण्यासाठी ‘संगणक’ च्या ऑनलाईन ग्रंथ वितरण सेवेचा लाभ प्रकाशक घेत असतात.जे लेखक स्वतःचे पुस्तक स्वतःच प्रकाशित करतात तेही या सेवेचा लाभ घेऊन भारतभरच्या वाचकांसाठी आपली पुस्तके ॲमेझॉन / फ्लिपकार्ट वर उपलब्ध करू शकतात.
आज सुमारे १५० आघाडीचे प्रकाशक ‘संगणक’ ची ‘ॲमेझॉन’ व ‘फ्लिपकार्ट’ विषयक सेवा त्यांच्या नियमित पुस्तक विक्रीसाठी घेत आहेत. त्यातील ख्यातनाम प्रकाशकांची यादी डाऊनलोडसाठी लिंकवर दिली आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘संगणक’ च्या व्हॉटसॲप नंबर वर अवश्य संपर्क करावा.
जुन्या पुस्तकांच्या पुनर्मुद्रणासाठी स्वस्त दरातील पेजिनेशन सेवा

लेखक आणि प्रकाशक या दोघांनाही या सेवेची गरज लागू शकते.
एखाद्या जुन्या पुस्तकाचे पुनर्मुद्रण करण्याची जेव्हा वेळ येते, आणि जेव्हा जुना डीटीपी कंपोज उपलब्ध होत नाही, तेव्हा तर ही गरज अधिकच जाणवते. जुना कंपोज उपलब्ध नसल्याने पुन्हा सुरूवातीपासून कंपोज, टायपिंग, प्रुफरिडींग आणि पेजिनेशन करावे लागते. यासाठी वेळही खूप लागतो, आणि प्रतिपान खर्चही बराच येतो.
यासाठी ‘संगणक’ कडे OCR तंत्रज्ञानावर आधारित बुक – पेजिनेशन सेवा उपलब्ध आहे. या पद्धतीने पेजिनेशन केल्याने वेळ व खर्च यात सुमारे २५ टक्के बचत होते.
या संबंधी अधिक माहिती साठी संगणक च्या व्हॉटसॲप नंबर वर कृपया संपर्क साधावा.
eBooks निर्मिती व Amazon Kindle Edition संबंधी सेवा

eBooks व Amazon Kindle Edition संबंधीची Turn-key पद्धतीची सेवा ‘संगणक’ कडे उपलब्ध आहे.प्रकाशक आणि लेखक दोघांनाही या सेवेचा लाभ घेता येईल. या संबंधी मोफत मार्गदर्शन व सविस्तर माहितीसाठी ‘संगणक’ च्या व्हॉटसॲप नंबर वर कृपया संपर्क साधावा.
संगणक प्रकाशनमार्फत प्रकाशित झालेली किंडल आवृत्तीची नमुना पाने आपणास पाहण्यासाठी खालील QR Code मोबाईलने स्कॅन करा अथवा खालील लिंकवर क्लिक करा.

लेखकांसाठी ग्रंथ निर्मिती, ग्रंथ प्रकाशन व ग्रंथ वितरण सेवा

